• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2021
in तांत्रिक
1
मक्यावरील  लष्करी अळीचे व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

       लष्करी अळी ही किड बहुभक्षीय असून 80 पेक्षा जास्त वनस्पतीवर आपली उपजिविका करते. परंतु गवतवर्गीय पिके हे या किडीचे सर्वात आवडते खादय आहे. ही कीड सर्वात जास्त मका, मधू मका, ज्वारी यावर उपजिविका करतांना आढळून येते. हराळी, सिंगाडा , कापूस, रान मेथी, मका, ओट, बाजरी, वटाणा, धान, ज्वारी, शुगरबीट, सुदान ग्रास, सोयाबीन, ऊस, तंबाखु व गहू यांवर वारंवार प्रादुर्भाव होतो.

हवामान:
उष्ण व दमट वातावरणात या किडीला पोषक आहे.
अळी:
पुर्ण वाढ झालेल्या अळीचे तोंडावर पांढुरक्या रंगाचे उलटया वाय ‘ल्’ आकराचे चिन्ह असते. तर पोटाच्या आठव्या सेगमेंटवर चौकोनात फुगीर गोल गडद किंवा हलक्या रंगाचे चार ठिपके असतात दिवसा अळी लपून राहते. उन्हाळयात अळी अवस्था 14 दिवसाची तर हिवाळयात किंवा थंड वातावरणात ती 30 दिवसापर्यंत असु शकते
कोश: चकाकणा-या तपकीरी रंगाचे कोश सामान्यत: 2 ते 8 सेमी खोल जमिनीत असतात अळी स्वत: भोवती अंडाकृती, मातीचे कण व रेषीम धागा एकत्र करून सैल कोश तयार करते उन्हाळयात कोशा अवस्था 8 ते 9 दिवसाची असून अती थंड वातावरणात ती 20 ते 30 दिवसाची सुध्दा राहू शकते.

प्रौढ निशाचर असून मादी सामान्यत: बहुतांष अंडी पहिल्या चार ते पाच दिवसाच्या कालावधीत देते नुकसान: अळया पाने खाऊन पिकाचे नुकसान करतात. नुकत्याच अंडयातुन बाहेर आलेल्या अळया पानाचा हिरवा पापूद्रा खातात. त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडतात. दुसर्‍या ते तिसर्‍या अवस्थेतील अळया पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात. अळया मक्याच्या पोंग्यामधे राहून पानाला छिद्रे करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेशेत एकसमान छिद्रे दिसतातसर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोन अळया राहतात, कारण त्या जवळ आल्यास एकमेकांना खातात. जूनी पाने मोठया प्रमाणात पर्णहीन होऊन पानाच्या फक्त मध्य शिरा व व झाडाचे मुख्य खोड षिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते पोंगा धरण्याची सुरूवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते, मध्यम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त तर उशिरा अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. अळी काही वेळा कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्र करून दाणे खाते.

सर्वेक्षण :
किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे आठवडयातून दोन वेळा सर्वेक्षण करावे. यासाठी शेतामधील पाच ठिकाणचे मक्याचे 20 झाडे किंवा 10 ठिकाणचे 10 झाडे, शेताचे प्रतिनीधीत्व करतील अशी निवडावीत. प्रादुर्भावग्रस्त झाडाचे प्रमाण टक्क काढण्यास एवढे नमुने पुरेसे आहेत. परंतु प्रती झाड अळयांची संख्या काढण्यासाठी झाडाच्या नमुन्याची संख्या वाढवावी लागेल. • रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्था ( उगवणी नंतर 3 ते 4 आठवडे): सर्वेक्षणाअंती सरासरी 5 टक्के प्रादुर्भाव ग्रस्त झाडे आढळल्यास फवारणी करावी. • मध्यम ते उशिरा तर 5 ते 7 आठवडे): सर्वेक्षणाअंती सरासरी मध्यम पोंगे अवस्थेमधे 10 टक्के पोंग्यामधे ताजा प्रादुर्भाव तर उशिरा पोंगे अवस्थेमधे 20 टक्के पोंग्यामधे ताजा प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी
गोंडा ते रेषीम अवस्था ( उगवणी नंतर 8 आठवडे): फवारणीची गरज नाही परंतू 10 टक्के कणसामधे ताजा प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी.

व्यवस्थापन:
पिकाची काढणी वेळेवर करून पिकाची नंतरच्या हंगामात मोठया प्रमाणावर प्रादुर्भावातुन सुटाक होऊ शकते. पिक काढणीला आल्यावर (कणसे कापल्यानंतर) धाडयाची गंजी शेतात न ठेवता योग्य विल्हेवाट लावावी पिकाचे कायीक वाढीत अतोनात नुकसान झाले असल्यास धांडे कापून पोंग्यातील अळी सहित नष्ट करावे , खोल नांगरणी करावी. लवकर पक्व होणार्‍या वाणाची निवड करून लवकर परेणी करावी व याचा गाव किंवा विभागीय पातळीवर अवलंब करावा. प्रादूर्भावग्रस्त भागात पतंगावर पाळत ठेवण्यासाठी हंगामात तसेच बिगर हंगामात कामगंध सापळयाचा एकरी पाच या प्रमाणे वापर करावा
मका,उडीद/मुग/तूर आंतर पिक घ्यावे. मका पिका सभोवताल सापळा पिक म्हणून हायब्रीड नेपीयर च्या 3 ते 4 ओळी पेराव्या व त्यावर प्रादूर्भाव दिसताच 5 टक्के निबोंळी अर्क किंवा अ‍ॅझाडिरेक्टीन 1500 पीपीएम, 50 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणे फवारणे. मक्याच्या प्रतिकारक वाणाची निवड करावी. स्वच्छता मोहीम राबवावी व नत्र खताचा अवास्तव वापर टाळावा. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत एकरी 20 या प्रमाणे पक्षी थांबे उभारावे. (30 दिवसापर्यंत)

यांत्रीक पदध्ती:
पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत पानावरील समुहात दिलेली अंडी किंवा अळयांचा समुह असलेली प्रादूर्भाव ग्रस्त पाने (पाढरे चट्टे असलेली) अंडी/अळयांसहीत नष्ट करावी.

प्रादूर्भाव दिसताच प्रादूर्भावग्रस्त पोंग्यामधे सुकलेलीलेली वाळू टाकावी
पतंग मोठया प्रमाणवर नष्ट करण्यासाठी कामगंध सापळयांचा एकरी पंधरा या प्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने सुरूवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे जैविक नियंत्रण जैवविवीधता वाढवणे आंतरपिके / इतर सजावटीच्या फुल वनस्पती घेउन नैसर्गीक शत्रूंचे संवर्धन होण्यास मदत होइल पतंगाची संख्या 3पतंग/ कामगंध सापळा या प्रमाणात आढळताच ट्रायकोग्रामा प्रेटीओसम, टेलेमोनस रेमंस या परोपजीवी किटकांचे दर आठवडयाने एकरी 50 हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. त्यानंतर 3 ते 4 दिवसापर्यत रासायनिक किटकनाशकाची फवारणी करू नये.

रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्थेत 5 टक्के पोंग्यामधे तसेच 10 टक्के कणसामधे प्रादुर्भाव आढळल्यास जैविक किटकनाशकांची फवारणी करावी व मेटारायझीयम अ‍ॅनिसोप्ली पावडर (1 x 108 सीएफयू/ग्रॅम)/ 50 ग्रॅम किंवा नोमुरीया रीलै पावडर (1×108 सीएफयू/ग्रॅम)/ 30 ग्रॅम/10 ली या प्रमाणे उगवणी नंतर 15 ते 25 दिवसांनी पोंग्यात फवारावे त्यानंतर प्र्ाादूर्भावानुसार 10 दिवसाच्या अंतराने 1 ते 2 फवारण्या कराव्या व बॅसीलस थूरीजींअसीस व कुर्सटाकी )/ 20 ग्रॅम/10 किंवा 400 ग्रॅम/एकर या प्रमाणे फवारणी करावी
रासायनिक किटकनाषकांचा वापर :(शिफारस 18-19 वर्षासाठी)
अळी पोंग्यामधे उपजिवीका करीत असल्यामुळे रासायनिक किटकनाशकाची जास्त घनफळाच्या फवारणी (नॅपसॅक) पंपाद्वारे फवारणी केल्यास फवारणीचे द्रावण पोंग्यात जाऊन नियंत्रण मिळते.

• रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्था :
अंडयाची उबवण क्षमता कमी व सुक्ष्म अळयांचा नियंत्रणासाठी 5 टक्के प्रादुर्भाव असल्यास,5 टक्के निबोंळी अर्क किंवा अ‍ॅझाडिरेक्टीन 1500 पीपीएम, 50 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणे फवारणे • मध्यम ते उशिरा पोंगे अवस्था
व दुस-या ते तिस-या अवस्थेतील अळयाच्या नियंत्रणासाठी,10 ते 20 टक्के प्रादुर्भाव असल्यास
स्पिनेटोराम 11.7 टक्के प्रवाही, 9 मिली किंवा थायोमेथोक्झााम 12.6 टक्के +ल्यँब्डा
सायहेलोथ्रिन 9.5 टक्के, 5 मिली किंवा क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही, 3 मिली 10
लिटर पाण्यात याप्रमाणे फवारणे गोंडा ते रेशिम ( उगवणी नंतर 8 आठवडे):
व या अवस्थेत रासायनिक किटकनाशकाचा वापर किफायतशिर म्हणून मोठया अळया
वेचाव्या.

(टिप:एकात्मिक व्यवस्थापन, केद्रीय कृषी मंत्रालय, भारत सरकार,नवी दिल्ली यांचे 6 मे 2019 व रासायनिक किटकनाशकांचा वापर 28 मे 2019 च्या कार्यालयीन परीपत्रका नुसार)

डॉ. ए. व्ही. कोल्हे, मुख्य पिकसंरक्षण अधिकारी, व डॉ. डी. बी.उंदिरवाडे, विभाग प्रमुख
किटकशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला विभाग प्रमुख
किटकशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अकोलाअ‍ॅझाडिरेक्टीनज्वारीडॉ. पंदेकृविनिंबोळी अर्कनोमुरीया रीलैमकामधू मकालष्करी अळी
Previous Post

कारली आणि दोडका लागवड

Next Post

अशी घ्या पावसाळ्यात पशुधनाची काळजी…

Next Post
अशी घ्या पावसाळ्यात पशुधनाची काळजी…

अशी घ्या पावसाळ्यात पशुधनाची काळजी...

Comments 1

  1. प्रदीप माधवराव सोनवणे. धुळे says:
    6 years ago

    चांगली माहीती मिळाली

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish