• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कोरडवाहू पट्ट्यातील शेतकरी कंपनी

Team Agroworld by Team Agroworld
June 21, 2019
in इतर
0
कोरडवाहू पट्ट्यातील शेतकरी कंपनी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेतकर्‍यांनी शेती क्षेत्राबाबतचे नकारात्मक चित्र बदलण्यासाठी कंबर कसली आहे. सहकारातील त्रूटींची पुनरावृत्ती टाळून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्गाने शेतकर्‍यांनी संघटीतपणे सकारात्मक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. नगर जिल्ह्यात याची पायाभरणी केली कर्जत तालुक्यातील कोरडवाहू शेतकर्‍यांच्या बचत गटांनी. त्यांनी चार वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून ही मुहूर्तमेढ रोवली. बर्गेवाडी (ता.कर्जत, जि.अ.नगर) येथील अमरसिंह अ‍ॅग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. याच शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून नगर जिल्ह्यात सुमारे 25 शेतकऱ्यांच्या कंपन्यांची स्थापना झाली.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) मदतीने जिल्ह्यात 14 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली. विप्रो व गँट थॉटन सर्व्हिस या दोन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या या कंपन्या सरकारी मदतीसह भागभांडवलदारांच कष्टावर सध्या मार्गस्थ झालेल्या आहेत. त्यापैकी सर्वात पहिली शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या अमरसिंह या कंपनीची वाटचालही अनेकांसाठी प्रेरणादायीच आहे.
कंपनीची स्थापना
या कंपनीच्या स्थापनेबद्दल अध्यक्ष विठ्ठल पिसाळ सांगतात की, चार वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात शेतकर्‍यांसाठी मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अर्थात एमएसीपीची घोषणा सर्वप्रथम केली. पुणे येथील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कृषी-पणन विभागाच्या कार्यालयातून अधिक माहिती घेतली. त्यावेळी एमएसीपी प्रकल्पाच्या कार्यालयाची नुकतीच सुरवात झाली होती. त्यांनीच विप्रो व गॅट थॉटन सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडे आम्हाला मार्गदर्शन घेण्यासाठी पाठवून दिले. त्यावेळी आम्ही पूर्ण माहिती घेऊन अशी कंपनी स्थापन करणचा निर्ण घेतला. कंपनी स्थापून जागतिक बाजारात कर्जतच्या शेतमालाची ओळख निर्माण करण्यासाठीचा विडा उचलला. कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्व माहिती देतानाच कंपनी स्थापन करण्यासाठीच्या नियम व अटींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पुढील कार्यवाहीसाठी जिल्हास्तरीय आत्मा यंत्रणा व तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव करण्याबाबतही माहिती दिली. तालुक्यातील शेतकरी बचत गटांना एकत्रित करून कंपनी स्थापन करण्यासाठीचे मोठे आव्हान होते. मात्र, यासाठी बचत गटातील शेतकर्‍यांनीही सहकार्य केले. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी विश्वास दिल्याने आम्ही एकत्रित येऊन ही कंपनी स्थापन करू शकलो. बतच गटांनी एकत्रित येण्याची तयारी दाखविल्यानंतर आम्ही सर्वांनीच मग यात पुढाकार घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून घेतली.
कंपनीचे नामकरण
कंपनीला नाव काय द्यायचे यावरही आम्ही अनेकदा चर्चा केली. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू असतानाच याबद्दलही विचार करीत होतो. अखेर कर्जतचे ग‘ामदैवत गोदड महाराज यांच्यावर सर्वांचीच भक्ती असल्याने त्यांच्या नावावरूनच उत्पादक कंपनीचे नाव ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाले. सर्वानुमते मग आम्ही कंपनीला गोदड महाराजांचे दुसरे लोकप्रिय नाव असलेले अमरसिंग हे नाव अंतिम केले. अशा पद्धतीने आम्ही अंतीम ठरविलेले नाव सेवा पुरवठादार कंपनीलाही कळविले. त्यांनी मग मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स यांच्याकडे चार्टर्ड अकाउंटंटच्या मदतीने कंपनीच्या दहा प्रमोटर्सचे डीन नंबर काढून कंपनी नोंदणीची प्रकि‘या पूर्ण करून घेतली. अशा पद्धतीनेे एमएसीपी प्रंकल्पांतर्गत आम्ही नगर जिल्ह्यातील पहिली शेत’ाल उत्पादक कंपनी स्थापन केली.
अठ्ठावन कोंटींची उलाढाल
कर्जत तालुक्यातील एकुण 16 ण्या नी एकत्रित येऊन ही कंपनी स्थापन केली. कंपनी आता चार वर्षांनंतर वार्षिंक सुमारे 58 कोटी रुपयांची उलाढाल करण्यात यशस्वी झालेली आहे. त्याबद्दल माहिती देताना संचालक सुरेश दळवी सांगतात की, गटांच्या एकत्रिकरणानंतर आम्ही कंपनीच्या कामात झोकुन दिले. संचालक मंडळात एकुण सहाजणांचा समावेश आहे. माझ्यासह विठ्ठल पिसाळ, श्रीराम बरबडे, रावसाहेब खराडे, लक्ष्मीकांत लांगोरे व रंजना बेदरे यांचा संचालक मंडळात समावेश आहे. शेतमालावर प्रकि‘या करून विक्री करण्याच्या उद्देशाने आम्ही या कंपनीची स्थापना केली होती. आत्मा यंत्रणेचे तत्कालीन प्रकल्प संचालक शिवाजी आमले, उपसंचालक संभाजीराव गायकवाड, तंत्र व्यवस्थापक रावसाहेब बेंद्रे यांनी पहिल्या टप्प्यात मोठे सहकार्य दिले. त्यानंतरही प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
मॉलला शेतमाल पुरवठा
यंदा आम्ही राज्य सरकारच्या सहकार्याने कर्जत तालुक्यातील तूर खरेदी केंद्र यशस्वी पद्धतीने चालवू शकलो आहोत. आमच्याकडे एकुण 29 जणांचा स्टाफ आहे. खरेदी, प्रकि‘या व मार्केटिंग या तीन्ही आघाड्यांवर आम्ही सध्या या कर्मचार्‍यांच्या मदतीने काम करू शकलो आहोत. माती परिक्षण केंद्रही आम्ही शेतकर्‍यांच्या सेवेसाठी सुरू केलेले आहे. शेतकर्‍यांची खासगी आस्थापनांकडून होणारी फसवणूक टाळण्याच्या हेतूनेच सर्वकाही एका छत्राखाली देण्याच्या उद्देशाने आम्ही सेवांची व्याप्ती वाढवित आहोत. कांदा व डाळिंब या दोन प्रमुख दोन नगदी पिकांच्या खरेदी-विक‘ीतही आम्ही दोन वर्षांपासून काम करीत आहोत. कंपनीच्या सभासदांचा शेतमाल प्राधान्याने खरेदी करण्यासह तालुक्यातील इतर शेतकर्‍यांचाही शेतमाल खरेदी करून मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरांतील मॉल्समध्ये याची विक्री करण्याबाबतचे करार आमच्या उत्पादक कंपनीने केले आहेत. आदित्य बिर्ला ग्रुप व फ्यूचर ग्रुप यांच्याशी आम्ही करार केलेले आहेत. त्यानुसार वॉलमार्ट, बीग बाजार व बीग बास्केट आदींच्या मॉलमध्ये सध्या आमचा माल विकला जातो. पुढील काळात याची व्याप्ती वाढविण्यासाठीचे प्रयत्न कंपनी करणार आहे. शेतमालाच्या निर्यातीतही आम्ही काही अंशी काम करीत आहोत. निर्यातीच्या क्षेत्रातही मोठे काम करून शेतकर्‍यांना सेवा देण्याचा आमचा हेतू आहे.
सोयाबीन बीजोत्पादन
विठ्ठल पिसाळ सांगतात की, खरेदी- विक्रीसह शेतकर्‍यांना माफक किंमतीत चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत आमच्या सर्व संचालकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार यंदा आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील 10 शेतकरी उत्पादक कंपन्यांशी करार करून सोयाबीन बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. याबाबतचे करार करून कामही सुरू आहे. बुलढाण्यातील पाचशे हेक्टर क्षेत्रावर हा सोयाबीन बिजोत्पादनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांना मदत करण्याच्या हेतूनेच आम्ही हे करार केलेले आहेत. मागील वर्षीही भाडेतत्वावर सीड प्रोसेसिंग प्लँट वापरत होतो. आता आम्ही 20 लाख रुपयांचा हा प्लँट खरेदी केलेला आहे. तो बसवून चालू हंगामात आम्ही आमच्याच कंपनीत दर्जेदार बियाणे तयार करून शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. यासाठी कृषी विभागाने आम्हाला 10 लाख रुपयांचे अनुदानही दिले आहे. आतापर्यंत एमएसीपी प्रकल्पातूनही आम्हाला गोदाम बांधकामाच्या 18 लाख रुपयांच्या खर्चासाठी अनुदान मिळालेले आहे. माती परिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी सॉईल टेस्टिंग कीट खरेदीसाठीही सरकारी अर्थसाह्य मिळाले आहे. अशा पद्धतीने सरकारी यंत्रणांनी आमच्या कंपनीला भरघोस प्रोत्साहनपर मदत केली आहे. कृषी विभागाच्या सहकार्यानेच हे शक्य झाले आहे. यंदा आमच्याकडे 200 क्विंटल हरभरा, 250 क्विंटल गहू व 100 क्विंटल तूर बियाणे विक्रीसाठी तयार आहे. तसेच तूरीपासून पॉलिश न केलेली डाळ तयार करून त्याची पॅकिंग करून विक्री करण्याचेही आमचे काम सुरू आहे. मागील आर्थिक वर्षात एकुण 58 कोटी रुपयांची उलाढाल करून व प्रशासकीय खर्च केल्यानंतरही आमची कंपनी सुमारे 20 लाख रुपये नफा मिळवू शकलेली आहे. सध्या खर्चाची बाजू मोठी असल्याने तुलनेने नफा कमी मिळत आहे. मात्र, हा गुंतवणुकीचा काळ असल्याने यापुढे नफ्याची टक्केवारी वाढेल.
संपर्क
विठ्ठल पिसाळ, अध्यक्ष,
मो.नं. 9423461369
सुरेश दळवी, संचालक
मो.नं. 7588542678
अमरसिंह अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, बर्गेवाडी, ता.कर्जत, जि.अ.नगर

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आत्माशेतकरी उत्पादक कंपनी
Previous Post

रानभाजी शेंदळीचे यशस्वी उत्पादन

Next Post

विक्रमी हळद उत्पादनाचे दोन दोस्तांचे नवे तंत्र

Next Post
विक्रमी हळद उत्पादनाचे दोन दोस्तांचे नवे तंत्र

विक्रमी हळद उत्पादनाचे दोन दोस्तांचे नवे तंत्र

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish