आगामी दोन दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता
यावर्षी जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाने १००% सरासरी गाठली आहे. या महिन्याच्या पूर्वार्धात परतीचा मान्सूनचा प्रवास सुरु झाला आहे. यंदा पावसाने सर्व विक्रम मोडीत काढले असून आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आगामी दोन दिवस बहुतेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे होणारा अतिरिक्त पडलेला पाऊस नुकसानदायक ठरत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पूल वाहिल्याने दळणवळणाची स्थितीत अधिकच बिकट असून पार्श्वभूमीवर हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात हवामान खात्याच्या पावसाच्या या अंदाजाने शेतकरी बांधवांनी वेळीच सावध होत पशुधन व जीवितहानी टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या “हिक्का’ चक्रीवादळाचा वेग वाढल्याने अरबी समुद्रातील जोरदार वारे आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे परतीचा पावसाचा प्रवास लांबला असून त्यामुळे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम राहून २६-२७ सप्टेंबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. काल पुणे येथील ढगफुटी सदृश स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली असून उस्मानाबाद,लातूर,नांदेड,परभणी, औरंगाबाद या मराठवाड्यातील शहरात जामदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार राज्यात पुढील आठवडा जरी पावसाचा असला तरी येत्या दोन दिवसात पावसाचा जोर हा काल झालेल्या पावसाच्या स्थितीप्रमाणेच असणार आहे तरी सर्वांनी सतर्क राहण्याचे निर्देशप्रशासनाने दिले आहेत.

“हिक्का’ चक्री वादळ
अरबी समुद्रात तयार झालेल्या “हिक्का’ चक्री वादळ ताशी २१ किलोमीटर वेगाने पाकिस्तान व ओमान या देशांच्या दिशेला सरकत आहे. या वादळामुळे वाऱ्याचा वेग १२० किमीपर्यंत राहणार असल्याने समुद्र पुढील १२ तास खवळलेला असणार असल्याने हवामान खात्याने किनारपट्टीवर असलेल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.