Home बाजार भाव कांद्याला सध्या असा मिळतोय दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

कांद्याला सध्या असा मिळतोय दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

कांद्याला सध्या असा मिळतोय दर

पुणे : कांद्याला सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला ?, कांद्याची आवक किती झाली ? यासह इतरही शेतमालाचे दर आपण पाहणार आहोत. कानड्याला आज पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत 1 हजार 100 रुपये दर मिळाला. तसेच काल (दि. 30) रोजी कांद्याला सर्वाधिक दर हा उस्मानाबाद आणि जुन्नर -आळेफाटा या कृषी बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कांद्याला 1 हजार 750 रुपये दर मिळाला.

 

निर्मल रायझामिका 👇

दरम्यान, आता वटाण्याने देखील टोमॅटोच्या पुढचा दर गाठला आहे. पालेभाज्यांचे राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे दर वाढले आहेत. वाटण्याला जुन्नर -ओतूर या कृषी उत्पन्न बाजार समितीत 14 हजार रुपये दर मिळाला असून 4 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच मुंबईत वाटाणा 240 रुपये किलो, गवार 120 रुपये किलो, आले देखील 240 रुपये किलो झाले आहे. काकडी आधी 30 रुपये होती आता तिचे दर 40 रुपये किलो झालेत.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा 31/07/2023

पुणे -पिंपरी क्विंटल 24 1100
कांदा 30/07/2023
खेड-चाकण क्विंटल 175 1100
मंचर क्विंटल 5552 1600
दौंड-केडगाव क्विंटल 2557 1450
राहता क्विंटल 9250 1650
जुन्नर – नारायणगाव क्विंटल 25 1000
जुन्नर -आळेफाटा क्विंटल 7050 1750
अकलुज क्विंटल 345 1400
उस्मानाबाद क्विंटल 15 1750

कारली 31/07/2023

अकलुज क्विंटल 16 5000
पुणे-मांजरी क्विंटल 22 5500
खेड-चाकण क्विंटल 76 3000

काकडी 31/07/2023

पुणे क्विंटल 202 1300
पुणे -पिंपरी क्विंटल 1 1300
Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇