Home बाजार भाव पांढरे सोने शेतकऱ्यांना बनवणार का मालामाल ? ; बघा कापूस बाजारभाव

पांढरे सोने शेतकऱ्यांना बनवणार का मालामाल ? ; बघा कापूस बाजारभाव

पांढरे सोने शेतकऱ्यांना बनवणार का मालामाल ?

पुणे : कापसाला गेल्या दोन वर्षात चांगला भाव मिळाला. यंदा देखील कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र कापसाचे भाव 6 हजार 800 ते 7 हजार रुपये प्रतिक्विंटल दरावर स्थिर आहे. अनेक शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलाय की, येणाऱ्या पुढील काळात कापसाचे भाव वाढतील की नाही ?, आज आपण विविध बाजार समित्यांमधील कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत.

 

बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने घरातच कापूस साठवून ठेवलेला आहे. परंतु, गेल्या दोन वर्षात कापसाचे दर हे 5 हजार रुपयांवरून खाली आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापसाला (दि. 21) रोजी सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सर्वसाधारण दर हा 6,900 रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर जास्तीत जास्त दर हा 7,000 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच याठिकाणी कापसाची आवक ही 175 क्विंटल इतकी झाली. इतरही बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव खालीलप्रमाणे…

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (23/1/2024)

अमरावती क्विंटल 70 6675
उमरेड क्विंटल 938 6750
देउळगाव राजा क्विंटल 3500 6775
काटोल क्विंटल 238 6700
सिंदी(सेलू) क्विंटल 1000 6900
कापूस (22/1/2024)
समुद्रपूर क्विंटल 1451 6750
वडवणी क्विंटल 189 6850
कळमेश्वर क्विंटल 1066 6800
उमरेड क्विंटल 237 6650
किल्ले धारुर क्विंटल 1670 7020
चिमुर क्विंटल 2830 6861
फुलंब्री क्विंटल 213 6800
कापूस (21/1/2024)
वडवणी क्विंटल 197 6850
सोनपेठ क्विंटल 175 6900
वरोरा क्विंटल 2803 6700
वरोरा-खांबाडा क्विंटल 1133 6600
भिवापूर क्विंटल 650 6765

 

Planto Krushitantra

 

Jain Irrigation

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇