पुणे : Bhendi van… भारतातील जवळजवळ सर्वच राज्यात भेंडी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भेंडीची लागवड होते. भेंडीला वर्षभर बाजारात चांगली मागणी असल्यामुळे या पिकापासून चांगले उत्पन्न मिळवता येते.
भेंडी ही औषधी गुणांनी युक्त आहे. भेंडी मध्ये अ, ब, क इत्यादी जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असून फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम व सल्फर सारखी खनिज द्रव्ये ही भरपूर आहेत. आज आपण उपयुक्त अशा या भेंडीच्या महत्त्वाच्या व महाराष्ट्रासाठी शिफारशीत केलेल्या काही वाणाची माहिती घेणार आहोत.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 🌱
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
भेंडीचे चांगले उत्पादनक्षम सर्वात्तम वाण
फुले विमुक्ता : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे या ठिकाणाहून हा वाण विकसित करण्यात आला. हा भेंडीचा वाण लवकर काढणीस येणारा वाण आहे. जर फुले विमुक्त जातीच्या भेंडीची लागवड केली तर हेक्टरी 200 क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळणे शक्य आहे.
या जातीपासून मिळणारी भेंडी ही दर्जेदार असते व तिची प्रत देखील चांगली असते. महत्वाचे म्हणजे व्हायरस रोगास ही जात प्रतिकारक असून या रोगास बळी पडत नाही. या जातीची भेंडी हिरवी, सरळ व आकर्षक असते व बाजारभाव देखील चांगला मिळतो.
फुले उत्कर्षा : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून सन 2003 मध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आली असून शेतकरी बांधवांसाठी भेंडी लागवडीस खूप चांगला असा हा वाण आहे. या जातीपासून मिळणारी भेंडी हिरवी, सरळ व आकर्षक असते तसेच लांबीला आठ ते दहा सेंटीमीटर व निमुळती असते.
फुले उत्कर्षा जात ही हळद्या रोगास कमी प्रमाणात बळी पडते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका हेक्टर मध्ये सरासरी 150 ते 200 क्विंटल पर्यंत उत्पादन या जातीपासून मिळू शकते. ही भेंडीची जात खरीप व उन्हाळी लागवडीसाठी योग्य आहे.
परभणी क्रांती : भेंडीची ही जात देखील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची असून ही जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली असून भेंडीच्या पुसा सावनी जातीपेक्षा कणखर व केवडा या विषाणूजन्य रोगाला अधिक प्रमाणात प्रतिकारक अशी जात आहे. परभणी क्रांती जातीची भेंडी लवकर काढणीस येते. म्हणजे एकंदरीत लागवडीपासून 50 ते 55 दिवसात भेंडी तोडणीला येते.
या जातीची भेंडी कोवळी, हिरवी व आकाराने निमुळती आणि लांबीने सात ते दहा सेंटीमीटर असते. परंतु साठवणुकीत लवकर नरम अर्थात मऊ पडते. परभणी क्रांती जातीपासून हेक्टरी सरासरी 120 ते 140 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇