मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाने अॅग्रीस्टॅक या डिजीटल उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक अंतर्गत डिजीटल शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी लागणार आहे.

शेतकऱ्यांना फार्मर आयडी साठी नोंदणी करण्यासाठी अॅग्रीस्टॅक पोर्टल किंवा कृषी सेवा केंद्र वर जाऊन आवश्यक असलेल्या कागदपत्रांसोबत अर्ज करावा लागेल. फार्मर आयडीची नोंदणी कुठे होणार ?, कोणती कागदपत्रे लागणार ? ही माहिती आपण जाणून घेणार आहोत.
या योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी लागणार?
शेतकऱ्यांना विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. या ओळखपत्राचा उपयोग मुख्यतः पुढील योजनांमध्ये होणार आहे:
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना
पीक विमा योजना
कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना
थेट लाभ हस्तांतरण योजना
पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठी
जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नाही, तर त्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या लाभाची गॅरंटी मिळवण्यासाठी फार्मर आयडी काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
फार्मर आयडीसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक?
केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतीविषयक विविध योजना चालवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे. हे ओळखपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कागदपत्रं लागतील, ज्या खालीलप्रमाणे आहेत:
आधार कार्ड
सात बारा उतारा
गट क्रमांक
नमुना 8 अ खाते उतारा क्रमांक
मोबाईल क्रमांक
लाभार्थी शेतकरी नोंदणीवेळी उपस्थित असणे
फार्मर आयडी नोंदणीसाठी शेतकरी तलाठी कार्यालय, कृषी सहाय्यक किंवा सीएससी केंद्र (कॉमन सर्विस सेंटर) यांच्या मदतीने नोंदणी करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल.
पीएम किसन योजनेसाठीही फार्मर आयडी आवश्यक
शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 19 व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास त्यांना फार्मर आयडी मिळवणं आवश्यक आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. त्यामुळे, आगामी 19 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्राची नोंदणी पूर्ण करणं आवश्यक आहे.
काय आहे अॅग्रीस्टॅक प्रकल्प ?
अॅग्रीस्टॅक प्रकल्प एक डिजीटल फाऊंडेशन आहे, जो शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डेटा आणि डिजीटल सेवांचा वापर करून राबवला जातो. या प्रकल्पात शेतकऱ्यांना डिजीटल ओळखपत्र दिलं जाईल, ज्यामध्ये त्यांच्या शेतीसंदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती सामाविष्ट असेल. अॅग्रीस्टॅक प्रकल्प विशेषतः बीड जिल्ह्यात राबवला जात आहे, आणि यामध्ये नोंदणीचे तीन मुख्य संच असतील.
1. आधार संलग्न नोंदणी संच – शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या शेतांचा आधाराशी संलग्न असलेला डेटा.
2. भूसंदर्भिकृत व्याप्ती दर्शवणारा गाव नकाशांचा नोंदणी संच – गाव आणि शेताचे भूसंस्कृतीतून संबंधित नकाशे.
3. हंगामी पिकांचा नोंदणी संच – शेतकऱ्यांनी घेतलेल्या हंगामी पिकांची नोंदणी.
या प्रकल्पाचा मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांची ओळख सुनिश्चित करणे आणि त्यांना विविध योजनांचा लाभ सुलभपणे पोहोचवणे आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇