मुंबई : Farmers meeting… काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली. तर आता २६ नोव्हेंबरला बुलढाण्यातील चिखलीत उद्धव ठाकरे शेतकरी मेळावा (Farmers meeting) घेणार आहेत. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे शिंदे- फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालपासून म्हणजेच ३१ ऑक्टोबर पासून मातोश्रीवर मॅरेथॉन बैठकांना ठाकरेंनी सुरुवात केली आहे.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरुन उद्धव ठाकरे शिंदे सरकारला घेरण्याची शक्यता आहे. विधानसभा अधिवेशनाच्या आधी उद्धव ठाकरेंचा होणारा हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत मातोश्री निवासस्थानी बैठकांचं सत्र पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. आगामी काळातील मित्र पक्षांसोबतच्या युतीबाबत या बैठकांनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी
दरम्यान, नुकताच 23 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी जाणून घेतली होती. तर याचवेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली होती. तर गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी मी स्वतःरस्त्यावर उतरेल असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. कारण सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली होती. या पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक हिरावून घेतलं आहे. त्यामुळ शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇