मुंबई : Onion crop management.. राज्यातील जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर यासह विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. कांदा हे हिवाळी हंगामातील पिक असून त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी पाणी आणि खताचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. आजच्या लेखात आपण याबाबत जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला ही बातमी सविस्तरपणे वाचणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड असणे फायदेशीर असते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते. कांदा रोपांच्या लागवडीनंतर शेतात तण दिसल्यास हलकी खुरपणी करावी. काढणीपूर्वी 3 आठवडयांअगोदर पाणी बंद करावे म्हणजे पानातील रस कांद्यामध्ये लवकर उतरतो आण माना पडून कांदा काढणीस तयार होतो.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 🌱
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
पाणी देण्याचे नियोजन
कांद्याच्या पिकाकरिता पाण्याचे प्रमाण आणि दोन पाळीतील अंतर हे लागवडीचा हंगाम, जमिनीचा मगदूर, पिकाच्या वाढीची अवस्था यासारख्या बाबींवर अवलंबून असते. रोप लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. रब्बी हंगामात १० ते १२ दिवसांनी तर उन्हाळी हंगामात ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सर्वसाधारणपणे खरिपात ३-४ पाळ्या रांगडा कांद्याच्या हंगामात १० ते १५ पाळ्या, तर रब्बी- उन्हाळा हंगामात १८ ते २० पाण्याच्या पाळ्या लागतात. कांद्याची वाढ पूर्ण होऊन, पाने पिवळी पडून माना पडायला लागतात, तेव्हा कांदा काढण्यापूर्वी १५ ते २० दिवस आधी पाणी देणे थांबवावे. यामुळे कांदे घट्ट होतात आणि वरचा पापुद्रा सुकून काढणीच्या वेळी कांद्याला इजा होत नाही.
असे करा रोग व किडीचे व्यवस्थापन
कांद्यावर पडणाऱ्या काही प्रमुख रोगांपैकी करपा रोग एक आहे. हा रोग बुरशीपासून होतो. पातीवर लांबट गोल तांबूस चटटे पडतात. शेंडयापासून पाने जळाल्यासारखी दिसतात. खरीप कांदयावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येतो. फूलकिडे किंवा अळया हेक्टरी अगदी लहान आकाराचे किटक पातीवरील तेलकट पृष्टभागात खरडतात. व त्यात स्त्रवणारा रस शोषतात. त्यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.
फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पुनर्लाण केल्यानंतर दोन तीन आठवडयांनी प्रती हेक्टरी फॉस्फॉमिडॉन 85 डब्ल्यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू एस.सी. 550 मिली अधिक डायथेन एम 45, 75 डब्ल्यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायथेन झेड – 78, 75 डब्ल्यू डी पी 1000 ग्रॅम अधक 500 ग्रॅम सॅडोवीट चिकट द्रव्य 500 लिटर पाण्यात मिसळून पाहिली फवारणी करावी.
पहिल्या फवारणी नंतर तीन चार आठवडयांनी दुसरी फवारणी करावी. या फवारणीच्या वेळी प्रती हेक्टरी फॉस्फोमिडॉन 85 डब्ल्यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू. एस.सी. 550 मिली अधिक कॉपर ऑक्झिक्लोराईड 50 डब्ल्यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायिन झेड 78, 75 डब्ल्यू.डी. पी. 1000 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे केल्यास पिकावर पडणाऱ्या रोगापासून आपण पिकाचे संरक्षण करू शकतो. अशा पद्धतीने आपण पिकाच्या लागवडीनंतर योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇