मुंबई (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सूचनेवरून अनिल पाटील, मंत्री मदत व पुनर्वसरे यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, जिल्ह्यातील पिक विमा योजना व पुनर्रचित हवामान अधिकारी फळ पीक योजना सन 2022-23 विषयांबाबत जिल्हाअधिकारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्या भागात खंडाने पडलेला पाऊस, सध्याची पीक परिस्थिती व पिक विमा या विषयावर चर्चा झाली. तसेच या बैठकीत उपस्थित शेतकरी यांनी जिल्ह्यात झालेल्या पर्जन्यमान व पीक परिस्थितीबाबत मंत्री अनिल पाटील यांना माहिती देऊन पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने सदर रक्कम तातडीने मिळाली याबाबत आग्रही मागणी केली. या संदर्भात मंत्री अनिल पाटील यांनी तातडीने राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवर याबाबत माहिती देऊन या संदर्भात तत्वे मंत्रालयात बैठक घेण्याबाबत विनंती केली होती.
त्यानुषंगाने दिनांक मंत्रालयात राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली वर नमूद केलेल्या विषयाची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीसाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्यासह निश्चित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी आयुक्त, पीक विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात पावसाने 21 दिवसांपेक्षा अधिक खंड दिला असल्याने पीक विम्याची 25% शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली. या विषयाबाबत बैठकी सविस्तर चर्चा झाली.
रायझामिका कोणत्या खतांसोबत देणे जास्त फायदेशीर
जळगाव जिल्ह्यातील एकूण 27 मंडळात 21 दिवसांपेक्षा जास्त दिवसाचा खंड असल्याने त्या भागातील पिकाचे उत्पन्न कमी येणार असल्याबाबत चर्चा झाली व संबंधित शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरत असल्याने जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, भालोद, बामणोद, रावेर, खानापुर, निंभोरे, अंतुर्ली, अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरुड, वारडे, बहाड, चाळीसगाव, खडकी, हातले बु., तळेगाव, भडगाव, कजगाव, कोळगाव, धरणगाव या मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीन पीक विम्याची रक्कम दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश सुद्धा यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मधील शास्त्रज्ञ यांनी गुगल मॅपिंगच्या डाटाची पडताळणी करून या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाच्या लागवडीखाली एकूण क्षेत्रात अहवाल 10 दिवसात सदर सादर करून पात्र शेतकऱ्यांना केळी पिक विम्याची रक्कम वितरित करण्याबाबत आदेश दिले.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कापसाला या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर
- अतिवृष्टी, पूरामुळे जळगाव जिल्ह्यात 4 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान