• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कापूस – पांढरे सोने यंदा झळाळणार..; जाणून घ्या काय राहू शकतो भाव…!

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2021
in हॅपनिंग
1
कापूस – पांढरे सोने यंदा झळाळणार..; जाणून घ्या काय राहू शकतो भाव…!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्रासह भारतातही यंदा मुसळधार पाऊस आणि अळ्यांच्या हल्ल्याने कापसाचे उत्पादन 30 ते 50 टक्के घटल्याचे मानले जात आहे. जागतिक पातळीवरही गेल्या दहा वर्षानंतर वाढती मागणी आणि घटलेले उत्पन्न असे गणित पुन्हा निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा कापसाच्या भावात जबरदस्त तेजी राहण्याची शक्यता आहे. यंदाचे भाव आताच 7,500 च्या वर पोहोचले आहेत. त्यामुळे 1994 आणि 2011 नंतर यंदा कापसाचे दर सर्वाधिक राहू शकतात, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

राज्यात 10 लाख गाठींहून कमी उत्पादन..

कापसाचे भाव यंदा सर्रासपणे किमान खरेदी मूल्यापेक्षा (एमएसपी) म्हणजे 6,025 पेक्षा जास्तच राहू शकतात. हरियाणा, पंजाब व मध्य प्रदेशात आताच खासगी खरेदी ही 7,500 पेक्षा अधिक दराने सुरू आहे. यापुढेही याच पातळीच्या वर 7,500 ते 8,000 या दर पट्ट्यातच ही खरेदी सुरू राहू शकते. मागणीचा जोर वाढल्यास किंमती रु. 10,000 चा टप्पाही गाठू शकतात. सध्या सरकार दरबारी होत असलेल्या नोंदीच्या आधारे, कॉटन फेडरेशन आणि सीसीआय या संस्थांनी सुधारित अंदाज जाहीर केले आहेत. त्यानुसार, यंदा राज्यात 75 लाख गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला गेला आहे. यापूर्वी 85 लाख गाठींचे उत्पादन जाहीर केले गेले होते. नव्या अंदाजासाठी सरकारी पंचनाम्यांचा आधार घेतला गेला आहे. मात्र, प्रत्यक्षात नुकसान पंचनाम्यांहून कितीतरी अधिक आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड व आत्मा (नाशिक) तर्फे 23 ऑक्टोबरला नाशिकमध्ये एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

कॉटन फेडरेशन व सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र नोव्हेंबरपासून सुरू होणार..

कॉटन फेडरेशनचे महाव्यवस्थापक जे. पी. महाजन यांनी मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात कापसाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय मागणीबरोबरच देशांतर्गत मागणीही अधिक असल्याने कापसाला यंदा चांगला दर राहील, असे महाजन यांचा अनुमान आहे. त्यांनी सांगितले, की सरकारी कापूस खरेदी केंद्रे नोव्हेंबरमध्ये सुरू केली जाणार आहेत. कॉटन फेडरेशन राज्यभरात 70 तर सीसीआय विदर्भात 40 खरेदी केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी दोन्ही संस्थांनी मिळून राज्यात 15 लाख गाठींची खरेदी केली होती. मात्र, यंदा खासगी खरेदीचा जोर आणि अधिक भाव यामुळे सरकारी खरेदी कमी राहू सकते. गेल्या वर्षी कोरोना प्रतिबंधामुळे सरकारी खरेदी केंद्रांवर गर्दी होती.

कसे असेल कापसाचे गणित..?

*एक क्विंटल कापसापासून 34 किलो रुई व 64 किलो सरकी मिळते.

*15 सेंट एक पाउंड परळीचा भाव ( 1 बेल = 187 किलो रुई )

* 34 किलो रुईचे (187 × 34) = 6363

* 64 किलो सरकीचे 30 रुपये प्रति किलो प्रमाणे 1920 रुपये

* एक क्विंटल कापसाचे 6363 अधिक 1920 म्हणजेच 8250 एकूण

* प्रक्रिया खर्च व्यापारी नफा 1250 रुपये वजा केले तर सात हजार रुपये होतात.

टेक्सटाईल मिल्सकडून जोरदार मागणी

कॉटन एक्स्पर्ट आणि पंजाबमधील भटिंडा येथील विन्सम टेक्सटाईल मिलचे उपाध्यक्ष संजीव दत्ता यांच्या मते, कोरोनानंतर दोन वर्षांनी औद्योगिक उत्पादन आता सुरळीत होत आहे. त्यात भारतासह जगभरातील टेक्सटाईल क्षेत्रातून कापसाला जोरदार मागणी आहे. मोठा टेक्सटाईल उद्योग असलेल्या पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनामबरोबरच चीनमधून मागणीचा जोर अधिक आहे. स्पिंटेक्स युनियनचे कार्यकारी अध्यक्ष सुरेश कुमार गुप्ता यांनी देशांतर्गत कापसाची गरज आणि वाढीव मागणी पाहता, निर्यात तातडीने बंद करावी, अशी मागणी केली आहे. देशांतर्गत आणि परदेशातून मागणीचा जोर आणि घटलेले उत्पादन यामुळे कापसाचे भाव सध्याच्या खरेदीहून आणखी तेजीत येऊ शकतात, असे गुप्ता यांनी सांगितले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कापसाचे गणितकापूसकापूस खरेदी केंद्रकॉटन फेडरेशनजे. पी. महाजनजोरदार मागणीपांढरे सोनेमुसळधार पाऊससंजीव दत्तासीसीआयसुरेश कुमार गुप्ता
Previous Post

बचत गटांना शेळीपालनाचे शेड देण्यासाठी प्रस्ताव तयार करा -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

Next Post

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन केल्यास अजूनही चांगले उत्पादन आणि चढ्या दराचा फायदा मिळणे शक्य… जाणून घेऊ या वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांच्याकडून…

Next Post
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन केल्यास अजूनही चांगले उत्पादन आणि चढ्या दराचा फायदा मिळणे शक्य… जाणून घेऊ या वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांच्याकडून…

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन केल्यास अजूनही चांगले उत्पादन आणि चढ्या दराचा फायदा मिळणे शक्य... जाणून घेऊ या वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांच्याकडून...

Comments 1

  1. चांगली माहिती दिली धन्यवाद says:
    5 years ago

    चांगली माहिती दिली धन्यवाद

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish