• Home
    • आमच्याविषयी
Agro World
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
Agro World
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेणखताचे महत्त्व : सेंद्रिय कर्ब उत्पादकता वाढीत शेण खताचे फायदे.. निमित्त बैल पोळा..!

शेणखताला अद्याप पर्याय नाहीच

Team Agroworld by Team Agroworld
August 26, 2022
in इतर
0
शेणखताचे महत्त्व

सौजन्य गुगल

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव : आज बैल पोळा..! पोळ्याला पशुधनाची पूजा केली जात आहे. मात्र, शेणखताचे महत्त्व, मजूर समस्येमुळे पशुधनाचा वापर व संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी शेण खताची उपलब्धता देखील कमी झाली आहे. तर दुसरीकडे रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब व तिचा पोत ढासळत असून जमिनी क्षारपड व चोपण होत आहेत. यामुळे उत्पादन खर्च वाढला तरी उत्पादकता कमीच होत आहे. तेव्हा यावर आजही जमिनीची सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवण्यासाठी तसेच उत्पादकता वाढीत प्रमुख पर्याय शेणखत हाच आहे.

रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत घसरत चालली आहे. त्यामुळे जमिनीची पोत सुधारावी, याकरिता शेतकरी शेणखताचा वापर करण्याकडे वळले आहेत. मात्र, पशुधनात होणाऱ्या घटीमुळे पर्यायी शेणखताचा वापर कमी होत आहे. ग्रामीण भागात पशुधन कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण होताना दिसून येत आहे. शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असून, या खताचा वापर शेतजमिनीत झाल्यास शेतजमिनीचा पोत सुधारते. दर्जेदार उत्पादनासाठी शेणखत फायदेशीरच आहे. तसेच मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे.

शेणखताचे महत्त्व

नियमित शेणखत वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती तसेच वहन देखील चांगल्या प्रकारे होते. बरेचसे शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळून निवांत राहतात. परंतु शेणखताबरोबरच इतर स्रोतांपासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा देखील वापर करावा लागतो. शेणखत हे जमिनीच्या आरोग्यासाठी एक प्रकारे पूरक म्हणून कार्य करते.

शेणखतामधून अन्नद्रव्यांचे मिळणारे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत फारच अत्यल्प असते. परंतु सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. परिणाम खुप चांगले दिसतात. त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यास मदत करणारे जिवाणू जसे ऍझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळवण्यास मदत करणारे जिवाणू इ. इतर सूक्ष्मजीवांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. गांडुळांचा जमिनीतील वावर वाढतो. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात. जमिनीतून वापरण्यात येणारे जैविक-कीड-रोगनाशके जसे ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसिलोमायसिस, बिव्हेरिया, मेटारायझियम आणि जैविक खते जसे ऍझोटोबॅक्टरसह इतर अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची वाढ नैसर्गिक पद्धतीने होण्यास मदत होते. जमिनीतील मुळांच्या कार्यक्षेत्रातील श्वसन वाढून मुळांद्वारे संश्लेषित करण्यात येणाऱ्या संजीवकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते. पांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी असते.

शेणखताचे फायदे

जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
जमिनीच्या सामू मध्ये अपेक्षित बदल होतो.
जमिनीतील गांडूळांचा वावर वाढतो.
पांढऱ्या मुळींची वाढ होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी राहते.
शेणखताचा वापर केल्यास उत्पादन चांगले येऊन उत्पादनात त्यात वाढ होते.

जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी

लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात, खड्ड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असे शेण चांगले कुजलेले असणे गरजेचे आहे. शेणाखतामध्ये हुमणी, कॉकचाफर भुंगे, नारळावरील गेंड्या भुंग्याच्या अळ्या इत्यादी किडींच्या अळी आढळून येते. ज्यास बरेचसे शेतकरी ‘शेणकिडे’ म्हणून संबोधतात. अशा अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील मुख्य पिकास नुकसान पोचवितात.

भुंगेरावर्गीय किडींची मादी मे किंवा जून महिन्यात शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी देतात. त्यामुळे शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा इत्यादी मे महिन्याच्या सुरवातीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये होणारा प्रसार थांबविता येईल. उन्हाळ्याच्या दिवसांत चाऱ्याची कमतरता असताना शेतकरी मोकळ्या शेतात जनावरे चरण्यास सोडतात त्यामुळे शेतात त्यांचे शेण शेतात विखुरलेल्या स्वरूपात पडते.

मे महिन्याच्या शेवटी अथवा जून महिन्याच्या सुरवातीला पडणाऱ्या पावसाबरोबरच हुमणीच्या मादी भुंगेऱ्यांकडून अशा कुजणाऱ्या शेणात अंडी देतात. त्यामुळे अशा शेतात पुढील हंगामात घेतले जाणारे पीक हे अळीद्वारे प्रादुर्भावग्रस्त होते. काही शेतात तर शेळ्या-मेंढ्या ज्या गोलाकार रिंगणात बसविल्या जातात, त्याच भागात पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. बऱ्याच वेळा शेतातील निंदण्यात येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरले जाते. अशा तणांच्या मुळास लटकलेली शेतातील माती रोगकारक बीजाणूंसह शेणाबरोबर खड्ड्यात जाते. त्या ठिकाणी इतर सेंद्रिय पदार्थांबरोबरवाढते. अशा वेळेस शेणखतास जैविक प्रक्रिया करून घेणे आवश्यक ठरते.

तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
आला पोळा कपाशी सांभाळा … पिकांवर का आवश्यक आहे श्रावणी अमावस्या फवारणी, जाणून घ्या अमावस्येचे पीक व्यवस्थापन …
यंदा मुबलक अन्नधान्य उत्पादन; 5 वर्षांतील उच्चांक! जाणून घ्या ऊस, कापूस, कडधान्य, तेलबियांचा अंदाज…

Tags: जमिनीची सुपीकताबैल पोळारासायनिक खतशेणखताचे फायदेशेणखताचे महत्त्वसेंद्रिय कर्ब
Previous Post

नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

नायगारा फॉल्स : 10,000 वर्षांपूर्वी निसर्गाला पडलेले अद्भुत स्वप्न अन् त्यासंदर्भातील रंजक प्रेमकथा, दंतकथा जाणून घ्या

Next Post
नायगारा फॉल्स

नायगारा फॉल्स : 10,000 वर्षांपूर्वी निसर्गाला पडलेले अद्भुत स्वप्न अन् त्यासंदर्भातील रंजक प्रेमकथा, दंतकथा जाणून घ्या

ताज्या बातम्या

केळी

‘या’ बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक

by Team Agro World
March 25, 2023
0

Weather Alert

Weather Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

by Team Agro World
March 24, 2023
0

सोयाबीन

सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे झाली ; वाचा सोयाबीनचे बाजारभाव

by Team Agro World
March 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

by Team Agro World
March 23, 2023
0

या प्रयोगाशील शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात लावला नवीन वाणाचा शोध 

या प्रयोगाशील शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात लावला नवीन वाणाचा शोध 

by Team Agro World
March 22, 2023
0

केळी निर्यात

भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

by Team Agro World
March 22, 2023
0

कांद्याच्या दरात

वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या दरात असा बदल ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

by Team Agro World
March 21, 2023
0

दुग्धव्यवसाय

ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावात शनिवार (25 मार्चला) एक दिवशीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा

by Team Agro World
March 20, 2023
0

ॲग्रोवर्ल्ड

आता ॲग्रोवर्ल्डने उपलब्ध केली उच्च प्रतीची नमो बायोप्लांटची केळीची टिशू कल्चर रोपे

by Team Agro World
March 20, 2023
0

विषमुक्त उत्पादनाला चालना ; या रोपवाटिका योजनेचा असा घ्या लाभ

विषमुक्त उत्पादनाला चालना ; या रोपवाटिका योजनेचा असा घ्या लाभ

by Team Agro World
March 19, 2023
0

तांत्रिक

केळी निर्यात

भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

by Team Agro World
March 22, 2023
0

जरबेरा फुल

हरितगृहातील जरबेरा फुल पिकाची लागवड व खत व्यवस्थापन

by Team Agro World
March 1, 2023
0

Bharat- Chile

Bharat- Chile : कृषी सहकार्यासाठी भारत-चिली देशांत सामंजस्य करार?

by Team Agro World
February 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : 300 गाठींवर स्थिरावणार यंदाचे उत्पादन ; जाणून घ्या… नेमकी परिस्थिती काय ?

by Team Agro World
January 16, 2023
0

जगाच्या पाठीवर

केळी

‘या’ बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक

by Team Agro World
March 25, 2023
0

Weather Alert

Weather Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

by Team Agro World
March 24, 2023
0

सोयाबीन

सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे झाली ; वाचा सोयाबीनचे बाजारभाव

by Team Agro World
March 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

by Team Agro World
March 23, 2023
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

WhatsApp Group