• Home
    • आमच्याविषयी
Agro World
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
Agro World
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Chara Tanchai : ‘या’ तंत्राचा वापर करून चारा टंचाई करा दूर

कमी जागा, वेळ आणि पाण्यात मिळेल पौष्टीक चारा; दुग्ध उत्पादनात होईल वाढ

Team Agro World by Team Agro World
January 25, 2023
in पशुसंवर्धन
0
Chara Tanchai
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Chara Tanchai… शेतीसोबत पशुपालन हा पूर्वापारपासून चालत आलेला जोडधंदा आहे. शेती उत्पादन निघाल्यानंतर पिकाचे उरणारे अवशेष चारा म्हणून वापरले जातात. त्यामुळे शेतकर्‍यांकडून शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाला प्रथम प्राधान्य दिले जाते. मात्र, रासायनिक खतांच्या वापर, पाण्यावर अवलंबून असलेली शेती, कमी अधिक पावसामुळे पिकांचे होणारे नुकसान या सारख्या प्रकारांमुळे चारा मिळणे कठीण झाले आहे, परिणामी जनावरांची प्रकृती खालावून दुग्ध उत्पादन घटत आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका तंत्रज्ञानाविषयी सांगणार आहोत. ज्याचा वापर करुन पशुपालक शेतकरी कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यात हिरवा आणि पौष्टीक चार्‍याचे उत्पादन घेवू शकतात. चला तर मग जाणून घेवूया… काय आहे हे तंत्रज्ञान.., कसा केला जातो वापर… आणि फायदे काय?

शेती मालाचे उत्पादन वाढावे यासाठी जसे पिकांना खते वगैरे देणे गरजेचे आहे, तसेच जनावरांची दुध देण्याची क्षमता वाढावी, यासाठी त्यांना हिरवा, पैष्टीक चारा मिळणे गरजेचे आहे. राज्यातील बर्‍याच भागात शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने जनावरांना पावसाळ्यातच हिरवा चारा उपलब्ध असतो. तर उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे हिरवा चारा उपलब्ध न झाल्याने जनावरांना कुट्टी, वाळलेले गवत यासारखा सुका चारा खायला मिळतो. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना चारा विकात घ्यावा लागतो. मात्र, या सर्वांवर हायड्रोपोनिक तंत्र उत्तम पर्याय ठरत आहे.

कमी जागेत अधिक चारा

हायड्रोपोनिक तंत्राद्वारे कमी जागेत, कमी पाण्यात व कमी वेळेत पौष्टिक हिरवा चार्‍याचे उत्पादन घेता येते. त्यासाठी सर्वात आधी आसरा तयार करणे गरजेचे असते. शेड तयार करतांना त्यामधील तापमान, आद्रता नियंत्रित ठेवता येईल याची काळजी घ्यावी, शेड बनवण्यासाठी बांबू, लाकूड, लोखंडी पाईप, शेडनेटचे कापड किंवा जुन्या साड्यांचा वापर करू शकतो. चारा निर्मिती करतांना स्वयंचलित सूक्ष्मसिंचनाद्वारे किंवा पंपाद्वारे बाहेरील वातावरणानुसार ठरावीक कालावधीमध्ये पाणी मारावे लागते.

Planto

अशी करा बियाण प्रक्रिया

हायड्रोपोनिक पद्धतीने चारा लागवड करतांना मका, गहू, बाजरी यासारखे बियाणे वापरले जाते. बियाणे निवड करतांना ते चांगल्या प्रतीचे, स्वच्छ, कीडमुक्त, प्रक्रिया न केलेले, चांगली उगवण क्षमता असलेले असावे. उगवण प्रक्रिया वेगाने होण्यासाठी मका बियाणे 4 ते 5 तास पाण्यात चांगले भिजवावे. त्यानंतर 1 ते 2 दिवस गोणपाटात दडपून ठेवावे. असे केल्यास बियाण्याला कोंब फुटतात. कोंब आलेले बियाणे ट्रेमध्ये स्थलांतरित करावे. चारा निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ट्रे निर्जंतुक करणे महत्वाचे आहे, जेणेकरून ट्रेमध्ये बुरशीची वाढ होणार नाही.

अशी आहे चारा उत्पादन पद्धत

चारा लागवड करतांना प्रति एक मीटर वर्ग ट्रे मध्ये 6 ते 8 किलो बियाणे वापरावे. बियाणे पेरतांना सुटसुटीत पेरावे, जास्त दाट झाल्यास त्यास बुरशी लागून उत्पादन घटू शकते. ट्रे मधील बियाण्यांना 1 ते 2 दिवसानंतर कोंब फुटण्यास आणि पुढील 2 ते 3 दिवसांनी मुळांची वाढ होण्यास सुरवात होते. साधारणतः सात ते दहा दिवसामध्ये पिकाची काढणी करणे आवश्यक आहे.

हिरव्या चार्‍याची वाढ होताना रोपांमध्ये पाण्याची वाढ होते, तर शुष्क पदार्थ म्हणजेच एकूण अन्नद्रव्यांची घट होते. एक किलो मका बियाणांपासून 7 ते 10 दिवसांत 8 ते 10 किलो हिरवा चारा तयार होतो. बियाणांचा दर्जा व प्रकारानुसार रोपांची 10 ते 30 सेंमी उंचीपर्यंत वाढ होते. बियाणांमध्ये असलेल्या स्टार्चचा वापर करून रोपे मोठी होतात. त्यामुळे शुष्क पदार्थांचे प्रमाण कमी होते, पाणी शोषले जाते. प्रथिने व तंतुमय पदार्थ यांचे प्रमाण वाढते.

NIrmal Seeds

असे आहेत चारा निर्मितीचे फायदे

हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे चारा निर्मिती करतांना कमी जागा व पाणी लागते. शिवाय मातीची आवश्यकता नसल्याने अवघ्या 8 ते 10 दिवसात चारा उपलब्ध होतो. शेतामध्ये चारा तयार होण्यासाठी 45 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो. एक किलो बियाण्यापासून 7 ते 8 किलो चारा तयार होतो. मोड आल्यामुळे चार्‍यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. दुष्काळी भागांत तसेच अल्पभुधारक शेतकर्‍यांना हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी हे तंत्रज्ञान मोठे फायद्याचे आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • PM Kisan Sanman Nidhi Yojana : 13व्या हप्त्याचा लाभ घ्यायचाय? मग त्वरित करा ‘ही’ दोन कामे
  • Havaman Andaj : सावधान… या भागात पाऊस व गारपीटीचीही शक्यता..
Tags: चारा टंचाईचारा लागवडदुग्ध उत्पादनपशुपालक शेतकरीहायड्रोपोनिक तंत्र
Previous Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post

Krushi Yantrikikaran : कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 56 कोटींचा निधीला मंजूरी

Next Post
Krushi Yantrikikaran

Krushi Yantrikikaran : कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 56 कोटींचा निधीला मंजूरी

ताज्या बातम्या

केळी

‘या’ बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक

by Team Agro World
March 25, 2023
0

Weather Alert

Weather Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

by Team Agro World
March 24, 2023
0

सोयाबीन

सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे झाली ; वाचा सोयाबीनचे बाजारभाव

by Team Agro World
March 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

by Team Agro World
March 23, 2023
0

या प्रयोगाशील शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात लावला नवीन वाणाचा शोध 

या प्रयोगाशील शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात लावला नवीन वाणाचा शोध 

by Team Agro World
March 22, 2023
0

केळी निर्यात

भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

by Team Agro World
March 22, 2023
0

कांद्याच्या दरात

वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या दरात असा बदल ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

by Team Agro World
March 21, 2023
0

दुग्धव्यवसाय

ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावात शनिवार (25 मार्चला) एक दिवशीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा

by Team Agro World
March 20, 2023
0

ॲग्रोवर्ल्ड

आता ॲग्रोवर्ल्डने उपलब्ध केली उच्च प्रतीची नमो बायोप्लांटची केळीची टिशू कल्चर रोपे

by Team Agro World
March 20, 2023
0

विषमुक्त उत्पादनाला चालना ; या रोपवाटिका योजनेचा असा घ्या लाभ

विषमुक्त उत्पादनाला चालना ; या रोपवाटिका योजनेचा असा घ्या लाभ

by Team Agro World
March 19, 2023
0

तांत्रिक

केळी निर्यात

भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

by Team Agro World
March 22, 2023
0

जरबेरा फुल

हरितगृहातील जरबेरा फुल पिकाची लागवड व खत व्यवस्थापन

by Team Agro World
March 1, 2023
0

Bharat- Chile

Bharat- Chile : कृषी सहकार्यासाठी भारत-चिली देशांत सामंजस्य करार?

by Team Agro World
February 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : 300 गाठींवर स्थिरावणार यंदाचे उत्पादन ; जाणून घ्या… नेमकी परिस्थिती काय ?

by Team Agro World
January 16, 2023
0

जगाच्या पाठीवर

केळी

‘या’ बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक

by Team Agro World
March 25, 2023
0

Weather Alert

Weather Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

by Team Agro World
March 24, 2023
0

सोयाबीन

सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे झाली ; वाचा सोयाबीनचे बाजारभाव

by Team Agro World
March 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

by Team Agro World
March 23, 2023
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

WhatsApp Group