शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताची ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी थोडा वेळ काढून शेवटपर्यंत वाचा. स्वस्तात मिळतो, आकर्षक दिसतो, उग्र वास असतो म्हणून जर तुम्ही भल्या मोठ्ठया पाकळ्यांचा चायनीज लसूण विकत घेत असाल, तर सावधान!
चायनीज लसूण खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. सिनेटर रिक स्कॉट यांच्या तक्रारीवरून अमेरिकेतील जो बिडेन सरकारनं चीनमध्ये पिकवल्या जाणाऱ्या लसणाच्या अन्न सुरक्षिततेची गुप्त चौकशी केली होती. त्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
घाणेरड्या मलनिस्सारण सांडपाण्यात चीनी लसणाची लागवड केली जाते, ज्यामध्ये मानवी कचरा असतो. नंतर त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी हानिकारक क्लोरीन वापरून ब्लीच केलं जातं. चिनी लसणावर मिथाइल ब्रोमाइड असलेल्या बुरशीनाशकानं उपचार केले जातात, ज्यामुळे बुरशीची वाढ सहा महिने थांबते.
नेहमीच्या लसणात असलेलं, रक्तदाब नियंत्रित करणारं, प्रतिकारशक्ती वाढवणारं, नैसर्गिक प्रतिजैविक एलिसिन नावाचं मूलभूत संयुग चायनीज लसणात नसतं. भारतीय लसणाची किंमत जास्त असल्यानं शेजारील नेपाळ आणि बांगलादेशमार्गे चिनी लसणाची भारतात तस्करी होते.
वास्तविक, चीन हा जगातील सर्वात मोठा लसूण उत्पादक देश आहे. तरीही अनेक देशात चिनी लसूण आयात व विक्रीवर बंदी आहे. विशेष म्हणजे भारतातही 2014 पूर्वी चिनी लसणाच्या विक्रीवर बंदी घातली गेली होती.
- अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱
- केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !
- AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार
- खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..
- अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…
- Easter Island : रहस्यमय आयलंड.. जिथे आहेत 30 फूट उंच मुर्त्या
- देशात 105% अधिक पाऊस ; IMD चा पहिला अंदाज जाहीर !
- कापूस पिकाचे क्षेत्र कमी होणार – कापूस शेतकरी पर्यायी पिकाच्या शोधात !!
- यंदा महाराष्ट्र भिजणार ? ; काय सांगतो स्कायमेटचा ‘मान्सून 2025’ चा अंदाज
- अस्सल देवगड हापूस (ॲग्रोवर्ल्ड) प्रतीक्षा संपली