उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या राज्यातल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याच्या बहुतेक भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्या-परवा म्हणजे येत्या रविवारी, सोमवारी विदर्भात गारपीट होण्याचा, तर मंगळवारी किनारपट्टी वगळता उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. अशी गारपीट झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. फळबागांचंही नुकसान होण्याची शक्यता आहे.
पूर्व विदर्भापासून कोमोरीन तसंच कर्नाटक आणि अंतर्गत तामिळनाडूपर्यंत सध्या हवामानाचं कुंड पसरलेलं आहे. त्यामुळं सध्या विदर्भासह राज्यात आग्नेय दिशेने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. अशात रविवारपासून अरबी समुद्रावरूनही राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वाऱ्याच्या संयोगातून गारपीट, पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रभावाखाली 6 ते 11 एप्रिल दरम्यान विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. रविवारी वाशिम, यवतमाळमध्ये तर सोमवारी – वर्धा, चंद्रपूर आणि अमरावतीत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी – किनारपट्टीवगळता राज्यभरात हलक्या सरींची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रात 9 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता राहिल.
IMD नं जोरदार वाऱ्यांमुळे कच्ची घरं, भिंती आणि झोपड्यांचं नुकसान होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं या काळात शक्यतोवर घरातच राहा, खिडक्या आणि दरवाजे बंद करा आणि शक्य असल्यास प्रवास टाळा, असा सल्ला देण्यात आला आहे. जर तुम्ही वादळाच्या वेळी बाहेर असाल, तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मात्र, झाडाखाली आजिबात थांबू नका.
आयएमडीने काँक्रीटच्या मजल्यांना स्पर्श न करणं आणि जलकुंभांमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. वारा-वादळात इलेक्ट्रॉनिक उपकरणं अनप्लग करण्याचा आणि वादळाच्या वेळी वीजेवर चालणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- 🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..
- 🐐 अॅग्रोवर्ल्डतर्फे 18 सप्टेंबरला जळगावात एकदिवसीय कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप ठिकाण – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
- ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध होणार…
- ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस 18 मे (शनिवारी) रोजी उपलब्ध… (अवकाळी पाहता कदाचित हंगामातील शेवटची गाडी…)
- ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावात शनिवार (25 मार्चला) एक दिवशीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा