पुणे : सावधान! IMD Weather Alert नुसार, पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार आहे. आजपासून पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे.
राज्यातली नैऋत्य मोसमी म्हणजे मान्सूनचा पाऊस अजून थांबलेला नाही. गणेश विसर्जनापुरती राज्याच्या बहुतांश भागात पावसाची विश्रांती दिसली. गेल्या 2-3 दिवसात काही ठिकाणचा अपवाद वगळता पावसाचा जोरही राज्यात कमी राहिला. नाशिक, नगर, ठाणे, पालघरमधून पावसाचे क्षेत्र मुंबई व पुढे कर्नाटकातून दक्षिणेकडे सरकले होते. मात्र, आता हे पावसाचे क्षेत्र पुन्हा एकदा मुंबई, कोंकण आणि महाराष्ट्राकडे सरकत आहे.
पावसाचे ताजे अपडेट्स : रात्रीपर्यंतची स्थिती अन् पुढील 3-4 दिवसांचा वेध… Be Alert!
पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रीय होण्याची चिन्हे
राज्यात अनेक ठिकाणी सप्टेंबरमध्येही मुसळधार पाऊस होत आहे. अद्याप तरी हा पाऊस थांबणार नसल्याचीच चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागानेही तसा इशारा दिला आहे. राज्यात पुढील काही दिवस जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्यात पुन्हा एकदा सक्रीय होत असलेल्या मान्सूनमुळे पावसाची तीव्रता आजपासून आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Depression over south Odisha moved west-northwestwards near latitude 19.8°N and longitude 83.3°E, about 10 km southeast of Bhawanipatna (Odisha).To move west-northwestwards across south Odisha and south Chhattisgarh during next 24 hours and weaken gradually. pic.twitter.com/5hxhGBHCNf
— India Meteorological Department (@Indiametdept) September 11, 2022
👆👆👆
दक्षिण ओडिशात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र
दक्षिण ओडिशालगत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला आहे. भवानीपटना (ओडिशा) च्या सुमारे 10 किमी आग्नेय, 19.8°N अक्षांश आणि रेखांश 83.3°E जवळ पश्चिम-वायव्य दिशेने हा पट्टा पुढे सरकत आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत दक्षिण ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगड, तसेच विदर्भ व अंतर्गत महाराष्ट्रात हा पट्टा पश्चिम-वायव्य दिशेने सरकताना विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल. पुढे हा तीव्र दाबाचा पट्टा हळूहळू कमजोर होईल.
IMD GFS Model निर्देशानुसार शक्यता
पावसाचा अंदाज घेणाऱ्या भारतीय हवामान विभागाच्या IMD GFS Model निर्देशानुसार, 12 सप्टेंबरपासून मुंबई- ठाणेसह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. एकूणच पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार आहे. हवामान विभागाचे पुण्यातील प्रमुख (आयएमडी पुणे) कृष्णानंद उर्फ केएस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.
या जिल्ह्यात अतिजोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा
मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पुणे, सातारा तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात अतिजोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची तीव्रता 12 सप्टेंबरपासून वाढण्याची शक्यता असून कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर पाहायला मिळू शकतो. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस या भागाला झोडपून काढण्याची शक्यता आहे. राज्यातीच्या घाट भागातही तुफानी पावसाची शक्यता आहे. हे पाहता हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
👆👆👆
कालची, 11 सप्टेंबरची सकाळची स्थिती
11/09/2022, रविवारी सकाळी 11.30 वाजेची ही ताजी उपग्रह स्थिती पाहा. सकाळी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दबाव प्रणालीच्या प्रभावामुळे दक्षिण-पूर्व विदर्भाचा काही भाग व मराठवाड्याचा बहुतांश भाग दाट ढगांनी व्याप्त झाला आहे. या प्रदेशांत व संलग्न भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल. दक्षिण कोकणात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे, जेथे गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाला.
राज्यातील 11 सप्टेंबरच्या विजांच्या धोक्याचे अनुमान
हवामानाशी संबंधित केंद्र सरकारी संस्था आता हवामान अंदाज वर्तविण्यासाठी रिअल टाईम हाय रेझोल्यूशन सॅटेलाईट इमेजेसचा आधार घेतात. अशाच एका वेदर सिस्टिमवर, आज, रविवार, 11 सप्टेंबर रोजी राज्यात विजांचा धोका कसा राहू शकतो, ते वरील छायाचित्रातून दिसून येईल. लाल, नारंगी, पिवळसर रंग ज्या भागात आहे, तिथे धोका जास्त असू शकतो. या भागात कडकडाटासह पाऊस पडतो. गर्द हिरव्या भागातही जोरदार पाऊस होऊ शकतो. तुलनेने निळ्या भागात विजा नसतात आणि फारसा पाऊसही नसतो.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल👇
Comments 2