• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जनावरांसाठी चारा पिके… भाग-१       

Team Agroworld by Team Agroworld
April 3, 2021
in तांत्रिक
0
जनावरांसाठी चारा पिके… भाग-१       
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेतजमिनीवर चार्‍यासाठी पिके लावता येतील. फक्त गवते लावण्याऐवजी गवत व शिंबी वर्गातील वनस्पतींचे मिश्र पीक घेणे, त्यांच्या पूरक कार्यामुळे जास्त चांगले. मिश्रणाने गुरांना लुसलुशीत, पाचक, सत्त्वयुक्त आहार मिळतो. तसेच केवळ तृणधान्याचे किंवा कडधान्याचे पीक घेण्याऐवजी मिश्र पीक घेतल्याने उत्पादन जास्त मिळते. प्रथिनांचे प्रमाण वाढते. वैरण अधिक मिळते.


शिंबी पिके पक्व झाल्यावरही त्यांच्यातील अन्नद्रव्यांची गुणवत्ता तृणांच्या मानाने टिकून राहते. शिंबी पिकात प्रथिने जास्त असतात. त्यामुळे चार्‍याची गुणवत्ता सुधारते. शिवाय ते मातीत नत्राचा पुरवठा करतात. मातीमधील नत्रे वाढतात, तिचा पोत सुधारतो, मातीची धूप होण्यावर नियंत्रण बसते, हवामानात होणारे तीव्र फेरफार सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते. तृणधान्याबरोबर कडधान्ये लावल्याने चार्‍याची गुणवत्ता सुधारता येते. मटकी व कुळीथ कमीतकमी पाण्यावर येणारी कडधान्ये आहेत. कुळथाचे पीक खरीप हंगामात घेतात. हे भारी काळ्या जमिनीपासून हलक्या, रेताड व खडकाळ जमिनीत वाढू शकत असले तरी बहुधा हलक्या जमिनीवर पीक घेतले जाते. जिथे इतर तृणधान्ये किंवा कडधान्ये येऊ शकत नाहीत तिथे कुळीथ घेतात. याचे दाणे भरडून, भिजवून किंवा शिजवून दुभत्या आणि कष्ट करणार्‍या गुरांना खुराक म्हणून चारतात. पाला व भुसकट जनावरांना खायला देतात. दाणे उकडून घोड्यांना खायला देतात. गुरे व मेंढ्यांना पाने हिरवा चारा म्हणून उपयोगी पडते. बाजरी व कुळथाचे मिश्र पीक घेता येते.


मटकीचे पीक पावसाळ्यात घेतात. कांडे व पाने गुरांना खायला देतात. मूग व उडीद खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेता येतात. याची पाने व कांडे गुरांना सकस आहार आहे. वालाची पाने व कांडे तसेच डाळीचा भरडा व कोंडा दुभत्या जनावरांना खायला देात. गुजरात, सातारा व बेळगाव जिल्ह्यांतून गवार चार्‍यासाठी लावतात. दाणे व हिरवा पाला गुरांना व घोड्यांना देतात. वाटाण्याचे पीक खरीप व रब्बी हंगामात घेतात. देशावर व गुजरातेत याची पाने व कांडे गुरांना खायला देतात. मेथीची पाने व देठ गुरांसाठी उत्तम आहार आहे. चवळीचे चार्‍याचे पीक बाजरी, ज्वारी किंवा मक्याबरोबर खरिपात घेतात. चवळीची हिरवी पाने व कांडे दुभत्या जनावरांसाठी चांगला आहार असतो.

मोहरीचे पीक हिवाळ्यात घेतात. ते लवकर तयार होते आणि गुरांना सकस, हिरवा चारा अल्पकाळात उपलब्ध होतो. याशिवाय धैंचा, लसूणघास, बरसीम आणि स्टायलो या शिंबी कुलातील वनस्पती चार्‍यासाठी लावल्याने चार्‍याची तसेच जमिनीची गुणवत्ता सुधारते. शेतजमिनीवर जिथे चार्‍यासाठी पिके लावण्यास वेगळी जमीन उपलब्ध नसेल तिथेही देान मुख्य नगदी पिकांधील काळात लवकर वाढणारे चार्‍याचे पीक एकटे किंवा मिश्रणात लावता येते. गहू, ज्वारी फेरपालटीत दोन कालावधी उपलब्ध असतात.
1) एप्रिल  ते जून,
2) ऑक्टोबर ते नोव्हेंबर.


पहिल्या कालावधीत ज्वारी+ चवळी, मका+चवळी किंवा बाजरी +चवळी असे मिश्र पीक घेता येते व प्रती हेक्टरी 300 ते 350 क्विंटल चारा मिळतो. दुसर्‍या कालावधीत चार्‍याचे टर्निप व लवकर तयार होणारी मोहरी लावून प्रती हेक्टरी 250 ते 300 क्विंटल उत्पन्न मिळते. काही भागात पावसाळ्यातील ओल राखून त्यावर रब्बी पीक घेतात. या ठिकाणी चार्‍याचे 40 ते 45 दिवसांत वाढणारे पीक घेता येते. चवळी, ज्वारी, गवार, मटकी यांसारखी पिके लावल्यास हेक्टरी 150 ते 200 क्विंटल हिरवा चारा मिळू शकतो. चार्‍याचे पीक काढल्यानंतर हरभरा, आळशी, गहू, करडई इत्यादी  मुख्य पीक घेता येते. शहराच्या जवळपास दूधदुभत्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. अशा ठिकाणी शेतजमिनीवर चार्‍याची पिके घेणे फायदेशीर असते. गुरांना वर्षभर रुचकर, लुसलुशीत, सत्त्वयुक्त चारा वर्षभर मिळणे जरुरीचे असते. प्रत्येक हेक्टर मधून चार्‍याचे जास्तीत जास्त उत्पादन व्हावे असा उद्देश असतो.

माहिती लेखन : वनराई संस्था

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: चारा पिकेमटकी व कुळीथमोहरीशिंबी पिके
Previous Post

यंदा बीटी कापूस बियाणे पाच टक्क्यांनी महाग

Next Post

महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासाला नवा उजाळा…

Next Post
महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासाला नवा उजाळा…

महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासाला नवा उजाळा...

ताज्या बातम्या

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish