• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार

केंद्रीय पथकाकडून राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 12, 2023
in हॅपनिंग
0
दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींशी चर्चा करून या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य समिती करेल, असे केंद्रीय पथकाचे प्रमुख आणि केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सहसचिव प्रिय रंजन यांनी सांगितले. खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधूकर अर्दड, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर, केंद्रीय पथकातील मनोज के, जगदीश साहू, संशोधन अधिकारी शिवचरण मीना, अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन, पाणी पुरवठा विभागाचे संचालक हरीष उंबरजे, ग्रामीण विकास विभागाचे उप सचिव प्रदीप कुमार, अन्न व पुरवठा विभागाचे अवर सचिव संगीत कुमार, पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त एच. आर. खन्ना, ए.एल. वाघमारे, सुनील दुबे, चिराग भाटिया, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

 

पीक नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाद्वारे करण्यात येणार – प्रिय रंजन

राज्यातील दुष्काळस्थिती निर्माण झालेल्या भागाचा दौरा करुन शेतकरी, पशुपालक, लोकप्रतिनिधी यांची भेट घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाद्वारे करण्यात येणार आहे. दुष्काळाबाबत अधिकची माहिती असल्यास समितीकडे दोन दिवसात सादर करावी. समितीसमोर झालेले सादरीकरण आणि पाहणी दौऱ्याच्या आधारे केंद्र शासनास अहवाल सादर करण्यात येईल, असे प्रिय रंजन यांनी सांगितले.

 

Aanand Agro Care

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे विभागातील दुष्काळाची माहिती दिली. पुणे जिल्ह्यात जून महिन्यात ५३ टक्के आणि ऑगस्ट महिन्यात ३९ टक्के पाऊस झाला, तर सोलापूर जिल्ह्यात हे प्रमाण अनुक्रमे २८ आणि १९ टक्के होते. दोन्ही जिल्ह्यात कोरड्या दिवसाचा कालावधी लांबल्याने खरीप हंगामातील पीक वाढीवर परिणाम होण्यासोबत रब्बीचे क्षेत्रही कमी झाले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर या तालुक्यात तीव्र तर दौंड, शिरुर तालुक्यात मध्यम स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, सांगोला, माळशिरस या तालुक्यात तीव्र व माढा आणि करमाळा तालुक्यात मध्यम स्वरुपाच्या दुष्काळाची स्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील १५६ पैकी ७५ आणि सोलापूर जिल्ह्यातील ११० पैकी १०० मंडळात दुष्काळी स्थिती घोषित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीपाच्या उत्पादनावर परिणाम होण्यासोबत रब्बीचे घटलेले क्षेत्र आणि चाऱ्याची उपलब्धता हा देखील चिंतेचा विषय आहे. जलयुक्त शिवारच्या आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असून वनराई बंधाऱ्यासारखे जलसंधारणाचे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ३५ कोटी ३७ लाख तर सोलापूर जिल्ह्यात ८६ कोटी ६८ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती देखील राव यांनी दिली. उजनी धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी असल्याने सोलापूर जिल्ह्यावर याचा परिणाम होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Wasan Toyota

दुष्काळी भागातील २४.७६ लाख हेक्टर क्षेत्र बाधित – कृषी आयुक्त डॉ. गेडाम

कृषी आयुक्त डॉ. गेडाम यांनी यांनी दुष्काळी स्थितीमुळे शेतीवर झालेल्या परिणामांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. पावसाळ्यात कोरड्या दिवसांची संख्या अधिक असल्याने दुष्काळग्रस्त भागात ज्वारी, बाजरी, मूग, उडीद आणि सुर्यफुलाचे उत्पादन घटले आहे. राज्याच्या १० जिल्ह्यात २४ तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ असून ७ जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ आहे. रब्बीच्या ५३.९७ लाख हेक्टरपैकी केवळ ३६.३७ लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. दुष्काळी भागातील २४.७६ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती त्यांनी दिली.

पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर यांनी ४० तालुक्यातील ५९ लाख ६४ हजार जनावरांसाठी पुढील ६ महिन्यांसाठी ३९६ लाख मे.टन हिरवा चारा व ३६.१८ लाख मे.टन चाऱ्याची आवश्यकता असल्याचे सांगून पशुसंवर्धनासाठी पाण्याची आवश्यकता, दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाची स्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • शेतकऱ्यांनो सेंद्रिय शेती करा ; यासाठी सरकार देतंय अनुदान
  • 9,000 चौरस फुटाच्या नर्सरीतून महिन्याला 2 लाखांची कमाई

Share this:

  • Facebook
  • X
Tags: केंद्रीय पथकखरीप हंगामपीक नुकसान
Previous Post

शेतकऱ्यांनो सेंद्रिय शेती करा ; यासाठी सरकार देतंय अनुदान

Next Post

कांदा लिलाव पूर्ववत सुरु ; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Next Post
कांदा

कांदा लिलाव पूर्ववत सुरु ; वाचा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.