• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

bhuimug pik : भुईमुगाची अशा पद्धतीने करा लागवड ; उत्पादनात हेक्टरी 25 ते 30 टक्के होईल वाढ

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 26, 2022
in तंत्रज्ञान / हायटेक
0
bhuimug pik
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : भुईमुग (bhuimug pik) हे एक तेलबिया वर्गातील महत्वाचे पिक आहे. त्यामुळे गहू, हरभरा, मका, ज्वारी आदी पिकांइतकेच प्राधान्य भुईमुगाची लागवड करण्याला दिले जाते. भुईमुगाची लागवड करतांना कोण कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत व लागवडीनंतर काय काळजी घेतली पाहिजे, या विषयीची माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

भुईमुग हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील पीक असून खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिनही हंगामात या पिकाची लागवड केली जाते. भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते. मात्र पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे व फुलोरा अवस्थेदरम्यान या पिकाला दिवसाचे तापमान साधारणत: 24 ते 25 अंश सेल्सिअस लागते; अन्यथा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: 12 ते 15 सें.मी. एवढी असली पाहिजे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 🌱
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागून पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना अथवा वखराद्वारे काढताना आर्‍या तुटून शेंगा जमिनीत राहू शकतात. परिणामी उत्पादनात घट होवू शकते. भुईमुगाच्या लागवडीसाठी भुसभुशीत जमिनीची निवड करणे फायदेशिर ठरते. कारण भुसभुशीत जमिनीत हवा खेळती राहते, त्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आर्‍या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. तसेच शेवटच्या वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे 2 टन प्रतिएकर याप्रमाणे द्यावे. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.

या दरम्यान करा पेरणी

रब्बी हंगामात भुईमुगाची पेरणी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान करणे फायदेशिर असते. भुईमुगाची पेरणी करतांना उपट्या जातीसाठी 30/10 सें.मी. तर निमपसर्‍या जातीसाठी 30/15 सें.मी. पेरणीतील अंतर ठेवावे. तसेच भुईमुगाची पेरणी सपाट वाफा पद्धतीने करावयाची झाल्यास पेरणीयंत्राच्या साह्याने दोन ओळींतील अंतर 30 सेंमी व दोन रोपांतील अंतर 10 सेंमी ठेवावे. पेरणी पाच सेंमी खोलवर करावी.

Poorva

असे करा खताचे व्यवस्थापन

भुईमुगास नत्र व स्फुरद ही महत्त्वाची अन्नद्रव्ये आवश्यक असतात. 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 400 किलो जिप्सम असे प्रमाण ठेवावे. त्याचबरोबर गंधक व कॅल्शिअम ही दुय्यम अन्नद्रव्ये भुईमुगासाठी द्यावी लागतात. स्फुरदयुक्त खते सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे दिल्यास त्यामध्ये असलेल्या गंधकाचा भुईमुगासारख्या पिकास चांगला फायदा होतो. पेरणीच्या वेळी 200 किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे, तर उर्वरित 200 किलो जिप्सम हे आर्‍या सुटताना द्यावे. जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादन वाढते.

शेत तण विरहीत ठेवण्यासाठी करा हे काम

भुईमुगाचे पीक 45 दिवसांपर्यंत तणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या 15-20 दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या 10-12 दिवसांच्या अंतराने कराव्यात. 35-40 दिवसांनंतर आर्‍या सुटू लागल्यानंतर कोणतेही आंतरमशागतीचे काम करू नये. फक्त मोठे तण उपटून टाकावे म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल. तणनाशकाचा वापर करून निंदणी व दोन कोळपण्या दिल्या तर तणांचा चांगला बंदोबस्त होतो.

Sunshine Power Of Nutrients

असे करा पाणी व्यवस्थापन

भुईमुग पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 12 ते 13 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फुले येण्याच्या अवस्थेपासून 22-30 दिवस ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आर्‍या सुटण्याची अवस्था पेरणीपासून 40-45 दिवस, शेंगा पोसण्याची अवस्था पेरणीपासून 65-70 दिवस या वेळी पाण्याची पाळी चुकवू नये. आर्‍या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्यक आहे.

कीड व रोग नियंत्रण

मावा, फूलकिडे, तुडतुडे प्रादुर्भाव दिसताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, दुसरी फवारणी 15 दिवसांनंतर डायमिथोएट 500 मिली. प्रति 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी. पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी, टिक्का रोग नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. तांबेरा रोग नियंत्रणासाठी हेक्साकोनॅझोल 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. असे केल्यास भुईमुगाच्या उत्पादनात चांगली वाढ होवू शकते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Maka pik : मका पिकावर रोग येवू नये म्हणून असे करा व्यवस्थापन
  • Harbhara pik : हरभर्‍याचे विक्रमी उत्पादन वाढीसाठी असे करा व्यवस्थापन

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कीड व रोग नियंत्रणपाणी व्यवस्थापनभुईमुग पीकरब्बी हंगाम
Previous Post

PM Kisan 12th Installment : 12वा हप्ता अद्याप खात्यात आला नाही? ; लगेच करा ‘हे’ काम, अन्यथा होईल नुकसान

Next Post

pik karj : आता शेतकर्‍यांना सहज मिळणार पिक कर्ज ; वाचा सविस्तर बातमी

Next Post
pik karj

pik karj : आता शेतकर्‍यांना सहज मिळणार पिक कर्ज ; वाचा सविस्तर बातमी

ताज्या बातम्या

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.