बाजार भाव

कापसाला बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा दर ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

पुणे : यंदा कापसाला चांगला दर मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. मात्र, त्यातही नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पाऊस झाल्यामुळे कापूस ओला झाला आणि कापसाच्या दरात घसरण झाली. दरम्यान, आज कापसाला बाजार समित्यांमध्ये किती भाव मिळाला तसेच कापसाची सर्वाधिक आवक कोणत्या बाजार समितीत झाली ?, हे आपण जाणून घेणार आहोत.

कापसाचे आगार म्हणून खान्देशातील जळगाव जिल्हा ओळखला जातो. दरम्यान, खरिपातील पिकांचे सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यातून वाचलेला कापसाची काढणी सुरु असतानाच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा संकटाला सामोरे जावे लागले. तसेच पिकांचे नुकसान तर झालेच मात्र कापसाचे दर हे एक हजार ते दिड हजार रुपये प्रतिक्विंटल मागे कमी झाले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज कापसाला राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 6 हजार 850 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7 हजार 020 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच येथे कापसाची 4,500 क्विंटल इतकी आवक झाली. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कापसाला 6 हजार 700 ते 6 हजर 900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कापसाला काल दि. 17 रोजी वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 7 हजार 050 रुपये प्रतिक्विंटल मिळाला.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (18/12/2023)

राळेगाव क्विंटल 4500 6850
कापूस (17/12/2023)
वडवणी क्विंटल 111 7025
कळमेश्वर क्विंटल 950 6795
वरोरा क्विंटल 1737 6700
वरोरा-खांबाडा क्विंटल 611 6700
भिवापूर क्विंटल 400 6605
कापूस (16/12/2023)
सावनेर क्विंटल 2800 6675
राळेगाव क्विंटल 4450 6850
भद्रावती क्विंटल 516 6850
वडवणी क्विंटल 231 7025
पांढरकवडा क्विंटल 267 6700
परभणी क्विंटल 1400 7100
अकोला क्विंटल 68 6415
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 121 7300
उमरेड क्विंटल 705 6750
देउळगाव राजा क्विंटल 900 6950
वरोरा-खांबाडा क्विंटल 1458 6700
हिंगणा क्विंटल 13 6750
सिंदी(सेलू) क्विंटल 1210 7000
हिंगणघाट क्विंटल 8500 6600
पुलगाव क्विंटल 4600 7050

 

Planto Advt
Planto
Nirmal Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button