पुणे : केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. मात्र, वाढते तापमान आणि बदलते हवामान यामुळे येथील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीला कमी भाव मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव आणि नागपूर या बाजार समितीमध्ये केळीला कमी दर मिळत आहे तर नाशिक, पुणे-मोशी येथे केळीला चांगला भाव मिळाला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती केळीला जास्तीत जास्त दर हा फक्त 400 रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर सर्वसाधारण दर हा 350 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच केळीची सर्वाधिक आवक ही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. या बाजार समितीत केळीला जास्तीत जास्त दर हा 1900 रुपये प्रति क्विंटल मिळाला.
थेट देवगड येथून…. तयारी ॲग्रोवर्ल्डच्या 29 एप्रिलच्या हापूस आंब्याच्या गाडीची…
थेट देवगड येथून…. तयारी ॲग्रोवर्ल्डच्या 29 एप्रिलच्या हापूस आंब्याच्या गाडीची…
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
केळी (25/4/2024) |
|||
नाशिक | क्विंटल | 420 | 1400 |
जळगाव | क्विंटल | 8 | 350 |
नागपूर | क्विंटल | 20 | 525 |
पुणे | क्विंटल | 22 | 1100 |
पुणे-मोशी | क्विंटल | 49 | 2750 |
केळी (24/4/2024) | |||
नाशिक | क्विंटल | 290 | 1400 |
जळगाव | क्विंटल | 10 | 400 |
पुणे | क्विंटल | 15 | 1000 |
यावल | क्विंटल | 5410 | 1775 |
शेतातील पाईप फुटलाय ? पहा हा जुगाड नक्की उपयोगात येईल