मंगेश शिवराजप्पा धनासुरे यांची ही शेतकरी यशोगाथा आहे. लातूर जिल्ह्यातील या शेतकऱ्याने 4 महिन्यांत 32 लाखांची कमाई केली आहे. पपई आणि टरबूज विकून धनासुरे यांचे नशीबच बदलले आहे. त्यांची ही Agri Success Story (कृषी यशोगाथा) आपण जाणून घेऊया.
धनासुरे यांनी गेल्या 4 महिन्यात 18 लाख रुपयांची पपई आणि 14 लाखांचे टरबूज विकले आहेत. ते सांगतात की, दर 15 दिवसांनी ते बागेतून 20 टन पपई काढतात. पपईतून त्यांचा निव्वळ नफा अंदाजे 18 लाख रुपये होता. त्याचबरोबर टरबूज विकून 14 लाखांचा नफाही कमावला आहे. त्यांच्या यशाने प्रेरित होऊन इतर गावातील शेतकरीही त्यांच्याकडून पपई लागवडीचे गुण शिकण्यासाठी येत आहेत.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
पपईची 7,000 रोपे लावली
मंगेश शिवराजप्पा धनासुरे हे लातूर जिल्यातील निलंगा तालुक्यातील लिंबाळा गावचे रहिवासी आहेत. त्यांनी गावातच साडेसहा एकर जमिनीवर पपईची लागवड केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी पपईच्या सुमारे 7,000 रोपांची पेरणी केली होती. त्यासाठी 6 लाख रुपये खर्च आला. अवघ्या 8 महिन्यांनी शेतीतून पपईचे उत्पादन सुरू झाले. गेल्या ऑगस्टपासून ते पपईची विक्री करत आहेत.
दर 15 दिवसांत कमावत आहेत 3 लाख रुपये
धनासुरे यांनी आतापर्यंत 24 लाख रुपयांची पपई विकली आहे. ते सांगतात की, दर 15 दिवसांनी ते त्यांच्या बागेतून 20 टन पपई काढतात. त्यांच्या शेतात पिकवलेली पपई दिल्लीला पुरवली जात आहे. या पपईला बाजारात 20 रुपये किलो दर मिळत आहे. अशा स्थितीत दर 15 दिवसांत ते 3 लाख रुपये कमावत आहेत. ऑगस्टपासून आतापर्यंत त्यांनी आपल्या बागेत 8 वेळा पपईची काढणी केली आहे. म्हणजेच अवघ्या 4 महिन्यांत त्यांनी 24 लाखांची कमाई केली आहे. खर्च वगळल्यास, मंगेश शिवराजप्पा यांनी 4 महिन्यांत 18 लाख रुपयांचा निव्वळ नफा पपईतून कमावला आहे.
पपईच्या शेतातच पिकवलेले 160 टन टरबूज विकले
पपई पेरल्यानंतर धनासुरे यांनी त्याच शेतात टरबूजाची लागवड केली. यंदा त्यांनी साडेसहा एकर पपईच्या शेतात टरबूजाची पेरणी केली. त्यासाठी 4 लाख रुपये खर्च आला. 4 महिन्यांनंतर त्यांनी 160 टन टरबूज विकून 18 लाख रुपये कमावले. इथेही खर्च वगळला तर मंगेश शिवराजप्पा धनासुरे यांनी टरबूज विकून 14 लाखांचा निव्वळ नफा कमावला आहे.