नाशिक : Bullock competition… पूर्वा केमटेक प्रा.लि. आणि बसवंत गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवर- ग्रोवर बैलजोडी स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये फोटोग्राफी तसेच चित्रकला स्पर्धेचा समावेश होता. महाराष्ट्रातील सर्व विभागांतून शेतकरी बंधू-भगिनी तसेच हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
बसवंत गार्डन यांच्यातर्फे दरवर्षी विविध महोत्सवांचे आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सेवर- ग्रोवर बैलजोडी स्पर्धेत (Bullock competition) शेकडो बैलजोडीधारक शेतकर्यांनी फोटोग्राफी स्पर्धेत तर चित्रकला स्पर्धेत दीडशेहून अधिक शाळांतील साडेसात हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या उत्स्फूर्त सहभागाबद्दल संयोजकांनी स्पर्धकांचे आभार मानले.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
प्रत्येक गटात पाच विजेत्यांची निवड
सर्जा -राजा बैलजोडी म्हणजे शेतकऱ्याचे वैभव. शेतकरी आणि त्यांची बैलजोडी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सेवर- ग्रोवर बैलजोडी स्पर्धेत आकर्षक 12 बैलजोड्यांना प्रत्येकी रुपये 5000/- तर खरसुंडी, डांगी, नागोर, मद्रास, कोकणी गिद्धा, माळवा आणि गावरान या प्रत्येक जातीतील एका बैलजोडीला प्रोत्साहनपर रुपये 3000/- च्या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. सेवर – ग्रोवर चित्रकला स्पर्धा इ. 5 वी ते 7 वी, इ. 8 वी ते 10 वी व खुला गट या तीन गटांत पार पडली. यातील प्रत्येक गटात पाच विजेत्यांची निवड करण्यात आली.
‘या’ तारखेला होणार बक्षीस वितरण समारंभ
‘सेवर- ग्रोवर’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पिंपळगाव बसवंत येथील बसवंत गार्डनमध्ये दि. 25 ते 27 नोव्हेंबर 2022 या दरम्यान होणार्या प्राचार्य – मुख्याध्यापक परिषदेत होणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र पाठविण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇