गणरायाच्या स्वागताला पावसाची सलामी!

मुंबई: उत्तर महाराष्ट्रात आज हलका ते मध्यम पाऊस; राज्यातील 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे उलटफेर जाणवत आहेत. गणरायाच्या आगमनाला वरुणराजा बरसणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात रविवारी पावसाचा जोर राहिला. नंदुरबार भागात अतिवृष्टीचा रेड अलर्ट होता. धुळ्यात ताशी 40-50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. नाशिक, जळगावला देखील यलो अलर्ट होता. आता गणरायाच्या आगमनाला हलका ते मध्यम पाऊस होईल. नंदुरबार आणि नाशिक घाटमाथा भागात सोमवारी यलो अलर्ट असेल.

महाराष्ट्रातील हवामानात गणरायाच्या आगमनालाच मोठे बदल जाणवत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही भागात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात दुष्काळ जाहीर होणार?

कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रीय

कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रीय असून बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान राहील. तसेच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. रविवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात ऑरेंज अलर्ट होता. आता सोमवारी कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस होईल.

मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर तुलनेने कमी

मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर तुलनेने कमी आहे. पुणे आणि अहिल्यानगर परिसरात रविवारी पावसाने हजेरी लावली. सोमवारी या भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही. मात्र, पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर भागात हलका ते मध्यम पाऊस होईल.

विदर्भात 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट

विदर्भातील काही जिल्ह्यांत गेले दोन दिवस पावसाने हजेरी लावली. आता 14 सप्टेंबरपासून पुन्हा हवामानात मोठ्या बदलांची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता नाही.

मराठवाड्यात पावसाची पुन्हा उघडीप

मराठवाड्यात गेल्या काही काळापासून पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या दोन दिवसांत हवापालट झाल्याने काही भागात तुरळक पाऊस झाला होता. मात्र, आता पुन्हा हवामानात मोठे उलटफेर जाणवत असून पाऊस पुन्हा उघडीप घेणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा अलर्ट नाही. मात्र, काही ठिकाणी तुरळक हलक्या पावसाची शक्यता आहे.

15 सप्टेंबरपासून ओसरणार पाऊस

एकंदरीत, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, आता पुन्हा एल-निनोचे संकट तीव्र होण्याची शक्यता आहे. सोमवारी 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असला तरी त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे. विशेष म्हणजे 15 सप्टेंबरपासून पुढील काही दिवस कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

Jain Irrigation

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *