मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाला पून्हा जोरदार सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाकडून कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात मान्सून पून्हा सक्रीय झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील 2-3 दिवसात पश्चिम मध्यप्रदेश आणि गुजरातच्या दिशेने सकरण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे पुढील 2-3 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसात वाढ होवून काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून रविवार दि. 17 रोजी जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पूणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 16 आणि 17 सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रात 55 कि.मी. प्रतितास वेगाने वार्यासह वादळी हवामान राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇