पुणे : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या अनुदान वाटप धोरणात महत्त्वाचे बदल केले आहे. तुषार संचाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता तीन वर्षांनी पुन्हा ठिबक संचाचा लाभ घेता येणार आहे.
तुषार संचाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला आता सात ऐवजी तीन वर्षात पुन्हा ठिबक सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच ऑटोमेशनला देखील अनुदानाच्या कक्षेत आणले गेले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) या उपक्रमासाठी अनुदान मिळते. या योजनेतील किचकट बाबी हटवून काही बदल करण्याचा प्रस्ताव राज्याकडून केंद्राला पाठविला गेला होता. त्यानुसार केंद्र शासनाने सन 2023 मधील नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले आहेत. सध्याच्या नियमानुसार सूक्ष्म संचासाठी सात वर्षात पुन्हा अनुदानाचा लाभ घेता येत नाही.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
एखाद्या शेतात तुषार संचासाठी अनुदान घेतलेल्या शेतकऱ्याला आता तीन वर्षानंतर ठिबक संच घेण्याकरिता अनुदान देता येणार आहे. परंतु ठिबक अनुदानाची परिगणना करताना आधीच्या तुषार संचासाठी दिलेल्या अनुदांनाची रक्कम ठिबकच्या अनुदानातून वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे. या बदलामुळे शेतकऱ्याला एकाच क्षेत्रावर पिक पद्धतीत बदल करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे ठिबकखालील क्षेत्रात वाढ होणार असून खते व पाण्याची बचत होण्यास मदत मिळेल, असे फलोत्पादन विभागाचे म्हणणे आहे. या अनुषंगाने आवश्यक ते बदल महाडीबीटीवर करण्यात येत आहेत.
सूक्ष्म सिंचन कार्यक्रम राबविण्यात राज्य आघाडीवर – डॉ. कैलास मोते
फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी सांगितले की, “ सूक्ष्म सिंचन कार्यक्रम राबविण्यात राज्य आघाडीवर आहे. मात्र, या योजनेत बदल करण्यासाठी 2022 मध्ये केंद्राला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यातील बदल स्वीकारण्यात आले आहेत. ठिबक आधारित स्वयंचलित प्रणालीसाठी (ऑटोमेशन) आता प्रतीहेक्टरी रु. 40 हजार निधी मर्यादा केंद्र शासनाने निश्चित करून दिलेली आहे.यामुळे राज्यातील ऑटोमेशन आधारीत उच्च तंत्रज्ञान कृषी व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.” ऑटोमेशन कार्यक्रम राज्यात राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना निश्चित करण्याची कार्यवाही चालू आहे.
सूक्ष्म सिंचन योजनेतील हे आहेत महत्वाचे बदल
• तुषार सिंचनासाठी लाभ घेतलेल्या त्याच शेतकऱ्याला तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ मिळणार.
• ऑटोमेशनसाठी प्रतिहेक्टरी 40 हजार रुपये निधी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
• समूह शेतीमधील गटांना सूक्ष्म सिंचनासाठी 55 टक्क्यांपर्यत अनुदान
• तुषार सिंचनामध्ये राईजर पाईप हा घटक GI लोखंडी सह POLYPROPILIN (PPP) आणि PVC राईजर पाईप वापरण्यास मान्यता. SPRINKLER नोझल IS12232 या घटकासाठी ब्रास आणि प्लास्टिक नोझल वापर करण्यास मान्यता. MINI SPRINKLER घटकामध्ये मेन व सबमेन साठी PVC पाईपसह HDPE IS 4984 पाईप वापरास मान्यता.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- सावधान, महाराष्ट्रात आजपासून रविवारपर्यंत तीन दिवस पावसाचे; गुजरात, मध्य प्रदेशातही अवकाळी पावसाची शक्यता
- 4 महिन्यांत 32 लाखांची कमाई; पपई आणि टरबूज विकून बदलले शेतकऱ्याचे नशीब