• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्यांचा भारतातील पहिला मोर्चा काढणारा नेता कोण? तुम्हाला माहिती आहे का हे?

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2024
in हॅपनिंग
0
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

100 वर्षांपूर्वी शेतीला उद्योगाचा दर्जा अन् शेतीच्या राष्ट्रीयकरणाचा क्रांतिकारक विचार मांडणारा अवलिया नेता

 

 



आजची सरकारे शेती, शेतकरी, ग्रामविकास याबाबत बोलू लागली आहेत. मात्र, आजपासून 85 वर्षांपूर्वीच एका दूरदृष्टीच्या नेत्याने शेतीचे महत्त्व आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ओळखले होते. शेतकऱ्यांचा प्रश्नावर सरकारला जागे करण्यासाठी भारतातील पहिला शेतकरी मोर्चा या नेत्याने काढला होता. हा नेता कोण, हे तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण ते जाणून घेऊ …

 



हा अवलिया नेता सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिंतन करायचा. शेती व शेतकरी याबाबत विचार मांडायचा. त्यांच्यासाठी हा नेता चळवळीही उभ्या करायचा. या देशातील शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न या नेत्याला संपवायचे होते. ग्रामीण भागाचे परिवर्तन करायचे असेल तर शेतीला सरकारी धोरणात मुख्य स्थान द्यायला लागेल, असा त्या काळात या नेत्याचा आग्रह होता.

 



शेतकऱ्यांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शेतकऱ्यांसाठी धडपडणाऱ्या या नेत्याचे नाव होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांचे उद्धारक अशीच बाबासाहेबांची मर्यादित ओळख अनेकांना असेल. मात्र, ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते. दुर्दैवाने अनेकांना हे अजूनही ठाऊक नाही. बहुतांश शेतकरीही त्याबाबत अनभिज्ञ आहेत. बाबासाहेबांचे ग्रामीण समाज आणि शेतीबाबतचे विचार आजही राज्यकर्ते, नियोजकार आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत.

 

https://youtu.be/_gHFsri0scs?si=7VhzlJsvwgBD0MgO

 


‘लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय’
डॉ. आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती, तितकेच शेतीबद्दलही भान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी डॉ. आंबेडकरांनी देशातील शेती आणि शेतकरी यांचे संशोधन करून ‘लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय’ हा इंग्रजी शोधनिबंध लिहिला. सर्वच शासनकर्ते डॉ. आंबेडकरांच्या शेतीविषयक विचारांची आजवर उपेक्षा करत असल्याचे, सरकारी उदासीनतेचे चित्र प्रकर्षाने दिसते. डॉ. बाबासाहेब यांच्या शेतीविषयक सूचनांची अंमलबजावणी केली, तर शेती व ग्रामीण भागाचे परिवर्तन नक्कीच घडेल.

 

Do you know Indias First Farmer Leader Farming as industry

कोकणातील खोत पद्धती विरोधात देशातील पहिला शेतकरी मोर्चा (प्रतिकात्मक फोटो)

शेतीला उद्योगाचा दर्जा अन् सिंचनावर भर
शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी समृद्ध झाला तरच शेतीशी निगडित सर्व घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल, असे बाबासाहेबांचे मत होते.

 

 

राज्यातील पहिल्या शेतकरी परिषदेचे आयोजन
बाबासाहेबांनी 1928 पासून कोकणातील शेतकऱ्यांची खोतांच्या दास्यातून मुक्तता व्हावी म्हणून फार मोठी चळवळ सुरू केली होती. 14 एप्रिल 1929 रोजी रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती. या शेतकरी परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी कोकणातील खोतीदारांविरूद्ध शेतक-यांचे आंदोलन उभारले.

 

https://twitter.com/narendramodi/status/1779337144911221014

 



मुंबई विधिमंडळात शेतकरी हिताचे पहिले विधेयक
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिंतन करणाऱ्या, विचार मांडणाऱ्या आणि त्यांच्यासाठी चळवळी उभ्या करून या देशातील शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न डॉ. आंबेडकरांना संपवायचे होते. यासाठी त्यांनी 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धत नष्ट करणा-या कायद्याचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले होते. 10 जानेवारी 1938 रोजी 25 हजार शेतकऱ्यांचा विराट मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर नेण्यात आला.

 



कुणबी, मराठा आणि मुस्लिम शेतकऱ्यांचे नेतृत्व
शेतक-यांच्या यशस्वी मोर्च्यानंतर, शेतकऱ्यांची चळवळ अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने; बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोकणचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या अनेक सभांमध्ये त्यांनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. विशेष म्हणजे हे शेतकरी कुणबी, मराठा आणि मुस्लिम होते. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या जातींचा विचार न करता सर्व जातिधर्माच्या शेतकऱ्यांसाठी चळवळ उभारली होती.

 

https://eagroworld.in/genuine-and-naturally-grown-devgad-hapoos-by-agroworld-no-game-with-health/

 



शेती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत असलेला उद्योग
शेतीबाबत आपल्या देशातील शेतकरी आणि राज्यकर्ते यांचा उदरनिर्वाहाचे साधन अशी मानसिकता आहे. डॉ. आंबेडकर यांचा या मानसिकतेला आक्षेप होता. शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नसून, राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांसह अनेक शेतमजुरांना रोजगार देण्याचे माध्यम आहे. त्यामुळे शेतीकडे उद्योग म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. शेती विकसित होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला, तर ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडेल. राष्ट्राची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. रोजगारासाठीची स्थलांतरे टळतील. इतक्या दूरदृष्टीने व सखोलतेने त्यांनी शेतीकडे बघितले.

 



शेतीचे राष्ट्रीयकरण : सामुदायिक शेतीचा प्रयोग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत.

 

https://eagroworld.in/fpc-workshop-farmers-producer-company-workshop-on-20th-april-saturday-in-nashik-by-agroworld/

 




एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र आणण्याची संकल्पना
सामुदायिक शेतीमुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.

 



स्वतंत्र भारताचे पहिले पाटबंधारेमंत्री; शेतीला वीज प्राधान्य
देशाचे पहिले पाटबंधारेमंत्री झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी शेती आणि शेतकरी यांच्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, तसेच देशाचे पहिले ऊर्जामंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला ऊर्जा आयोग स्थापन करीत वीज आणि पाण्याचे नियोजन केले. उद्योगांना वीज देताना कृषी उद्योगांना प्राधान्य दिले. डॉ. बाबासाहेब यांचे शेतीबाबतचे विचारधन राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.

 

  • 🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..
  • 🐐 अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे 18 सप्टेंबरला जळगावात एकदिवसीय कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप ठिकाण – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
  • केळी लागवडीचे यशस्वी रहस्य
    🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌
  • ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस
    ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध होणार…
  • ॲग्रोवर्ल्ड
    ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस 18 मे (शनिवारी) रोजी उपलब्ध… (अवकाळी पाहता कदाचित हंगामातील शेवटची गाडी…)
  • दुग्धव्यवसाय
    ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावात शनिवार (25 मार्चला) एक दिवशीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा
  • ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावात दर्जेदार व खात्रीशीर गांडूळ खत उपलब्ध...
    ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावात दर्जेदार व खात्रीशीर गांडूळ खत उपलब्ध…
  • ॲग्रोवर्ल्डतर्फे अस्सल व नैसर्गिकरित्या पिकविलेला देवगड हापूस
    ॲग्रोवर्ल्डतर्फे अस्सल व नैसर्गिकरित्या पिकविलेला देवगड हापूस… आरोग्याशी खेळ नाही..

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरशेतकरी मोर्चाशेती उद्योगसिंचन
Previous Post

धरणं गाळमुक्त करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात भन्नाट पॅटर्न

Next Post

कापसाला मिळाला असा दर ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

Next Post
कापूस

कापसाला मिळाला असा दर ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.