मुंबई : MSP Hike शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय झाला आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना ही मोठी भेट दिली आहे. तेलबिया, कापसासह अनेक पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) सरकारने मोठी वाढ केली आहे. भात, मका आणि भुईमूग यांसह अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने अनेक पिकांची एमएसपी वाढवली आहे. ही वाढ 2023-24 या आर्थिक वर्षातील खरीप पिकांसाठी करण्यात आली आहे. मोदी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, तूर डाळीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलचे लोकार्पण। Agroworld Youtube। 👇
https://youtu.be/S4CCOSr9G9Q/
धान, मका आणि भुईमूगाच्या एमएसपीमध्येही वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून त्यांना नवीन पिकाला चांगला भाव मिळू शकेल. शेतीचा वाढता खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कोणत्या पिकाचा MSP किती वाढला?
मंत्रिमंडळाने 2023-24 साठी उडीद डाळीचा एमएसपी प्रति क्विंटल 350 रुपयांनी वाढवून 6,950 रुपये प्रति क्विंटल केला आहे. धानाचा एमएसपी 143 रुपये प्रति क्विंटलने वाढवून 2,183 रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर मक्याचा एमएसपी 128 रुपये प्रति क्विंटलने वाढवण्यात आला आहे.
मूगाच्या एमएसपीमध्ये कमाल 803 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुगाच्या सरकारी खरेदीची एमएसपी आता 8,558 रुपये प्रति क्विंटलवर गेली आहे. तसेच तेलबियांमध्ये तिळीचा एमएसपी प्रति क्विंटल 805 रुपयांनी वाढवून 8,635 रुपये प्रति क्विंटल केला आहे. भूईमुगाचा एमएसपी 527 प्रति क्विंटलने वाढवून 6,377 रुपये प्रति क्विंटल केला आहे. सोयाबीनचा एमएसपी 300 प्रति क्विंटलने वाढवून 4,600 रुपये प्रति क्विंटल केला आहे.
एमएसपीमध्ये यंदा सर्वाधिक वाढ
मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल म्हणाले, की कृषी क्षेत्रात आम्ही वेळोवेळी सीएसीपीच्या (कमिशन फॉर अॅग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस) शिफारशींच्या आधारे एमएसपी निश्चित करत आहोत . गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा खरीप पिकांसाठी एमएसपीमध्ये झालेली वाढ सर्वाधिक आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आगामी हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांसाठी वाढीव MSP मंजूर केला आहे. हे पाऊल शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी फायदेशीर किंमत सुनिश्चित करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.