मुंबई : राज्यातील पावसाचा जोर आजपासून काही दिवस कमी होण्याची शक्यता आहे. येत्या 4-5 दिवसात कोकणात मध्यम ते हलक्या सरी राहतील, असे भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले आहे. GFS मॉडेलनुसार हे अनुमान आज जारी करण्यात आले आहे. कोकणातून वर सरकणारा पाऊस गुजरात किनारपट्टी भागापासून उत्तर भारतात जोरदार बरसण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्येही अतिवृष्टीची व काही ठिकाणी ढगफुटीची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानात गेल्या 2 दिवसातील मुसळधार पावसाने अनेक शहरे पाण्यात बुडाली असून पावसाने 60 हून अधिक बळी घेतले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – एकनाथ शिंदे यांचे निर्देश
https://eagroworld.in/raj-thackeray-met-the-chief-minister-on-the-issue-of-farmers/
हवामान व पावसाच्या GFS मॉडेलनुसार, आजपासून येत्या 4-5 दिवसात कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. काही दिवस कोकण किनारपट्टी भागात हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज “आयएमडी”ने जाहीर केला आहे.
उत्तर, मध्य महाराष्ट्रात फारशा पावसाची चिन्हे नाहीत
IMDने 8 जुलै रोजी जाहीर केलेल्या GFS मॉडेल मार्गदर्शनानुसार, पुढील 24 तासांत कोकण, पूर्व विदर्भाच्या काही भागात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे . मुंबईत पावसाची तीव्रता कमी असू शकते. राज्यातील अंतर्गत भागात हलका तर तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस राहील. गुजरातच्या काही भागात अतिशय मुसळधार पावसाचा जोर राहू शकेल. “आयएमडी”च्या GFS मॉडेल मार्गदर्शनानुसार, छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे पावसाचा जोर उत्तर भारतात वाढत जाईल. महाराष्ट्रात आज कोकण किनारपट्टी भागात हलका-मध्यम तर विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे खान्देशसह उत्तर महाराष्ट्र, मध्य व पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात फारसा पाऊस राहणार नाही. या भागातील तुरळक काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची कोणतीही घोषणा नाही – राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
https://eagroworld.in/there-is-no-announcement-of-local-body-elections/
देशभरातील पावसाच्या ढगांची स्थिती दर्शविणारे आजचे नवीनतम उपग्रह छायाचित्रानुसार, दक्षिण कोकण गोवा, कर्नाटक ते केरळ किनार्यापर्यंत तीव्र ढग दिसत आहेत. सकाळी 11 ते दुपारी 2-3 वाजेपर्यंत या भागात पावसाची शक्यता आहे. गुजरातचा किनारा आणि विदर्भात तसेच राज्यातील घाट भागात पुढील 2-3 तासात मध्यम ते जोरदार सरी कोसळू शकतात. पूर्व विदर्भातील काही भागांत पावसाचा जास्त जोर राहील, असे पुणे वेधशाळेचे के.एस.होसाळीकर यांनी म्हटले आहे. तरुण हवामान अभ्यासक नटराजन गणेशन यांनी पश्चिमेतील अडथळ्यांमुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) मान्सून मध्य अक्षांशाकडे घुसखोरी झालेली दिसतेय. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सून मोठ्या प्रमाणावर कमकुवत होण्याची चिन्हे दिसत आहेत. परिणामी, उत्तर-पश्चिम भारत आणि गुजरातमध्ये पुढील तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो.
खान्देश, मराठवाडा विभागातील गेल्या 24 तासातील पाऊस
8 जुलै रोजी संपलेल्या 24 तासात नोंद झालेला तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) –
नंदुरबार जिल्हा : नवापूर – 25, तळोदा – 3, धडगाव अक्राणी – 2.
धुळे जिल्हा : शिंदखेडा – 38, शिरपूर – 23, धुळे – 13, दोंडाईचा – 4, साक्री – 2.
जळगाव जिल्हा : धरणगाव – 19, चोपडा – 10, जामनेर – 8, मुक्ताईनगर – 5, रावेर – 5, यावल – 5, एरंडोल – 2 भुसावळ – 1.6.
नाशिक जिल्हा : इगतपुरी – 103, त्र्यंबकेश्वर – 29, पेठ – 17, येवला – 12, पिंपळगाव – 3.8, सिन्नर – 3.2, चांदवड – 3, कळवण – 2, निफाड – 1.
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्हा : सोयगाव – 27, गंगापूर – 20, खुलताबाद – 20, वैजापूर – 9, सिल्लोड – 5, फुलंब्री – 3, कन्नड – 2, पैठण – 0.
परभणी जिल्हा : पूर्णा – 24.2, जिंतूर – 17, पाथरी – 16, मानवत – 12, सेलू – 6.6, पालम – 5, गंगाखेड – 2.
हिंगोली जिल्हा : कळमनुरी – 24, वसमत – 20, हिंगोली – 10.
नांदेड जिल्हा : हदगाव – 78, माहूर – 39, मुदखेड – 38, भोकर – 37, अर्धापूर – 26.5, कंधार / धर्माबाद / लोहा – 2.
राज्याच्या उर्वरित विभागातील 50 मिमिपेक्षा जास्त पाऊस
पुणे जिल्हा : लवासा – 99.5, लोणावळा – 93.5.
(उर्वरित संपूर्ण पुणे जिल्ह्यात अतिशय हलका पाऊस झाला.)
पालघर जिल्हा : जव्हार – 88, विक्रमगड – 86, वाडा – 77.
ठाणे जिल्हा : अंबरनाथ – 110, शहापूर – 81, मुरबाड – 78, उल्हासनगर – 76, ठाणे – 74, कल्याण – 64.
रायगड जिल्हा : माथेरान – 158.4, श्रीवर्धन – 132, पेण – 126, सुधागड – 123, पोलादपूर – 112, महाड – 102, माणगाव – 98, म्हसळा – 97, तळा – 84, कर्जत – 83.4, खालापूर – 80, पनवेल – 79.2, रोहा – 64, उरण – 50.
रत्नागिरी जिल्हा : दापोली – 189, मंडणगड – 158, राजापूर – 140, वाकवली – 128, खेड – 102, देवरुख – 89, लांजा – 84, चिपळूण – 73.
सिंधुदुर्ग जिल्हा : दोडामार्ग – 107, कुडाळ – 83, मुळदे ॲग्री – 80, वैभववाडी – 70, कणकवली – 66, सावंतवाडी – 60, रामेश्वर ॲग्री – 55.8.
कोल्हापूर जिल्हा : गगनबावडा – 90, शाहूवाडी – 52.