• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

महाराष्ट्रावर पावसाचे नवे संकट! अरबी समुद्रावर शक्ती चक्रीवादळाचा धोका

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 3, 2025
in हवामान अंदाज
0
महाराष्ट्रावर पावसाचे नवे संकट! अरबी समुद्रावर शक्ती चक्रीवादळाचा धोका
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

 

मुंबई – बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असतानाच आता गुजरातजवळ अरबी समुद्रातही आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची तीव्रताही वाढत असल्याने वादळाची शक्यता दिसत आहे. येत्या 24 तासांत त्यामुळे हवामानात मोठे बदल दिसून येऊ शकतात. हा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्यास राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.

बंगालची खाडी आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे पट्टे तीव्र होत आहेत. त्यामुळे 4 ते 7 ऑक्टोबरदरम्यान हवामान अस्थिर राहणार असून महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ दिसेल. राज्यातून मान्सून माघारी फिरण्याची 5 ऑक्टोबर ही सामान्य तारीख आहे. मात्र, गुजरातमधील वादळामुळे राज्यावरील पावसाचे संकट आणखी काही काळ कायम राहू शकते.

ईशान्य अरबी समुद्रावर तीव्र झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळ शक्तिमध्ये रूपांतर झाले आहे. सध्या ते गुजरातमधील द्वारकेच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 250 किमी अंतरावर आहे. येत्या 24 तासांत ते पश्चिम-नैऋत्येकडे सरकून तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. त्यानंतर, ते पश्चिम-नैऋत्येकडे सरकत राहण्याची आणि 5 ऑक्टोबरपर्यंत उत्तर आणि लगतच्या मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रावर शक्ति चक्रीवादळाचे सावट

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तीव्र
उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा 4 ऑक्टोबर रोजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान पश्चिमी विक्षोभाचा परिणाम अधिक जाणवेल. त्यामुळे हवामानात मोठे बदल होऊन 6 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. महाराष्ट्रातही या बदलाचा परिणाम होत असून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. पाऊस सुरूच राहणार असल्याने यंदा राज्यात ऑक्टोबर हिट कमी प्रमाणात जाणवणार असून रात्री मात्र दमट वातावरणामुळे उकाडा वाढणार आहे. यंदा “ला निना”मुळे कडाक्याची थंडी पडेल, असा प्राथमिक अंदाज “आयएमडी”कडून व्यक्त करण्यात आला आहे.

ओडिशाच्या अंतर्गत भागात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा 3 ऑक्टोबर रोजी वायव्य-वायव्येकडे सरकला. आता तो ओडिशातील संबलपूरपासून 50 किमी नैऋत्येस असलेल्या अंतर्गत ओडिशा आणि लगतच्या छत्तीसगडवर केंद्रित झाला आहे.

10-12 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम
राज्यातून परतीचा पाऊस सुरू झाल्याचे हवामान विभागाने अजूनही स्पष्ट केलेले नाही. गेल्या आठवडाभरापासून मान्सूनचा परतीचा प्रवास अडकलेला आहे. आता विदर्भ आणि मराठवाड्यात 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस राहील, असा अंदाज आहे. गुजरातमधील हवामान प्रणालीच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

75 किमी वेगाने वारे; सावधानतेचा इशारा
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात हवामान अस्थिर आहे. किनारी भागात ताशी 65 ते 75 किमी वेगाने वारे वाहत आहेत. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या खाडीतील चक्रीवादळ किनारपट्टीवरील ओडीशा आणि आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, बिहारसह मध्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गुजरात आणि महाराष्ट्रावरही या वादळाचा परिणाम होणार असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे.

Rise N Shine

“पाऊसफुल्ल” सप्टेंबर ठरला विक्रमी
विक्रमी पाऊसफुल्ल” सप्टेंबरनंतर ऑक्टोबर महिन्यातही देशात अधिक पावसाचा अंदाज आहे. 1 जून ते 30 सप्टेंबरमध्ये या चार महिन्यात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यातील हा गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक पाऊस आहे. राज्यात यंदा 120 टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून जून ते सप्टेंबरमध्ये राज्यात 1189.4 मिमी पावसाची नोंद झाल्याचा हवामान विभागाने सांगितलंय. गेल्यावर्षी राज्यात 1252.1 मिमी पावसाची नोंद झाली असून 26 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्यांदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक 39 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर उत्तर-मध्य, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात 20 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

Jain Irrigation

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • आजपासून तीन दिवस पुन्हा मुसळधार; राज्यात 5 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा मुक्काम! “या” जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्टही.. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती
  • राज्यभरातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता; बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाब प्रणाली

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: बंगालच्या खाडीहवामान विभागा
Previous Post

भारतात दर तासाला एक शेतकरी आत्महत्या; केंद्राच्याच अहवालातूनच धक्कादायक वास्तव समोर; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

Next Post

रिटर्न मान्सून आठवडाभर खोळंबलेलाच.! राज्यातला पाऊस नेमका कधी थांबणार ते जाणून घ्या…

Next Post
रिटर्न मान्सून आठवडाभर खोळंबलेलाच.!

रिटर्न मान्सून आठवडाभर खोळंबलेलाच.! राज्यातला पाऊस नेमका कधी थांबणार ते जाणून घ्या...

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish