पाल ही प्रत्येकाच्याच घरात असते. इतर ऋतूंपेक्षा घरगुती पाली उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात दिसतात. पालींच्या पिल्लांचाही सुळसुळाट दिसून येतो. पाली घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आढळून येतात. मग ते स्वयंपाक घर असो किंवा वॉशरूम. पालींकडे पाहून बऱ्याच वेळा आपल्याला किळस येते किंवा आपल्याला त्याची भीती वाटते. आणि मग आपण पाली हाकलण्यासाठी विविध प्रयोग करून पाहतो. परंतु, आजचा हा उपाय खात्रीशीरपणे काम करेल, हे निश्चित.
खात्रीशीर घरगुती उपाय
हा उपाय करण्यासाठी रोजच्या वापरातील घरगुती पदार्थ कामी येतील. त्यासाठी लहान आकाराच्या दोन-तीन हिरव्या किंवा लाल मिरच्या, सोबतच सात ते आठ मिरच्यांची देठं, लसणाची मुठभर टरफलं एक ते दीड लिंबू आणि चार ते पाच कापराच्या वड्या इत्यादी साहित्य लागणार आहे.
सर्वप्रथम एका पातेल्यात एक ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये लसणाची टरफलं, चार-पाच लवंग, चार-पाच दालचिनी यांची बारीक पावडर, मिरच्यांचे तुकडे, लिंबाच्या फोडी आणि मिरच्यांची देठ टाका. मिश्रित केलेलं पाणी चार ते पाच मिनिटे उकळून घ्या. त्या पाण्यात कापराच्या वड्यांची पावडर करून टाकावी. ते पाणी थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावे. त्यानंतर हे पाणी घरात ज्या ठिकाणी पाल मोठ्या प्रमाणात आढळते त्या ठिकाणी शिंपडावे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 8 मे (बुधवारी) रोजी उपलब्ध
- वाढत्या तापमानाचा जगभरातील शेतीवर विपरीत परिणाम