The World’s Last Highway… तुम्हाला जर भटकंतीची आवड असेल तर किंवा नसेलही तरीही तुम्हाला देशातीलच नव्हे तर जगाच्या पाठीवरील काही रस्ते माहितच असतील. कधीतरी तुम्हाला समोर दिसणार्या समुद्राकडे पाहून या समुद्राच्या पलिकडे काय असेल? तुम्ही ज्या रस्यावरून प्रवास करीत असाल तो रस्ता कुठपर्यंत जात असेल, असे अनेक प्रश्न पडत असतील. कदाचील जगातील शेवटचा रस्ता कोणता? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. परंतु हा आहे कुठे?, कसा आहे का रस्ता? याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल. मात्र तुम्हाला पडलेल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत.
हा एक असा रस्ता आहे, ज्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल. E 69 हायवेला जगातील शेवटचा रस्ता म्हटले जाते. नॉर्वे हा एक देश आहे जिथे अनेक रहस्यमय ठिकाणे अस्तित्वात आहेत. अशाच एका जागेपैकी E 69 हायवे एक जागा आहे आणि या जागेला जगातील शेवटचा रस्ता म्हणून ओळखली जाते. मात्र, याठिकाणी तुम्हाला एकट्याने जाण्याची परवानगी नाही. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळ असलेला हा एकमेव रस्ता आहे. जो तुम्हाला उत्तर ध्रुवाच्या शक्य तितक्या जवळ घेऊन जाईल.
E 69 हायवे (E 69 Highway) म्हणजे काय? याला जगातील शेवटचा रस्ता का म्हणतात?
नॉर्वे मधील युरोपियन E 69 महामार्ग हा पृथ्वीवरील एकमेव रस्ता आहे, जो तुम्हाला रस्त्याने जाण्यासाठी उत्तर ध्रुवाच्या जवळ नेईल. हा अनोखा महामार्ग ओल्डरफजॉर्डला युरोपच्या उत्तरेकडील भाग नॉर्डकॅपशी जोडतो. 129 कि.मी. लांबीचा हा महामार्ग अनेक नयनरम्य निसर्गरम्य दृश्य तसेच 5 बोगद्यांमधून जातो. या महामार्गावरील सर्वात लांब बोगद्याची लांबी 6.9 किमी आहे. हा रस्ता त्याच्या अस्तित्वाच्या अद्वितीय स्थानामुळे खूप गूढ असला तरी, हा E 69 महामार्ग अनेक नयनरम्य लँडस्केप्स, समुद्र, बर्फ यांसारख्या नयनरम्य दृश्यांनी भरलेला आहे. या महामार्गावरील राईड तुमच्या आयुष्यातील एका महत्वाच्या आठवणींपैकी एक होवू शकते.
एका व्यक्तीला भेट देण्यास आहे मनाई
लोकांना आश्चर्यचकीत करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे… या 129 कि.मी. लांबीच्या महामार्गावर अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे एकट्याने जाणे किंवा गाडी चालवण्यास मनाई आहे. येथे प्रवास करण्यासाठी तुमच्यासोबत चार किंवा त्यापेक्षा अधिक लोक असणे आवश्यक आहे. कारण सर्वत्र बर्फाची दाट चादर असल्याने हरवण्याचा धोका नेहमीच असतो. परिणामी येथे कोणत्याही एका व्यक्तीला भेट देण्यास मनाई आहे. या ठिकाणी एक रोमांचक गोष्ट अशी आहे की, या ठिकाणी उत्तर ध्रुव जवळ असल्याने, हिवाळ्याच्या ऋतू मध्ये येथे रात्र संपत नाही आणि उन्हाळ्यात सूर्य कधीही मावळत नाही आणि कधीकधी हा कालावधी सहा महिन्यांपर्यंत राहू शकतो. जर आपण तापमानाबद्दल बोललो, तर हिवाळ्यात येथे तापमान उणे 43 अंश ते उणे 26 अंश सेल्सिअस असते आणि उन्हाळ्यात तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या आसपास राहते.
लोक इथे राहतात का?
या ठिकाणाी हिवाळ्यात तापमान उणे 43 अंश ते उणे 26 अंश सेल्सिअस तर उन्हाळ्यात शून्य अंश सेल्सिअसच्या जवळपास राहत असेल तर तुम्हाला एवढी थंडी असूनही लोक इथे राहतात का? हा प्रश्न पडला असेलच. तर याचे उत्तर आहे…होये. पूर्वी येथे फक्त मासळीचा व्यापार केला जात होता. परंतु, 1930 पासून या जागेचा विकास होऊ लागला. सुमारे चार वर्षांनंतर, जसे की, 1934 मध्ये, इथल्या लोकांनी एकत्र येऊन ठरवले की पर्यटकांचेही येथे स्वागत केले पाहिजे. जेणेकरून त्यांना उत्पन्नाच्या वेगळ्या स्रोतातून कमाई करता येईल.
त्यानंतर जगभरातील लोक येथे प्रवास करू लागले आणि परिणामी येथे अनेक प्रकारची रेस्टॉरंट्स आणि छोटी हॉटेल्स बांधली गेली. येथे भेट दिल्याने लोकांना दुसर्याच जगात असल्याची अनुभूती मिळते आणि इथला मावळता सूर्य आणि ध्रुवीय दिवे पाहून लोकांना भुरळ पडते. इथे रात्री आकाश कधी निळे, कधी हिरवे, तर कधी गुलाबी दिसते. ध्रुवीय दिव्यांना अरोरा असेही म्हणतात. जे फक्त खालच्या ध्रुवीय प्रदेशात रात्री दिसतात, तेही जेव्हा आकाशात पूर्ण अंधार असतो.
या दशकात झाली E 69 ची निर्मिती
मासेमारी उद्योगातील मंदीचा सामना करण्यासाठी 1930 च्या दशकात E 69 ची निर्मिती झाली. जी नॉर्डकॅप मच्छिमारांनी विशेष सवलतीच्या अधिकारांवर नियंत्रण गमावल्यानंतर क्षितिजावर आली. मच्छिमारांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधावे लागले आणि 1934 मध्ये नॉर्डकॅपच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या गावात होन्निंग्सवॅग येथे एक सामूहिक सभा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये हार्बर बॉस नगर परिषदेने समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाला प्राधान्य देण्याची मागणी केली होती. त्यानंतर या महामार्गाची निर्मिती झाली आहे.