• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

एकात्मिक शेतीची कास भाग – 2

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 10, 2023
in इतर
0
एकात्मिक शेती
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

विक्रम पाटील
एकात्मिक शेतीत गाई, गुरे, म्हशी, शेळ्या, कोंबड्या, घोडा, कुत्रा यांनी शेतकर्‍यांचे अंगण समृद्ध असते. त्यांच्या अस्तित्वाने शेती रसरशीत वाटते. एकात्मिक शेतीचा तो अपरिहार्य भाग आहे. त्यांचे एक स्वतंत्र अर्थशास्त्र, नैसर्गिक महत्व आणि सौंदर्यशास्त्र असते. एकात्मिक शेतीतील या महत्त्वाच्या कडीकडे आपले दुर्लक्ष झालेले आहे ते परवडणारे नाही. शेती जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. शेती शाश्वत राखण्यात या गोवंशाने आपली भूमिका आजतागायत उत्तम साकारलेली आहे. ते महत्त्व जाणून घेतले आणि आपणात थोडे बदल केले तर आजही त्यांचे महत्त्व आहेच. त्यामुळे आजच्या या भागात आपण याचे महत्व जाणून घेणार आहोत. त्यासाठी सविस्तर लेख वाचणे गरजेचे आहे.

प्रत्येक शेतकर्‍याच्या गोठ्यात जातिवंत गाई आणि वळू असायचा. त्यांच्या गोपालनातूनच शेतीसाठी उपयुक्त बैल जोडी, शेणमूत्र, दूध- दुभते निरंतर मिळत असे. या सार्‍यात अलीकडे अमुलाग्र बदल झाला. प्रथम मोटरसायकल आली नंतर ट्रॅक्टर आला आणि आता तर संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा आलेल्या आहेत. जसजसे यांत्रिकीकरण वाढत गेले तसतसे हळूहळू शेतातील बैल जोडीचा वापर कमी कमी होत गेला आणि आज जवळपास बंद झालाय. बैलगाडी ही बर्‍याच शेतकर्‍यांकडे नाही. गाईंचे संगोपन म्हणूनच कमी होत होत आजची अवस्था आली आहे. केवळ दुग्धोत्पादन या हेतूने गाय किंवा म्हशींचे पालन काही शेतकरी करतात. त्यासाठी कुटुंबातील सार्‍यांचा हातभार आणि मजुरांचेही सहकार्य आवश्यक आहे तरच दोन पैसे हाती लागतात. सबब असे सार्‍यांचे सहकार्य नाही आणि पैसे हाती लागत नसल्यास गुरे पाळणे बंद होते. पण गुरे नसल्यामुळे शेतातील कर्ब आपोआपच कमी होत चाललेले आहे हे लक्षात आले आहे, तीच खरी गुरांची एकात्मिक शेतीतील महत्त्वाची भूमिका आहे.

संत नामदेव सांगून गेलेत
व्यावसायी चित्त ठेवुन कृपण
लाभाचे चिंतन सर्व काळ ।।
यापरि अखंड स्वहित विचारण
करिजे ते मनन सत्वशीळ ।।

म्हणजे आपल्या व्यवसायात आपण निरंतर एकचित्त होऊन सतत लाभाचा, स्वहिताचा विचार केला पाहिजे. तेच मनन केले पाहिजे. गुरांना लागणारा चारा हा शेतातील उपउत्पादन असते. जसे ज्वारी, बाजरी, मका, गहू, तूर, भुईमूग, ऊस, केळी या आणि अशा बर्‍याच पिकांचा पाला, पाचोळा, फांद्या, खोड, मुळे, कंद हे दुय्यम अवशेष हे गुरांचे खाद्य असते. शेतातील प्रमुख पीकाबरोबर हे उपदान आपोआप पदरात पडतेच. शेताच्या बांधावरील अंजन वृक्षासारख्या झाडांचा पाला दुष्काळी वर्षात चारा पुरवतो. शेळ्या, मेंढ्या तर हिरवा किंवा वाळलेला वनस्पतींचा कोणताही अवशेष (अर्थात लाकूड नको), खाद्य म्हणून स्वीकारतात. बहुतांश सारीच गवते त्यात दुधी, पवना, हरळी, लव्हाळी, कुसळी, बांबू, घास गवत, हत्ती गवत हेही गुरांचा चारा म्हणून उपयोगी ठरतात.

शेतात उगवणारे बांधावर असणारे बरेच वेल चारा म्हणून पशुंना उपयोगी ठरतात. आताशा मोठ्या झाडांवर चढून पाला काढणे, गुरे बांधावर चारणे, गुरे शेतात चारणे अशा बाबी बंद झाल्यात. परंतु अडीअडचणीच्या वेळी हे पर्याय अद्याप उपलब्ध आहेतच. आपल्या शेतातील आणि शिवारातील या उपउत्पादनात सहज वर्षभर जगतील एवढी पशुसंपदा प्रत्येक शेतकर्‍यांनी पाळली पाहिजे. त्यांचे उत्तम संगोपन केले पाहिजे. मात्र या जिवंत संपत्तीस पोटच्या लेकरासारखे सांभाळावे लागते. त्यांना वेळेवर चारा – पाणी, आवश्यक तो सकस आहार द्यावा लागतो. नित्यनेमाने वेळोवेळी शेणमुत्र आवरावे लागते.गोठा साफ स्वच्छ करावा लागतो. त्यासाठी मजूर मिळणे अवघड आहे, मिळाल्यास आर्थिक रीतीने ते व्यवहारात बसवावे लागेल. चार-सहा गुरांसाठी मजूर परवडतही नाही.

कापसावर मररोगाचे संकट; असे करा उपाय
https://eagroworld.in/cotton-blight-crisis-do-so-solution/

अशावेळी कुटुंबातील किमान दोन व्यक्ती या कामांसाठी गरजेनुसार अल्प वेळ उपलब्ध असल्या पाहिजेत. म्हणजे एक व्यक्ती बाहेरगावी गेल्यास किंवा इतर कामात गुंतल्यास गुरांची आणि गोठ्याची आबाळ टळते आणि गुरांची सोय वेळेवर होते. घरात एकच व्यक्ती गुरांची बडदास्त ठेवत असल्यास पर्याय म्हणून गोठ्याचा आपला शेजारी, शेताचा शेजारी प्रसंगी उपलब्ध असला पाहिजे. गुरांना लसीकरण करणे, गुरांविषयी आवश्यक तो सल्ला प्राप्त करणे, गुरे आजारी पडल्यास किंवा माजावर आल्यास निष्णात पशुवैद्यकाची गरज असते. पशुपवैद्यक योग्य अर्हताधारक आणि सेवाभावी वृत्तीचा असणे महत्त्वाचे आहे.

Ajeet Seeds

गोपालनाची उपयुक्तता आणि गरज

गोपालनाची उपयुक्तता आणि गरज काय हा महत्त्वाचा विषय आहे. शेतातील पिकांच्या दुय्यम अवशेषांची कमी वेळेत कमी खर्चात कशी विल्हेवाट लावावी हा मोठाच प्रश्न आहे. प्रतिवर्षी डिसेंबर – जानेवारीत देशाच्या राजधानीस दिल्लीस गहू तांदूळ पिकांच्या अवशेषांच्या जळण्यामुळे प्रदूषणाच्या गंभीर सामना करावा लागतो. ती जागतिक बातमी आहे. तोच प्रश्न कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्राच्या शेतीत आहे. महाराष्ट्रातील समस्या पर्यावरणाची नसेलही परंतु या अवशेषांची विल्हेवाट लावून दुसरे पीक घेताना शेती तयार करण्याची समस्या आहे. वर्षभरात दोन-तीन पिकं घ्यायची तर या अवशेषांची विल्हेवाट लावायला वेळ कमी पडतो.

खर्च वाचवायचा तर या अवशेषांना जाळणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. पण त्यामुळे मातीतील सेंद्रिय दिवसेंदिवस कमी कमी होत जाणार. मातीतील कर्ब संपणार. शिवाय जमिनीच्या ज्या भागावर हे अवशेष जाळल्या जातात तेवढ्या भागावरील उपयुक्त सजीव जसे की अझोला, अझटोबॅक्टर, रायझोबियम उपयुक्त बुरशी हे नाश पावतात. या अवशेषांचे बाजार मूल्य ही अति अल्प असते. सबब त्यांना जमा करून त्यांची विक्री करणे हेही व्यवहारात बसत नाही. यावर उत्तम शेती पर्याय म्हणजे गुरांना पाळणे, दुग्धोत्पादन घेणे, गुरांचा वंश विस्तार करणे, शेणखत, लेंडी खत शेतात वापरणे. गुरांचे मलमूत्र शेतीत टाकणं हा उत्तम पर्याय आहे. गुरे खात नाहीत अशा दुय्यम अवशेषांचे कंपोस्ट करायचे तर त्यावर शेण पाण्याचा थर दिल्यास कंपोस्ट कमी वेळेत तयार होतो. कंपोस्ट खतांमुळे मातीत कर्ब वाढायला मदत होते. माती सुपीक होते.

गुरांसाठी चारा कमी जागेत साठवायचा तर कडब्याची कुट्टी केल्या जाते. मुरघास केला जातो. खराब कुट्टी, गुरांचे खाऊन उरलेले वैरण, शिल्लकचा मात्र खराब असलेला मुरघास मातीत मिसळल्यास त्याचा खत म्हणून उपयोग होतो. जमिनीच्या सुपीकता वाढीस मदत होते. गाई म्हशी शेळ्या मेंढ्या व्यायल्या की दूध मिळते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घरचे असले की त्यांची चव चांगली असते. घरात दूध दुभते, अंडी, मास यांचा मुबलक वापर होतो. विकतचे घ्यायचे म्हटले की जरा आबाळच होते. दूध शिल्लक राहिल्यास दोन पैसे नियमित मिळतात. गुरांची संख्या वाढल्यास गुरे विकून एक मुठी पैसे मिळतात. थोडक्यात म्हणजे गुरे पाळल्याने शेतमालाच्या अवशेषांचा सदुपयोग होतो, सेंद्रिय खत मिळते, दूध दुभते, अंडी, मास मिळते आणि पैसे मिळतात.

कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग 👇
https://youtu.be/vJ7zM35MvpM

गोठा व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे

गुरे पाळायची तर त्यासाठी शेतकर्‍याने गोठा व्यवस्थापन करण्याकडे अभ्यासपूर्वक लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी घर आणि गुरं म्हणजेच गोठा यातील अंतर कमी असावे. गुर असतात तेथे गुरांसाठी लागणारा चारा साठा आणि हमीचे थंड भरपूर पाणी गरजेचे आहे. मुक्त गोठा शेतकर्‍याचा वेळ आणि श्रम वाचवतो. गुरांना पिण्यासाठीचे पाणी थंड आणि नळातून येणारे हवे. खुला हौद टाळावा. पाणी पाजण्याच्या दर तीन – चार तासांच्या सवयी गुरांना लावून ठेवल्यास उत्तम. कोरडा चारा आणि उन्हाळा असला तर अधिक पाणी लागते. गुरांना बादली अथवा टोपलीत पाणी मांडून नळ सुरू ठेवावा. गुरांचे पाणी पिऊन झाले की नळ बंद करावा. चिखल होऊ देऊ नये. स्वच्छता राहते.

सार्वजनिक पाण्याच्या हौदावर गुरांना पाणी पाजणे टाळावे. त्यात वेळेचा अपव्य होतो आणि गुरांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो. गोठ्यात एखादा लहानसा सिमेंटचा हौद असल्यास एक-दोन दिवस बाहेरगावी जायचे असल्यास हौद भरून ठेवता येतो.आपल्या गैरहजेरीत गुरांच्या पाण्याची सोय होते. गोठा मुक्त असला तरी गुरांचे शेण नियमित किमान तीन वेळा उचलले पाहिजे. त्यासाठीचा उकिरडा गोठ्याबाहेर असावा. गुरांचे उरलेले वैरण वेळोवेळी उचलून उकिरड्यावर टाकावे. गुरांना टप्प्याटप्प्याने नियमित चारा पुरविला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गोठा स्वच्छ आणि कोरडा असेल याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

Sunshine Power House of Nutrients

गोपालन करावे

गुरांच्या पालनपोषणात आनंद असतो. गाईच्या जिभेचा स्पर्श माणसाच्या अंगावर रोमांच उभे करतो. तो अनुभव कृषी पर्यटनात नागरी लोकांना द्यावा. गुरांची स्वच्छता हा तसा श्रमाचा आणि कष्टाचा तरी आनंददायी सोहळाच असतो. गुरेही प्रतिसाद देतात. गाई, बैल यांना आंघोळ घालायची तर तो एक खेळच समजावा. आवडते तरी नाकारले जाते. नाठाळ मुलाला आई आंघोळ घालते तसा हा खेळ. म्हशी, रेडा, रेडकू यांना पाणी फार प्रिय आहे. डोह, नदी, तलाव यात त्यांची बैठक संपता संपत नाही. तेथून त्यांना बाहेर काढायला कष्ट पडतात. नळावर आंघोळ घालावी तर संथ उभे राहतील. तेवढे पाणी पुरत नाही. शेळ्या, कोंबड्या यांना मात्र फारसे पाणी लागत नाही. बैल, घोडा, शेळ्या यांना शरीरवर त्वचेवर खरारा केलेला आवडतो. त्यासाठी पूर्वी नारळाची काथी वापरायचे. आता कपडे घासायचा ब्रश वापरावा. त्यासाठी हातात ग्लोव्हज् सारखा ब्रश तयार करायला पाहिजे. गुरांच्या अंगावर खरारा केल्यास आक्रमक गुरे मायाळू होतात असा अनुभव आहे.

दुभत्या जनावरांचे दूध काढतानाचा अनुभव असाच भावबंध निर्माण करतो. नुकतीच जन्मलेली वासरे, कालवडी, पारडू, रेडकू यांची ओढ माणसाला आणि माणसांची ओढ या पिलांनाही असतेच. शेळ्यांची लहान लहान नाजूक पिलं माणसे उचलून घेतात. त्यांना कवटाळतात. त्यांचे रूप त्यांचा स्पर्श आनंददायी असतो तीच गत कोंबडीच्या पिलांची. गुरांचे हंबरणे पिलांनी मातांना साद घालणे या मोहक बाबी आहेत. या सौंदर्याची भुरळ सार्‍यांनाच असते. कृषी पर्यटनाचा तो अविभाज्य पैलू आहे. कृषी पर्यटक या गुरांभोवती क्षणभर विसावतात. गुरांसोबत फोटो घेतात. पिलांना कुरवाळतात, त्यांच्या स्पर्शाने मोहरतात. आपणही हे सौंदर्य अनुभवावे. गोपालन करावे.

विक्रम पाटील
पिंपळगाव (हरे.)

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • एकात्मिक शेतीची कास – भाग 1
  • राज्यातील पावसाचा जोर आजपासून काही दिवस कमी होणार; येत्या 4-5 दिवसात कोकणात मध्यम सरी

Share this:

  • Facebook
  • X
Tags: एकात्मिक शेतीगोपालनशेती जीवनसंत नामदेव
Previous Post

कापसावर मररोगाचे संकट; असे करा उपाय

Next Post

आज पाऊस हलका-मध्यम, तोही फक्त कोकण, मुंबई अन् राज्यातील घाट परिसरातच

Next Post
पाऊस

आज पाऊस हलका-मध्यम, तोही फक्त कोकण, मुंबई अन् राज्यातील घाट परिसरातच

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.