जागतिक तापमान वाढत असल्याने सर्वत्र शेतीवर विपरित परिणाम होत आहेत. अनेक देशांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. यामुळे अन्नधान्यांच्या उत्पादनावर परिणाम होत असून अन्नधान्य सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
जगभरातील शेतकऱ्यांना यापुढं हवामान अनुकूल पिकांची निवड आणि योग्य जलसंधारणाचा अवलंब करावा लागणार असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे. भारताच्या काही भागातही अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं काही राज्यांमध्ये दुष्काळाची चिन्हं दिसत आहेत. निवडणुकीत गुंतलेलं सरकार या परिस्थितीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या तयारीत आहे.
यंदाचा आंबा हंगामही उत्पादकांसाठी फारसा चांगला राहिलेला नाही. आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं आंबा उत्पादक शेतकऱ्यांनीही सरकारकडून मदतची मागणी केली आहे.