नाशिक : पिंपळगाव (ब.) येथील ‘बसवंत हनी बी पार्क’ला जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉनसीबल टुरिसम या संस्थेतर्फे देण्यात येणारा सन्मानजनक असा रिस्पॉनसीबल टुरिझम अॅर्वार्ड’ मिळाला आहे. ‘नैसर्गिक वारसा आणि जैवविविधता संवर्धन करण्यासाठी पर्यटनाचे योगदान या श्रेणीमध्ये बसवंत हनी बी पार्कला रौप्यपदकाने सन्मानित करण्यात आले.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
या पुरस्कारासाठी देशभरातील पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी सहभाग नोंदविला. त्यातील १९ संस्थांना मानांकने देण्यात आली. दि. 7 सप्टेंबर रोजी भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटचे अॅडव्हायजर हॅरॉल्ड गुडवीन व मध्य प्रदेशच्या पर्यटनमंत्री श्रीमती उषा ठाकूर यांच्या हस्ते बसवंत मधमाशी उद्यानाचे संचालक श्री. संजय पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
‘ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा.लि.’ या कंपनीतर्फे मुखेड रोड, पिंपळगाव (बसवंत), जि. नाशिक येथे देश्यातील नावीन्यपूर्ण अश्या हनी बी पार्कची स्थापना मागिल तीन वर्ष्यापूर्वी करण्यात आली असून, येथे वर्षभर पर्यटन महोत्सव, राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवाद, हनिबी फेस्टिवल तसेच इतरही अनेक उपक्रम राबविले जातात. मधमाश्यांद्वारे परागीभवनातून होणारी उत्पादन वाढ लक्षात घेता बसवंत हनी बी पार्कमध्ये शेतकरी, विद्यार्थी तसेच बेरोजगार युवकांसाठी सर्व सुविधायुक्त बसवंत मधमाशी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यांच्या माध्यमातून अनेक युवकांना प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतीपूरक तसेच पर्यावरणस्नेही अश्या या प्रकल्पाला हजारो पर्यटकांनी भेटी दिल्या असून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. या पुरस्कारामुळे या क्षेत्रात आणखी काम करायला ऊर्जा मिळाली अशी भावना संजय पवार यांनी व्यक्त केली.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
भारतीय कृषीशास्त्रज्ञाचा मेक्सिकोत पुतळा ; तिथल्या हरित क्रांतीचे जनक! जाणून घ्या कोण आहे हा मराठी माणूस
कृषी मूल्य आयोगाला बळ देणारे प्रख्यात भारतीय कृषी अर्थतज्ज्ञ, पद्मभूषण अभिजित सेन यांचे निधन