• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पीकविमा मंजूर – कृषिमंत्री मुंडे

धुळे जिल्ह्यातील लक्षवेधी सुचनेवर धनंजय मुंडेंचे उत्तर, धुळ्यात आतापर्यंत 69 कोटी अग्रीम मंजूर, विम्याची रक्कम आणखी वाढणार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2023
in हॅपनिंग
0
राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पीकविमा मंजूर - कृषिमंत्री मुंडे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई (प्रतिनिधी) प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा योजनेची राज्य शासनाने यशस्वी अंमलबजावणी केली असून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात अग्रीम 25% अंतर्गत आतापर्यंत 2206 कोटी रुपये अग्रीम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे आणि आतापर्यंत सतराशे कोटींपेक्षा अधिक रकमेचे वाटप करण्यात आले आहे व उर्वरित सुमारे 500 कोटी रुपयांचे वाटप प्रगतीपथावर असल्याची माहिती लक्षवेधी सूचनेच्या निमित्ताने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली.

धुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळाला नसल्याबाबत आमदार कुणाल पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, यावरून धनंजय मुंडे यांनी धुळे जिल्ह्यातील वस्तुस्थिती दर्शक आकडेवारी विधानसभा सभागृहात सादर केली. धुळे जिल्ह्यातील पिक विमा संदर्भात निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या एचडीएफसी या विमा कंपनीने अग्रीम अधिसूचनेच्या विरोधात जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच राज्य शासनाकडे अपील केले असता हे अपील राज्य सरकारने फेटाळून लावले असून धुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना 69 कोटी रुपये इतका विमा आजपर्यंत अग्रीम अंतर्गत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देखील धनंजय मुंडे यांनी सभागृहात दिली.

हिंगोली जिल्ह्यातील पीक अग्रीम वितरण लवकरच

हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील एचडीएफसी इरगो ही विमा कंपनी नियुक्त असून या विमा कंपनीचे अपील केंद्र सरकारकडे प्रलंबित असून याबाबतची सुनावणी केंद्र सरकारकडून लवकरच केली जाईल व हिंगोली जिल्ह्यातील पीक विम्याचे देखील अग्रीम प्रमाणे वितरण लवकरच केले जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी विधानसभा सदस्य राजू नवघरे यांनी उपस्थित केलेल्या उपप्रश्नाच्या अनुषंगाने दिली.

दरम्यान राज्य शासनाने नव्याने सुरू केलेल्या एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला, तसेच आतापर्यंत अग्रीम अंतर्गत 70 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. या अंतर्गत मिळालेली 2200 कोटी रुपये कमी ऐतिहासिक आहे.

ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।

 

पीक विम्याची ऐतिहासिक रक्कम शेतकऱ्यांना मिळाली

अनेक महसूल मंडळे पावसाचा दीर्घ खंड, अतिवृष्टी यांसारख्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या निकषांमध्ये बसत नव्हते मात्र आम्ही कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, हवामान तज्ञ यांसारख्या अनेकांची मदत घेऊन निकषांच्या पलीकडे जाऊन अग्रीम पिक विमा देण्यास विमा कंपन्यांना भाग पाडले, त्यामुळेच अग्रीम पीक विम्याची ऐतिहासिक रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकली, याचा मला अभिमान वाटतो, असेही यावेळी धनंजय मुंडे यांनी आवर्जून नमूद केले.

 

Nirmal Seeds

चालू रब्बी हंगामात देखील मागील पाच वर्षांच्या आकडेवारी पाहता राज्यातून 71 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा विमा भरला आहे. सध्या चर्चेत असलेल्या हरभरासारख्या विविध पिकांचे नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामात भरलेल्या पीक विम्याचा लाभ मिळणार असून यामध्ये कुठेही अडचण आल्यास शेतकऱ्यांच्या पाठीशी कृषी विभाग ठामपणे उभा असेल, असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Ajit seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पीकविमा मंजूर – कृषिमंत्री मुंडे
  • कृषी सल्ला : हरभरा पीक पाणी व्यवस्थापन, तुषार सिंचनाचा वापर, घाटे अळी प्रादुर्भाव

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अग्रीम पीकविमाकृषीमंत्री धनंजय मुंडेरब्बी हंगाम
Previous Post

हरभरा -सिंचन व कीड व्यवस्थापन

Next Post

रब्बी ज्वारी : किड नियंत्रणासाठी उपाययोजना

Next Post
ज्वारी

रब्बी ज्वारी : किड नियंत्रणासाठी उपाययोजना

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish