• Home
    • आमच्याविषयी
Agro World
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
Agro World
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Maka Lagwad : रब्बीच्या हंगामात लागवडीसाठी मकाच्या या वाणाची करा निवड

कमी खर्च आणि कमी वेळेत मिळेल अधिक उत्पादन

Team Agro World by Team Agro World
December 5, 2022
in तंत्रज्ञान / हायटेक
0
Maka Lagwad
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : Maka Lagwad… मका हे नगदी पिक असल्याने शेतकर्‍यांकडून खरीप आणि रब्बी या दोनही हंगामात मकाची लागवड केली जाते. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असल्याने यंदा मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून वर्तविली जात आहे. दरम्यान, मकाच्या लागवडी करीता कोणते वाण निवडावे, असा प्रश्न देखील शेतकर्‍यांना पडू लागला आहे. शेतकर्‍यांची ही बाब लक्षात घेवून आपण काही कमी खर्चात व कमी वेळेत अधीक उत्पादन देणार्‍या वाणांची माहिती जाणून घेणार आहोत.

रब्बीच्या हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत मक्याची शेती केली जाते. यंदा पावसाला उशिराने सुरुवात झाल्याने खरीपातील पिकांची लागवड उशिराने होवून काढणीही उशिराने झाली. अनेक ठिकाणी कापसाचे उद्यापही शेतात उभे आहे. त्यातच थंडीला देखील उशिराने सुरुवात झाल्याने रब्बीच्या हंगामातील पेरण्या देखील लांबल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांकडून देखील कमी कालावधीत अधिक उत्पादन देणार्‍या वाणाचा शोध घेतला जात आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

दरम्यान, अलीकडेच बंगलोर (Bangalore) येथील कृषी विज्ञान केंद्र (Agriculture Science Centre) च्या कृषी शास्त्रज्ञांनी मक्याचे अधीक उत्पादन देणार्‍या दोन जाती (वाण) विकसित केल्या आहेत. या वाणाच्या माध्यमातून आलेल्या पिकाचे अवशेष मका काढल्यानंतर हिरवेच राहत असल्याने जनावरांसाठी चारा देखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे मकाची लागवड करू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांसाठी हे वाण फायदेशीर ठरणार आहे.

या आहेत वाण

एमएएच 14-138 आणि एमएएच 15-84 अशी विकसीत केलेल्या नवीन वाणची नावे आहेत. जे चांगले उत्पादन देतात अशा मूळ ओळींपासून हे वाण बनवलेले आहेत. पिकाच्या काढणीनंतरही शेत हिरवेगार राहते. त्यांचा चारा जनावरांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Ajeet Seeds

असे आहे या वाणचे वैशिष्ट्य

मक्याचे नवीन विकसित करण्यात आलेले एमएएच 14-138 हे वाण शास्त्रज्ञांनी 8 वर्षांत तयार केले आहे. या जातीला व्यावसायिक लागवडीसाठीही मान्यता मिळाली आली आहे. एमएएच 14-138 या वाणाच्या मक्याचा उत्पादनाचा कालावधी 120 ते 135 दिवसांचा आहे, जे एकेरी 35 ते 38 क्विंटल उत्पादन देऊ शकते. तर एमएएच 15-84 या वाणाला व्यावसायिक लागवडीसाठी अद्याप मंजूरी मिळालेली नाही. परंतु पुढील वर्षापर्यंत ते शेतकर्‍यांना चांगले उत्पादन देईल, यात काही शंका नाही, असे हे वाण विकसीत करणार्‍या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मक्याच्या या जातीचा पीक कालावधी 115 ते 120 दिवसांचा असून 40 ते 42 क्विंटल उत्पादन घेता येते. हे वाण बागायती आणि कोरडवाहू जमिनीसाठी देखील फायदेशीर आहे.

Sunshine Power Of Nutrients

दुहेरी फायदा

सहसा पिकांचा कडबा कोरडा चारा म्हणून वापरतात. वाळलेल्या मकाच्या देठांचाही यासाठी वापर केला जातो, परंतु नवीन जातीमध्ये काही विशेष आहे. त्याचा कडबा खाल्ल्यानंतर पचायलाही सोपा आहे. आतापर्यंत शेतकरी भात, नाचणी या पिकांचा कडबा किंवा पेंढा जनावरांना खाऊ घालत होते, मात्र आता मकाचाही त्यात सामील होणार आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Bhendi van : भेंडी लागवडीसाठी आहेत हे सर्वोत्तम वाण ; देतील भरघोस उत्पादन
  • Onion crop management : कांदा पिकाच्या लागवडीनंतर असे करा व्यवस्थापन
Tags: कृषी विज्ञान केंद्रमका वाणरब्बी हंगामवाण शास्त्रज्ञ
Previous Post

“कृषी शेतमाल निर्यात संधी” एकदिवसीय कार्यशाळा… जळगावचे बुकिंग फुल्ल.. सहकार्य अपेक्षित …

Next Post

Rabi Season : ढगाळ वातावरणाचा रब्बीच्या या पिकांवर होईल परिणाम

Next Post
Rabi Season

Rabi Season : ढगाळ वातावरणाचा रब्बीच्या या पिकांवर होईल परिणाम

ताज्या बातम्या

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
February 3, 2023
0

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
February 2, 2023
0

Arthsankalp 2023 : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर ; या आहेत 24 महत्त्वपूर्ण घोषणा

Arthsankalp 2023 : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर ; या आहेत 24 महत्त्वपूर्ण घोषणा

by Team Agro World
February 2, 2023
0

अर्थसंकल्पा

शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात झाल्या या घोषणा

by Team Agro World
February 2, 2023
0

मध्य महाराष्ट्रा

शेतकरी पुन्हा संकटात ; मध्य महाराष्ट्रासह ‘या’ ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा

by Team Agro World
February 1, 2023
0

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
February 1, 2023
0

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

शहादा येथील मारुती प्रेस मैदानावर 10 ते 13 फेब्रुवारी अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन..

by Team Agro World
January 31, 2023
0

कृषी प्रदर्शना

अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात पिकांवरील फवारणी करणाऱ्या ड्रोनचे प्रात्यक्षिक

by Team Agro World
January 31, 2023
0

शेतकऱ्या

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर वारसाला मिळणार या योजनेचा लाभ ?

by Team Agro World
January 31, 2023
0

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
January 31, 2023
0

तांत्रिक

Cotton Rate

Cotton Rate : 300 गाठींवर स्थिरावणार यंदाचे उत्पादन ; जाणून घ्या… नेमकी परिस्थिती काय ?

by Team Agro World
January 16, 2023
0

भरडधान्य खरेदी

धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी मुदतवाढ

by Team Agro World
November 23, 2022
0

Modern Farming Machinery

Modern Farming Machinery… आधुनिक यंत्रांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बदलतंय नशीब

by Team Agro World
October 3, 2022
0

आंबा लागवड

सोलापूर जिल्ह्यात पीक पद्धती बदलतेय; आंबा लागवडीकडे वाढता कल

by Team Agro World
September 26, 2022
1

जगाच्या पाठीवर

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
February 3, 2023
0

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
February 2, 2023
0

Arthsankalp 2023 : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर ; या आहेत 24 महत्त्वपूर्ण घोषणा

Arthsankalp 2023 : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर ; या आहेत 24 महत्त्वपूर्ण घोषणा

by Team Agro World
February 2, 2023
0

अर्थसंकल्पा

शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात झाल्या या घोषणा

by Team Agro World
February 2, 2023
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

WhatsApp Group