डाळिंब लागवड : डाळिंब हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि आरोग्यदायी फळ आहे जे भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जाते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात आणि तमिळनाडू हे डाळिंब उत्पादनात अग्रेसर राज्ये आहेत. डाळिंब उत्पादनासाठी योग्य व्यवस्थापन, अत्याधुनिक लागवडीची तंत्रे आणि रोग व कीड नियंत्रणाची योग्य पद्धती वापरणे आवश्यक असते. या लेखात आपण डाळिंब लागवडीचे महत्त्व, त्याच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली पद्धती आणि त्या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत.
जमीन
महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना नेहमीच असा प्रश्न असतो की डाळिंबासाठी कोणती जमीन योग्य आहे? डाळिंबाचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेतले जाऊ शकते. अगदी निकस आणि निष्कृष्ट जमिनीपासून ते भारी, मध्यम काळी आणि सुपीक जमिनीसुद्धा डाळिंबाच्या लागवडीसाठी योग्य ठरतात. तसेच उतरत्या डोंगराळ जमिनीतही या पिकाचे यशस्वी उत्पादन होऊ शकते. तथापि, जमिनीत पाण्याचा योग्य निचरा आणि पिकाला पुरेसे पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
हवामान
काही लोकांना हा प्रश्न पडतो की, बाराही महिने फुलणाऱ्या या पिकाला कोणते हवामान योग्य ठरेल? डाळिंबासाठी कोरडे आणि उष्ण हवामान अधिक फायदेशीर मानले जाते. राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे फळांचे नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे कोरड्या हवामानामुळे अधिक फायदा होतो आणि या हवामानात गोड आणि उत्तम दर्जाची फळे तयार होतात. तसेच, हिवाळ्यातील कडक थंडी डाळिंबाच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असते. या प्रकारच्या हवामानामुळे डाळिंबाचे उत्पादन अधिक चांगले आणि गुणवत्ता उत्तम होण्याची शक्यता वाढते.
डाळिंबाची लागवड कधी करावी?
डाळिंब लागवड तीन प्रमुख हंगामांमध्ये केली जाते.
उन्हाळी हंगाम : जानेवारी-फेब्रुवारी
खरीप हंगाम : जून-जुलै
रब्बी हंगाम : ऑक्टोबर-नोव्हेंबर
डाळिंब लागवड
लागवड करण्याआधी उन्हाळ्यामध्ये जमिनीला 2 ते 3 वेळा उभी आडवी नांगरटी करून शेतजमिनीला मोकळी आणि सपाट करावी. डाळिंब लागवडीचा अंतर 5×5 आणि 60×60×60cm खडडे घ्यावेत. 5×5 मीटर अंतराने प्रती हेक्टरी 400 झाडे लागतील. प्रत्येक खड्ड्याच्या तळाशी पालापाचोळा टाकावे. हेक्टरी 20 ते 25kg शेणखत किंवा कंपोस्ट खत, 1kg सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळावे. तसेच वेळोवेळी पाणी देणे गरजेचे आहे पण लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
डाळिंबाच्या जाती
डाळिंबाच्या अनेक जाती आहेत. पण, बाजारातील मागणी, हवामान आणि जमीन अशा प्रकारानुसार योग्य जातीची निवड करणे गरजेचे असते. जसे की भगवा, गणेश, वंडरफुल, मुस्कट, कंधारी इ.
पाणी आणि खत व्यवस्थापन
डाळिंब पिकाला पाणी योग्यवेळी आणि योग्य प्रमाणात दिल्यास उत्पादन वाढू शकते. तसेच ठिबक सिंचन पद्धतीने डाळिंब लागवडीसाठी उपयुक्त मानले जाते. डाळिंबाच्या उत्पादनासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचे संतुलन व्यवस्थापन केल्याने फळांचे पोषण मूल्य आणि गुणवत्ता सुधारते. सेंद्रिय खतांचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता वाढते तसेच पिकांवर चांगला परिणाम होतो.
डाळिंब पिकावरील प्रमुख रोग
तेल्या डाग रोग – या रोगाचे लक्षणे पानांवर व फळांवर छोटे डाग दिसतात. फळ सड – रोग याचे लक्षण फळांवर काळसर गळा तपकिरी सड होते.
फळ बाहार घेण्याचा काळ
डाळिंब लागवडीनंतर साधारण 7-8 महिन्यात फळ धरणा सुरू होतो. एप्रिल-मे आणि सप्टेंबर-ऑक्टोबर हे दोन हंगाम प्राधान्यासाठी महत्त्वाची असतात.
फळ काढणी
डाळिंबाच्या काढणीसाठी योग्य वेळ आणि तंत्र वापरणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे फळाची गुणवत्ता टिकून राहते आणि बाजारपेठेत चांगला दर मिळतो. फळ काढणीसाठी त्याचा रंग, गोडी आणि फळाची साल चमकदार व कठीण असणे गरजेचे आहे. फळ परिपक्व झाल्यानंतरच काढावे. डाळिंब आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असून कमी पाण्यात आधी उत्पादन मिळवून चांगला नफा मिळवता येतो.
