राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला समितीची साप्ताहिक बैठक 19 डिसेंबर रोजी पार पडली. त्यानुसार, राहुरी विद्यापीठाकडून शेतकरी बांधवांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला देण्यात आला आहे.
राहुरीतील ग्रामीण कृषि मौसम सेवा, ऐएमएफयु आणि कृषि विद्या विभाग, मफुकृवि यांच्यातर्फे हा हवामान आधारीत कृषि सल्ला जारी करण्यात आला आहे.
पुढील काही दिवस ढगाळ वातावरण
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामान पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल ॲपचा वापर करण्याचे सुचविण्यात आले आहे. सध्याच्या बदलत्या हवामानात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना, फवारणी करण्याची गरज आहे.
पीकनिहाय कृषी सल्ला
आगामी आठवड्यांसाठी पीकनिहाय कृषी सल्ला खालील दोन्ही छायाचित्रातून देण्यात आला आहे –
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- दक्षिणेत मुसळधार; उत्तरेत कडाक्याच्या थंडीची लाट; उर्वरित देश गारठ्याने कुडकुडला; राज्यात काय राहील स्थिती?
- रब्बी ज्वारी : किड नियंत्रणासाठी उपाययोजना