जळगाव (प्रतिनिधी) – लंपी स्किन डिसीजबाबत महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात झपाट्याने पसरतोय. याबाबत अॅग्रोवर्ल्डने 14 सप्टेंबरलाच पशुपालकांना सावध राहण्याबाबर गर्भित इशारा दिला होता. “पशुपालकांनो सावधान – महाराष्ट्रात पसरतोय जनावरांचा विषाणू लंपी स्किन डिसीज काय आहेत आजाराची लक्षणे व उपचार..?” या मथळ्याखाली वृत्त झळकवले होते. या आजाराची लागण आज महाराष्ट्रासह इतरही राज्यातील जनावरांना मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पशुपालकांनी आपल्या गुरांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरे खरेदी करतानाही विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.