• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

महत्वाच्या औषधी वनस्पती भाग- 2 नागकेशर

Team Agroworld by Team Agroworld
April 17, 2021
in तांत्रिक
0
महत्वाच्या औषधी वनस्पती भाग- 2 नागकेशर
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योग, इंजिन तेल, इमारती बांधकाम इत्यादींसाठी नागकेशराच्या विविध भागांचा वापर केला जातो. बागबगीचे, घरांच्या परसबागा, मंदिर परिसर इत्यादी ठिकाणी या वृक्षांची मुद्दामहून लागवड केली जाते. दक्षिण कोकण, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू इत्यादी दक्षिणेकडील राज्ये आदी ठिकाणी सदाहरित, निमसदाहरित जंगलांत हा वृक्ष निसर्गतः आढळतो. श्रीलंका या देशातही ही प्रजाती आढळते. ओळख आणि स्वरूप ः नागकेशर हा अत्यंत देखणा मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष बऱ्याचदा मंदिराच्या परिसरात लावलेला आढळतो.

या वृक्षाचे खोड एक ते दोन मीटरपर्यंत सरळ वाढते. खोडाची साल गुळगुळीत, राखाडी रंगाची असते. नवीन येणाऱ्या पालवी आणि फांद्या पांढऱ्या मखमली केस असलेल्या असतात. पाने साधी, भाल्यासारखी, तीक्ष्ण टोक असलेली असतात. फुले छान सुगंधाची एक ते तीन इंच आकाराची असतात. फुले फांद्यांच्या शेंड्याला येतात. फुलांमध्ये चार पांढऱ्या रंगाच्या मोठ्या पाकळ्या असतात. फुलांमध्ये सोनेरी पिवळ्या रंगाचे अनेक पुंकेसर असतात. फळे शंकूसारखी लंबगोल, बाह्य दलाने वेढलेली असतात. एका फळात बदामी रंगाच्या एक ते चार बिया असतात.
औषधी उपयोग

औषधे निर्मितीसाठी फुलांमधील वाळलेले पुंकेसर आणि बिया वापरल्या जातात. वेदना थांबविण्यासाठी, अति घाम व घामाची दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी, मूळव्याध प्रतिबंधक, जंतुनाशक, आम्ल-पित्तनाशक, पित्तातिसार, रक्तधातू इत्यादी विकारांत त्याचा उपयोग आयुर्वेदात सांगितलेला आहे. मूळव्याधीत रक्त जात असल्यास लोण्याबरोबर सेवन केले जाते. बियांमधील तेलामध्ये “मेसुईन’ नावाच्या रसायनामुळे श्‍वसनाचे विकार बरे होतात, असे म्हटले जाते.

रोपवाटिका आणि लागवड
  या वृक्षांस फुल फेब्रुवारी-मार्च महिन्यात येतात आणि फळे एप्रिल-मे महिन्यात परिपक्व होतात. फळांतील बिया काढून दोन ते चार दिवस सावलीत सुकवून 12 तास कोमट पाण्यात ठेवल्यास रुजवा चांगला मिळतो. रोपे तयार करण्यासाठी पाच ते आठ सें.मी. आकाराच्या पिशवीमध्ये पोयटा किंवा गाळाची माती, वाळू, चांगले कुजलेले शेणखत 2ः1ः2 या प्रमाणात चांगले मिसळून भरावे. प्रत्येक पिशवीत दोन बिया दोन सें.मी. खोलीवर टाकून आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे. रुजवा 15 ते 21 दिवसांनी झाल्यानंतर प्रति पिशवी एकच रोप ठेवून सेंद्रिय खतांची मात्रा आवश्‍यकतेनुसार द्यावी. रोपे 20-30 सें.मी. उंचीची झाल्यानंतर मोठ्या पिशवीत लावावीत. लागवडीयोग्य रोपे एक वर्षाने तयार होतात.
लागवडीसाठी शक्‍यतो दोन ते तीन फुटांची रोपे वापरावीत. मध्यम, भारी, निचरा होणाऱ्या जमिनीत 4 ु 4 मीटर अंतराने 2 ु 2 ु 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन लागवड केली जाते. रोपे लहान असताना तीव्र ऊन, अति थंडी, अति पाऊस यापासून संरक्षण करावे. सुरवातीला या वृक्षाचा वाढीचा वेग कमी असतो. लागवडीनंतर काळजी घेतल्यास पाच-सात वर्षांत फुले येण्यास सुरवात होते. अतिशय देखणा, सुंदर असा हा वृक्ष दुर्मिळ होत असल्याने आणि परंपरागत औषधी पद्धतीमध्ये उपयोग होत असल्याने याची लागवड व संवर्धन होणे आवश्‍यक आहे.
ः (02358) 282717  (लेखक दापोलीच्या वनशास्त्र महाविद्यालयात कार्यरत आहेत.)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: इंजिन तेलइमारती बांधकामऔषध निर्मितीऔषधी वनस्पतीदापोलीच्या वनशास्त्र महाविद्यालयनागकेशरसाबण उद्योगसौंदर्य प्रसाधने
Previous Post

महत्वाच्या औषधी वनस्पती भाग- १ अंजन

Next Post

सुरू उसात आंतरपिक कोबीवर्गीय पिकं नफ्याचे तंत्र

Next Post
सुरू उसात आंतरपिक कोबीवर्गीय पिकं नफ्याचे तंत्र

सुरू उसात आंतरपिक कोबीवर्गीय पिकं नफ्याचे तंत्र

ताज्या बातम्या

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish