• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यात पिकांना जीवदान, पावसाचा जोर कायम; कोकणात आज मुसळधार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 9, 2023
in हवामान अंदाज
0
राज्यात पिकांना जीवदान, पावसाचा जोर कायम; कोकणात आज मुसळधार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मान्सून प्रणाली अजून मजबूत – आयएमडी, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात आहेत विशेष अलर्ट

हवामान विभागाने आधीच वर्तविलेल्या अंदाजानुसार,गेले 4-5 दिवस राज्यात समाधानकारक पाऊस बरसत आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज कोकणासह राज्यातील सहा जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस घाट परिसरातही मुसळधार राहील.

 

 

ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाण्याअभावी पीके माना टाकू लागली होती. मात्र, पावसाने सप्टेंबरमध्ये राज्याच्या विविध भागात हजेरी लावून पिकांना जीवदान दिले. मुंबई-ठाण्यासह, पालघर, पुणे, नाशिक, नंदुरबार, वाशिम जिल्ह्यात गेल्या चांगला पाऊस होत आहे. पावसाचा हा जोर पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर काहीशी विश्रांती घेऊन 14 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढून 17 सप्टेंबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पावसाचा रब्बी हंगामासाठी फायदा होणार आहे.

गोदावरी वाहू लागली, दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी : नाशिकमध्ये गंगापूर धरणातून यंदा प्रथमच विसर्ग झाला. गोदावरी वाहू लागली. दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागल्याने नाशिककर सुखावले आहेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम व मध्य महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस झाला. नाशिक, पुण्यासह राज्यातील बहुतांश धरणात आता पाणीसाठा वाढला आहे. आता मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर कोकणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनची नवी प्रणाली तयार झाल्यानंतरच विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पुन्हा चांगल्या पावसाचे दिवस येऊ शकतात.

https://youtu.be/hnQTCb25Ow4?feature=shared
“आयएमडी”चे आजचे हवामान बुलेटिन

महाराष्ट्रात मान्सूनला जोमदार बनवणारी यंत्रणा कार्यरत

पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, शुक्रवारी दिवसभरात (संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत) हर्णे, महाबळेश्वर, सांताक्रूझ, माथेरान, नाशिक, अलिबाग, कुलाबा इथे चांगला पाऊस झाला. मान्सूनचे हे पुनरुज्जीवन आवश्यक होते. बंगालच्या उपसागरा तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा अनुकूल परिणाम अरबी समुद्रातही जाणवत आहे. चक्रीवादळ (UAC), कमी दाबाची रेषा आणि पश्चिमेकडील जोरदार वारे अशी महाराष्ट्रात मान्सूनला जोमदार बनवणारी यंत्रणा अजूनही कार्यरत आहे, असे कश्यपी यांनी म्हटले आहे. सध्या सिंधुदुर्ग वगळता कोकणातील सर्व जिल्हे तसेच नाशिक, पुणे आणि सातारा येथील घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील गेल्या 24 तासातील “मोठा” पाऊस

हर्णे बंदर (रत्नागिरी) – 120 मिलिमीटर
महाबळेश्वर – 80 मिमी
माथेरान & सांताक्रूझ (मुंबई) – 70
ठाणे & नाशिक – 60
अलिबाग & कुलाबा (मुंबई) – 50
रत्नागिरी & चिखलदरा – 30
डहाणू & चिंचवड (पुणे) – 20
जळगाव & पुणे शहर – 10

“आयएमडी”च्या सद्य निरीक्षणानुसार (नाऊकास्ट) राज्यातील जिल्हानिहाय स्थिती. त्यानुसार, आधीच्या सहा जिल्ह्यातील ऑरेंज अलार्टपेक्षा वेगळी स्थिती दिसत आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यात सध्या ऑरेंज अलर्ट स्थिती दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यात यलो अलर्ट दिसत असून इथली परिस्थीत बदलू शकते.


Nirmal Seeds
Nirmal Seeds

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, शनिवारी राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट आहे. या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील उर्वरीत भागातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी आज पावसाचा कोणताही विशेष अलर्ट नाही. तरीही या जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

https://eagroworld.in/find-out-if-drones-can-be-used-in-your-farm/

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी इशारा जारी केला आहे. पालघर जिल्ह्यासाठी शनिवारी (9 सप्टेंबर) आणि रविवारी (10 सप्टेंबर)  अनुक्रमे यलो आणि ग्रीन अलर्ट जारी केला. शनिवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

Ajit Seeds
Ajit Seeds

 

रविवारी पालघर जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी, काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या अंदाजासह यलो अलर्ट आहे. मुंबईसाठी 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजासह ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 11 आणि 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

https://eagroworld.in/good-news-for-farmers-after-rains/

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आयएमडीचक्रीवादळंपाऊसमहाराष्ट्र हवामानमान्सून अपडेट
Previous Post

शेळी पालन : दूषित चारा, पाण्यातून होणाऱ्या जंतांपासून घ्यावयाची काळजी

Next Post

कृषि सल्ला : कुक्कुट पालन – गोलकृमी, पट्टकृमी प्रादुर्भावात घ्यावयाची काळजी

Next Post

कृषि सल्ला : कुक्कुट पालन - गोलकृमी, पट्टकृमी प्रादुर्भावात घ्यावयाची काळजी

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.