पुणे : Maka Lagwad… मका हे नगदी पिक असल्याने शेतकर्यांकडून खरीप आणि रब्बी या दोनही हंगामात मकाची लागवड केली जाते. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असल्याने यंदा मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होण्याची शक्यता शेतकर्यांकडून वर्तविली जात आहे. दरम्यान, मकाच्या लागवडी करीता कोणते वाण निवडावे, असा प्रश्न देखील शेतकर्यांना पडू लागला आहे. शेतकर्यांची ही बाब लक्षात घेवून आपण काही कमी खर्चात व कमी वेळेत अधीक उत्पादन देणार्या वाणांची माहिती जाणून घेणार आहोत.
रब्बीच्या हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत मक्याची शेती केली जाते. यंदा पावसाला उशिराने सुरुवात झाल्याने खरीपातील पिकांची लागवड उशिराने होवून काढणीही उशिराने झाली. अनेक ठिकाणी कापसाचे उद्यापही शेतात उभे आहे. त्यातच थंडीला देखील उशिराने सुरुवात झाल्याने रब्बीच्या हंगामातील पेरण्या देखील लांबल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांकडून देखील कमी कालावधीत अधिक उत्पादन देणार्या वाणाचा शोध घेतला जात आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
दरम्यान, अलीकडेच बंगलोर (Bangalore) येथील कृषी विज्ञान केंद्र (Agriculture Science Centre) च्या कृषी शास्त्रज्ञांनी मक्याचे अधीक उत्पादन देणार्या दोन जाती (वाण) विकसित केल्या आहेत. या वाणाच्या माध्यमातून आलेल्या पिकाचे अवशेष मका काढल्यानंतर हिरवेच राहत असल्याने जनावरांसाठी चारा देखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे मकाची लागवड करू इच्छिणार्या शेतकर्यांसाठी हे वाण फायदेशीर ठरणार आहे.
या आहेत वाण
एमएएच 14-138 आणि एमएएच 15-84 अशी विकसीत केलेल्या नवीन वाणची नावे आहेत. जे चांगले उत्पादन देतात अशा मूळ ओळींपासून हे वाण बनवलेले आहेत. पिकाच्या काढणीनंतरही शेत हिरवेगार राहते. त्यांचा चारा जनावरांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
असे आहे या वाणचे वैशिष्ट्य
मक्याचे नवीन विकसित करण्यात आलेले एमएएच 14-138 हे वाण शास्त्रज्ञांनी 8 वर्षांत तयार केले आहे. या जातीला व्यावसायिक लागवडीसाठीही मान्यता मिळाली आली आहे. एमएएच 14-138 या वाणाच्या मक्याचा उत्पादनाचा कालावधी 120 ते 135 दिवसांचा आहे, जे एकेरी 35 ते 38 क्विंटल उत्पादन देऊ शकते. तर एमएएच 15-84 या वाणाला व्यावसायिक लागवडीसाठी अद्याप मंजूरी मिळालेली नाही. परंतु पुढील वर्षापर्यंत ते शेतकर्यांना चांगले उत्पादन देईल, यात काही शंका नाही, असे हे वाण विकसीत करणार्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मक्याच्या या जातीचा पीक कालावधी 115 ते 120 दिवसांचा असून 40 ते 42 क्विंटल उत्पादन घेता येते. हे वाण बागायती आणि कोरडवाहू जमिनीसाठी देखील फायदेशीर आहे.
दुहेरी फायदा
सहसा पिकांचा कडबा कोरडा चारा म्हणून वापरतात. वाळलेल्या मकाच्या देठांचाही यासाठी वापर केला जातो, परंतु नवीन जातीमध्ये काही विशेष आहे. त्याचा कडबा खाल्ल्यानंतर पचायलाही सोपा आहे. आतापर्यंत शेतकरी भात, नाचणी या पिकांचा कडबा किंवा पेंढा जनावरांना खाऊ घालत होते, मात्र आता मकाचाही त्यात सामील होणार आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇