भारतीय हवामान खात्यानं (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या हवेची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढून शुक्रवारपासून पुन्हा चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचा अंदाज आहे.
दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. त्यामुळं पाच ते आठ एप्रिल दरम्यान उत्तर व मध्य महाराष्ट्रात, सहा ते आठ एप्रिलदरम्यान कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात पुढील पाच दिवस दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. सात आणि आठ तारखेला हलका पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. तर मुंबईत मात्र उकाडा वाढणार आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी 38 ते 40 अंशाच्या दरम्यान राहील. मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होऊन रात्रीही उकाडा जाणवू शकतो. मंगळवारी संपूर्ण विदर्भासह जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड आणि बीडमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवले गेले.
- (no title)
- (no title)
- जनावरांना हिवाळ्यात होणारे संसर्गजन्य रोग व घ्यावयाची काळजी
- दुग्धव्यवसाय एकदिवसीय कार्यशाळा कार्यक्रमपत्रिका – अॅग्रोवर्ल्ड व आत्मातर्फे 23 ऑक्टोबरला नाशिकमध्ये एकदिवसीय सशुल्क दुग्धव्यवसाय कार्यशाळा; प्रवेश मर्यादित.. 🐮
- धान लागवड तंत्रज्ञान
- सततचे ढगाळ हवामान व गायब झालेली थंडीमुळे रब्बीवर होतोय प्रतिकूल परिणाम
- …आता शेती विकत घेण्यासाठी मिळणार अनुदान
- ‘अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘महा’ वादळाची तीव्रता कमी होणार !