पुणे : केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य लागू केले आणि त्यानंतर कांद्याच्या निर्यातीवर 7 डिसेंबर रोजी बंदी घातली. मात्र, यानंतर घाऊक बाजारातील कांद्याचे दर 50 टक्क्यांनी घसरले. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून कांदा दरातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी राज्यातील दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने नुकतीच कांदा साठवणुकीसाठी कांदा बँक उभारण्याची घोषणा केली. ही कांदा भंडारण बँक राज्यभर उभारली जाणार आहे. कांदा भंडारण बँक उभारली जाणार म्हणजे नेमके काय होणार ?, याचा शेतकऱ्यांना काय आणि कसा फायदा होणार ?, यासह आज कांद्याला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
कांदा भंडारण बँक
केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी राज्यातील दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली असतानाच राज्यात देखील कांदा उत्पादकांसाठी हालचाली सुरु असल्याचे दिसून येत आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात प्रथम कांदा भंडारण बँक स्थापन करणार असल्याची घोषणा केली. यासाठी भाभा अणू संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ अजित कुमार मोहंती आणि अनिल काकडकर राज्य सरकारला मदत करणार आहे. कांदा भंडारण बँकेत कांदा साठवून ठेवण्यासाठी कांद्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून त्यानंतर कांदा कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवला जाणार आहे. यामुळे कांदा जास्त काळ टिकेल आणि कांद्याला कोंबही फुटणार नाही.
शेतकऱ्यांना असा होणार फायदा
शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी राज्य सरकारने कांदा भंडारण बँक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक शेतकरी आपला कांदा चाळींमध्ये साठवतात. यात कांदा मोठ्या प्रमाणात सडतो. मात्र आता या आयनीकरण विकिरण तंत्रज्ञानाच्या मदतीने कांद्याला विकिरणांच्या संपर्कात आणले जाणार आहे. या तंत्रज्ञाच्या मदतीने कांद्यातील काही घटक मृत करत त्याची जास्त काळ टिकविण्याची क्षमता वाढविली जाणार आहे. ज्यामुळे कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळले जाणार आहे.
आजचे कांदा बाजारभाव
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कांद्याला आज लासलगाव – विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 1,900 रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर जास्तीत जास्त दर हा 2,100 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच कांद्याची सर्वाधिक आवक ही पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. येथे 11,522 क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
शेतमाल |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कांदा (21/12/2023) |
|||
खेड-चाकण | क्विंटल | 400 | 1800 |
लासलगाव – विंचूर | क्विंटल | 10500 | 1900 |
पुणे | क्विंटल | 11522 | 1900 |
कांदा (20/12/2023) | |||
कोल्हापूर | क्विंटल | 6798 | 1800 |
अकोला | क्विंटल | 1150 | 2000 |
छत्रपती संभाजीनगर | क्विंटल | 1838 | 1200 |
मुंबई – कांदा बटाटा मार्केट | क्विंटल | 11683 | 2000 |
खेड-चाकण | क्विंटल | 5500 | 2300 |
मंचर- वणी | क्विंटल | 80 | 1555 |
सातारा | क्विंटल | 241 | 2000 |
हिंगणा | क्विंटल | 2 | 3000 |
जुन्नर – नारायणगाव | क्विंटल | 40 | 2000 |
अकलुज | क्विंटल | 330 | 1500 |
सोलापूर | क्विंटल | 73355 | 1600 |
बारामती | क्विंटल | 620 | 2000 |
येवला | क्विंटल | 11881 | 1800 |
येवला -आंदरसूल | क्विंटल | 7980 | 1850 |
लासलगाव | क्विंटल | 11088 | 1900 |
लासलगाव – निफाड | क्विंटल | 2600 | 2000 |
लासलगाव – विंचूर | क्विंटल | 17870 | 1900 |
जळगाव | क्विंटल | 2419 | 1250 |
धाराशिव | क्विंटल | 37 | 900 |