• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

भारतीय कृषीशास्त्रज्ञाचा मेक्सिकोत पुतळा ; तिथल्या हरित क्रांतीचे जनक! जाणून घ्या कोण आहे हा मराठी माणूस

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या मेक्सिकोतील पहिल्याच पुतळ्याचेही दौऱ्यात अनावरण

Team Agroworld by Team Agroworld
August 29, 2022
in हॅपनिंग
2
भारतीय कृषीशास्त्रज्ञाचा मेक्सिकोत पुतळा

भारतीय कृषीशास्त्रज्ञाचा मेक्सिकोत पुतळा

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : एका भारतीय कृषीशास्त्रज्ञाचा मेक्सिकोत पुतळा उभारला गेलाय. तिथल्या हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातोय. अभिमानाची बाब म्हणजे ते एक मराठी माणूस आहेत. जाणून घेऊया कोण आहे हा काव्‍‌र्हरचा भारतीय शिष्य आणि त्याच्या कार्याविषयी …

हरित क्रांतीचे जनक मूलत: एक क्रांतिकारक!

या मराठी माणसाचे शेतीविषयक संशोधन मेक्सिकोला अन्न स्वयंपूर्ण करण्यास महत्त्वाचे ठरले. त्यामुळेच या मराठी कृषी शास्त्रज्ञाला मेक्सिकेन हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. कॉर्न किंग अशीही त्यांची ओळख आहे. मेक्सिकोच्या जनतेत आजही त्यांची प्रतिमा एखाद्या हीरोसारखी आहे. खरेतर महाराष्ट्रात, विदर्भात जन्मलेले हे व्यक्तिमत्त्व मूलत: एक क्रांतिकारक! भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता. त्यासाठीच त्यांनी केलेला महाराष्ट्रापासून मेक्सिकोपर्यंतच्या प्रवासाची गाथा रोमांचक आणि प्रेरणादायी आहे.

स्वामी विवेकानंद यांचा लॅटिन अमेरिकेत पहिला पुतळा

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे कॅनडातील 65 व्या राष्ट्रकुल संसदीय समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी कॅनडा दौऱ्यावर आहेत. त्यानंतर 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर असा त्यांचा तीन दिवसीय मेक्सिको दौरा आहे. त्यात 2 सप्टेंबर रोजी बिर्ला यांच्या हस्ते हिडाल्गो स्टेट स्वायत्त विद्यापीठाच्या आवारातील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण होईल. विवेकानंदांचा लॅटिन अमेरिकेतील हा पहिलाच पुतळा आहे. मेक्सिको संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ इंडो-मेक्सिकन ऑरगॅनिक गार्डनचेही उद्घाटन या दौऱ्यात बिर्ला यांच्या हस्ते होईल. भारतीय कंपनी युनायटेड फॉस्फरस (यूपीएल)ने हे उद्यान विकसित केले आहे.

भारतीय कृषीशास्त्रज्ञाचा मेक्सिकोत पुतळा गौरवास्पद

स्वामी विवेकानंद यांच्याबरोबरच भारतीय कृषीशास्त्रज्ञाचा मेक्सिकोत पुतळा असणे ही तमाम भारतीयांसाठी गौरवास्पद बाब आहे. हे कृषी शास्त्रज्ञ आहेत महाराष्ट्राचे सुपुत्र आणि क्रांतिकारक डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे. मेक्सिकोतील चॅपिंगो स्वायत्त विद्यापीठाच्या आवारात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. ओम बिर्ला यांच्या हस्ते 1 सप्टेंबर रोजी डॉ. खानखोजे यांच्या पुतळ्याचे अनावरण होईल. याच विद्यापीठात त्यांनी महत्त्वाचे शेती संशोधन कार्य केले आहे.

इंडो-मेक्सिको मैत्री संबंधाचे नवे पर्व

इंडो-मेक्सिको मैत्री संबंधातून स्वामी विवेकानंद व डॉ. खानखोजे यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच इंडो-मेक्सिकन उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे. या सर्व कार्यक्रमात मेक्सिकोचे कृषी व ग्रामविकास डॉ. व्हिक्टर विलालोबोस हेही उपस्थित राहतील. मेक्सिकन संसद म्हणजेच द चेंबर ऑफ डेप्युटीज (कैमारा डी डिपुटैडोस)चे अध्यक्ष सर्जियो गुतिरेज़ लूना यांच्या निमंत्रणावरून ओम बिर्ला यांच्यासह शिष्टमंडळ मेक्सिकन दौऱ्यावर जात आहे.

काव्‍‌र्हरचा भारतीय शिष्य असलेला मराठी माणूस

डॉ. पांडुरंग खानखोजे यांचा 7 नोव्हेंबर 1884 रोजी वर्धा येथील पालकवाडी या ठिकाणी झाला. फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याचे ते खंदे समर्थक होते. भारतीय स्वातंत्र्य क्रांतीसाठी सैन्य प्रशिक्षण घेण्यासाठी ते परदेशात गेले. परदेशात राहून गदर पार्टीच्या माध्यमातून त्यांनी लढा दिला होता. जपान, चीन, अमेरिकेनंतर ते मेक्सिकोत आश्रयास गेले होते. तेथे त्यांनी त्यावेळच्या वॉशिंग्टन स्टेट कॉलेजमध्ये (सध्याचे वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठ) कृषी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. मात्र, अमेरिकेत शेतीविषयक शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्याच वर्षी ते कॅलिफोर्नियातील माऊंट तमालपाईस मिलिटरी अकादमीत दाखल झाले. मेक्सिकोतील हरित क्रांतीत खानखोजे यांचा सिंहाचा वाटा होता.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्याशी जवळून संबंध

डॉ. पांडुरंग खानखोजे यांनी क्रांतिकारक जीवनासाठी सैनिकी शिक्षणही घेण्याचा वारंवार प्रयत्न केला. असे असूनही जीवनप्रवासात त्यांची कृषी विषयक ज्ञानलालसाही सतत जागृत होती. मात्र त्यांच्या देशभक्तीच्या अतीव ओढीमुळे त्यांच्या कृषितज्ज्ञ व्यक्तिमत्त्वाची बाजू काहीशी अज्ञातच राहिली आहे. कृषी पदवी अभ्यास करताना सुप्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्याशी खानखोजे यांचा खूप जवळून संबंध आला.

दुष्काळी परिस्थितही तग धरणाऱ्या वाणाचा शोध

डॉ. खानखोजे यांची मेक्सिकोतील क्रांतीकारी सहकार्‍यांशी मैत्री होती. त्यातूनच पदवीनंतर पुढे त्यांची चिपिंगो येथील नॅशनल स्कूल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर संस्थेत प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. याच ठिकाणी खानखोजेंनी मका, गहू, डाळी आणि रबर यावर संशोधन केले. याच संशोधनातून त्यांनी रशियात दुष्काळी परिस्थितही तग धरू शकेल, असे वाण शोधले. पुढे याच प्रयत्नातून मेक्सिकोत हरित क्रांती झाली. विशेष म्हणजे अमेरिकेचे कृषीतज्ज्ञ नॉर्मन बारलॉग यांनी नंतरच्या काळात खानखोजे यांचे हेच गव्हाचे वाण भारतात पंजाबमध्ये आणले, असा दावा केला जातो.

मुलगी सावित्री साव्हणे यांनी लिहिलेय चरित्र

खानखोजे यांची मुलगी सावित्री साव्हणे यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रात बरीचशी दुर्मीळ आणि फारशी ज्ञात नसलेली माहिती दिली आहे. खानखोजे यांच्या मेक्सिकोतील कृषी संशोधन आणि शेतीतील योगदानाबद्दलही या चरित्रात विस्तृत माहिती आहे. चॅपिंगोतील नॅशनल स्कूल ऑफ अग्रिकल्चरमधील नोकरीत डॉ. खानखोजे यांनी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मका आणि गव्हाचे वाण विकसित केले. हे वाण दुष्काळातही उत्तम उत्पन्न देऊ लागले. शिवाय, ते रोगप्रतिबंधकही होते. त्यामुळे मेक्सिकोतील हरित क्रांतीत या वाणांना मोठे महत्त्व प्राप्त झाले.

Jain Irrigation

चित्रकार दिएगो रिव्हिएरा यांचे अवर डेली ब्रेड म्युरल्स

कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांच्या अनेक जाती खानखोजे यांनी विकसित केल्या. शेतकऱ्यांसाठी मोफत कृषी विद्यालय सुरू केले. त्यांच्या या कार्यामुळे ते मेक्सिकोतील हरित क्रांती अग्रदूत बनले. मेक्सिकोतील त्या काळातील प्रसिद्ध चित्रकार दिएगो रिव्हिएरा यांनी म्युरल्समध्ये खानखोजे यांना चित्रीत केले. त्यामध्ये खानखोजे आणि अन्य लोक, मुले एका टेबलाभोवती बसली आहेत आणि भाकरी तोडत असल्याचे दाखवले आहे. या म्युरल्सचे नाव आहे अवर डेली ब्रेड. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते मायदेशी परत आले आणि शेतीक्षेत्रात काम सुरू केले. 22 जानेवारी 1967 रोजी त्यांचे नागपूरमध्ये निधन झाले.

भारतातील हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत

पांडुरंग खानखोजे हे सक्षम गहू व नका वाणामुळे मेक्सिकोभर प्रसिद्ध झाले. खानखोजे यांनी मक्याच्या पिकावर केलेले प्रयोग हे त्याकाळी खूपच मोठे योगदान ठरले. पुढच्या काळात मेक्सिकोमध्ये हरित क्रांती घडवणारे डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनीही खानखोजे यांच्या प्रयोगांचा अभ्यास केल्याचा दावा त्यांच्या कन्येने पुस्तकात केला आहे. त्यातूनच भारतातील हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण होऊन प्रत्येकाला पोटभर अन्न मिळू शकले, असेही त्या म्हणतात. स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी पांडुरंग खानखोजे यांचा ‘हिंदू सवंत आणि निसर्गाच्या मदतीने चमत्कार करणारी व्यक्ती’, “चॅपिंगोचे जादूगार” अशा शब्दांत त्यांचा गौरव केल्याचे सांगितले जाते.

जपान, चीन, रशिया; नंतर अमेरिका

भारतात खानखोजेंच्या नेतृत्वाखालील एका गटाला समाजसुधारक स्वामी दयानंद आणि त्यांच्या आर्य समाजाच्या विचारांनी भारून टाकले होते, असे या चरित्रात नमूद केले आहे. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीसाठी त्यांनी जपानमध्ये जाऊन चाचपणी केली. नंतर चिनी क्रांतिकारकांच्याही भेटी घेतल्या. त्यानंतर ते पुढे अमेरिकेत आले होते.

planto

अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पार्टीचे संस्थापक

मेक्सिकोतील नागरिकांनी 1910 मध्ये क्रांती करून हुकूमशाही राजवट उलथून टाकली होती. त्यामुळे खानखोजे अतिशय प्रभावित झाले होते. त्यातून भारतीय स्वातंत्र्यलढयासाठी अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पार्टीच्या संस्थापकांत खानखोजे हेही होते. भारतातून अमेरिकेत गेलेल्यांनी 1914 मध्ये ही संघटना स्थापन केली होती आणि त्यामध्ये पंजाबमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांना नंतर लाला हरदयाळ भेटले. तिथे हरदयाळ यांनी एक वृत्तपत्र काढले. त्यातून भारतीय भाषांमधून देशभक्तीपर गीत, लेख आदी प्रसिद्ध व्हायचे. हे वृत्तपत्र आणि त्यात मांडले जाणारे विचार गदर पार्टी सुरू होण्यासाठी महत्त्वाचे ठरले.

ब्रिटिश सरकारविरोधात सशस्त्र लढ्यासाठी प्रशिक्षण

कॅलिफोर्नियातील सैन्य अकादमीत असताना त्यांचा परिचय मेक्सिकोतील अनेक लोकांशी झाला. अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतात खानखोजे यांनी भारतीय मजुरांसोबत काम केले होते. नंतर अमेरिकेत फिरून त्यांनी शेतीत काम करणाऱ्या भारतीयांशी संवाद साधला. त्यावेळी ते त्यांच्याशी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत चर्चा करत असत. त्यांनी विदेशात राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने भारतातील ब्रिटीश राजवटीच्या विरोधात हल्ले करण्याची योजना आखली होती. ब्रिटिश सरकारविरोधात सशस्त्र लढा उभारण्यासाठी खानखोजे यांनी माऊंट तमालपाईसच्या परिसरात स्वयंसेवकांना प्रशिक्षणही दिले होते. मात्र, 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाल्यामुळे खानखोजेंची योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही.

रशियात जाऊन ब्लादिमीर लेनिन यांची भेट

1915 मध्ये पॅरिसला जाऊन खानखोजे यांनी मादाम भिकाजी कामा यांची भेट घेतली होती आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी पाठबळ देण्याची विनंती केली. कामा यांच्याच सांगण्यावरून नंतर जर्मनीतील बर्लिन येथे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या क्रांतीकारकांच्या गटात सहभाग घेतला. रशियन राज्यक्रांती घडल्यानंतर खानखोजे यांनी रशियात जाऊन ब्लादिमीर लेनिन यांची भेट घेतल्याचेही त्यांच्या कन्येने लिहिलेल्या चरित्रात म्हटले आहे. या सगळ्या घटनांमुळे त्यांना युरोपात प्रवेश करण्यावर निर्बंध लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. ब्रिटीशांची करडी नजर असल्याने ते भारतातही येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी पुढे मेक्सिकोत आश्रय मिळवला.

तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेतमाल वाहतूक : किसान रेलच्या सर्वाधिक 1838 फेऱ्या महाराष्ट्रातून

Share this:

  • Facebook
  • X
Previous Post

पंतप्रधान मत्स्य संपदा योजना : जाणून घ्या ही केंद्र सरकारी योजना 1 हेक्टर तळ्यासाठी कसे मिळवून देईल मत्स व्यवसाय कर्ज

Next Post

Monsoon Update … बाप्पांच्या स्वागताला वरुणराजाची हजेरी, राज्यात आजपासून तीन दिवस पुन्हा पावसाचे!

Next Post
Monsoon Update

Monsoon Update ... बाप्पांच्या स्वागताला वरुणराजाची हजेरी, राज्यात आजपासून तीन दिवस पुन्हा पावसाचे!

Comments 2

  1. Pingback: कृषी मूल्य आयोगाला बळ देणारे प्रख्यात भारतीय कृषी अर्थतज्ज्ञ, पद्मभूषण अभिजित सेन यांचे निधन
  2. Pingback: ‘बसवंत हनी बी पार्क’ ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित

ताज्या बातम्या

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.