• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पशुपालकांनो सावधान – महाराष्ट्रात पसरतोय जनावरांचा विषाणू लंपी स्किन डिसीज (LSD) – काय आहेत आजाराची लक्षणे व उपचार…?

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 14, 2021
in इतर
1
पशुपालकांनो सावधान – महाराष्ट्रात पसरतोय जनावरांचा विषाणू लंपी स्किन डिसीज (LSD) – काय आहेत आजाराची लक्षणे व उपचार…?
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

लंपी स्किन डिसीज हा प्रमुख्याने गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणार्‍या देवीच्या आजाराशी साधर्म्य असणारा असून जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा आजार नवीन नाही. २०१९ मध्ये भारताच्या काही भागात हा आढळून आला आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात तो आता झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग व पशु व्यावसायिकांना या नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळीच काळजी व उपाय योजले नाही तर LSD ची व्याप्ती वाढून पशुधन संकटात येऊ शकते.

लंपी स्किन डिसीसची लक्षणे
हा विषाणूजन्य आजार आहे. जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीला जनावरास दोन-तीन दिवस ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी ४ ते ५ दिवसात फुटतात आणि त्यातून पस बाहेर येते. या गाठी सर्वसाधारणपणे पोट, पाठ पाय व जननेंद्रियाच्या भागात येतात. जनावरांच्या डोळ्यातून – नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाता येत नाही. पायावरील गाठीमुळे जनावरे चालणे कठीण होते. डोळ्यामध्ये व्रण पडतात व कालांतराने दृष्टी बाधित होण्याची शक्यता असते. न्यूमोनिया व श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात.
अशक्तपणामुळे जनावरांचा या आजारातून बरे होण्यास बऱ्याच दिवसांचा कालावधी लागतो. हा आजार बरा होण्यासाठी किमान दोन तीन आठवड्यांचा कालावधी लागतो.

कसा पसरतो हा आजार
एका बाधीत पशुधनापासून दुसऱ्या पशुधनाला डास, चावणाऱ्या माशा, गोचीड यांच्यामार्फत होतो.

LSD वर उपचार
लक्षणे आढळून आल्यास त्वरित बाधित जनावरास वेगळे करावे. अशा पशुधनाची वाहतूक व विक्री करू नये. हा विषाणूजन्य आजार आहे. याची बाधा झालेल्या जनावराची प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे इतर जिवाणूजन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने प्रतिजैविके देणे आवश्यक आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचाही सल्ला घ्यावा.
जनावरास मऊ हिरवा चारा व मुबलक पाणी द्यावे. तोंडावरती व्रणास दोन टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने धुऊन तोंडात बोरो ग्लिसरीन लावावे. लिव्हर टॉनिकच्या वापराने जनावरे लवकर बरे होण्यास मदत होते.

ताप कमी करणारी औषधे प्रतिकारशक्ती वर्धक अ व ई जीवनसत्व तसेच त्वचेवरील व्रणांसाठी मलमा (ट्यूब) चा वापर करावा. वेदनाशामक अँटी हिस्टॅमिनिक औषधांचा पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावे.

बाधित अथवा संशयित जनावरांचा उपचार करताना किंवा रोग नमुने गोळा करताना पी पी ई किटचा वापर करावा. हाच स्वच्छ धुऊन घ्यावेत. तपासणी नंतर सर्व साहित्य निर्जंतुक करावे.

प्रतिबंधात्मक उपाय
LDS वर अद्याप प्रभावी लस उपलब्ध नसल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. गोठा स्वछ ठेवावा. कीटक व डासांना आळा घालावा. लिंबाच्या पाल्याचा धूर करावा. जेणेकरून गोठ्यामध्ये डास व अधिक कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. आजाराचा प्रसार प्रामुख्याने कीटकापासून होतो. त्यामुळे आपल्या गोठ्यातील कीटकांचे नियंत्रण करावे. जनावरांचा गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा. शेजारी पाणी जमा होऊन चिखल होणार नाही, याची काळजी घ्यावी व त्यातील कीटकांच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात 40 मिली करंज तेल 40 मिली नीम तेल आणि दहा ग्रॅम साबण चांगला मिसळून घ्यावा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा गोठ्यामध्ये फवारावे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: 40 मिलीLSDउपचारजीवनसत्वडिसीजन्यूमोनियापोटॅशिअमलक्षणेलंपीश्वसनहिस्टॅमिनिक
Previous Post

खान्देशची केळी कोकणच्या मातीत; एकरी 1 लाख 20 हजारांचे उत्पन्न

Next Post

महात्म्य भेंडीचे.. ॲन्टीऑक्सिडेंट असलेली व शरीरातील टाॅक्झीन बाहेर काढण्यास उपयुक्त..

Next Post
महात्म्य भेंडीचे.. ॲन्टीऑक्सिडेंट असलेली व शरीरातील टाॅक्झीन बाहेर काढण्यास उपयुक्त..

महात्म्य भेंडीचे.. ॲन्टीऑक्सिडेंट असलेली व शरीरातील टाॅक्झीन बाहेर काढण्यास उपयुक्त..

Comments 1

  1. Jivan Patil says:
    4 years ago

    jivanpatil68@gmail.com

ताज्या बातम्या

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish