Home हवामान अंदाज 17 ऑगस्ट 2026 उत्तर महाराष्ट्रात 4 दिवस हलका ते मध्यम पाऊस

17 ऑगस्ट 2026 उत्तर महाराष्ट्रात 4 दिवस हलका ते मध्यम पाऊस

0
6

मुंबई- भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी)च्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या माहितीनुसार, आज, 17 ऑगस्ट रोजी, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुलनेने पावसाचे प्रमाण आज कमी राहू शकेल.

भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने जाहीर केल्यानुसार, आजचा, 17 ऑगस्ट रोजीचा राज्यातील पावसाचा अंदाज.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने जाहीर केल्यानुसार, आजचा, 17 ऑगस्ट रोजीचा राज्यातील पावसाचा अंदाज.

गंगा खोऱ्यात मुसळधार पाऊस

आयएमडीच्या माहितीनुसार, वायव्य बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या पश्चिम बंगाल-उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याच्या प्रभावामुळे, पुढील 2 दिवसांत गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. पश्चिम बंगालमध्ये तुरळक ठिकाणी आज अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. मान्सून द्रोणीचा पश्चिम भाग त्याच्या नेहमीच्या स्थितीच्या उत्तरेस असल्याने, या आठवड्यातील बहुतेक दिवस पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि पुढील 3-4 दिवस उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 2-3 दिवसांत ईशान्य भारतात आणि आठवड्याभरात आसाम व मेघालयात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यताही आयएमडीने वर्तविली आहे.

ताजे उपग्रह छायाचित्र
ताजे उपग्रह छायाचित्र

महाराष्ट्रातील आजचा, 17 ऑगस्ट रोजीचा पावसाचा अंदाज

आज, 17 ऑगस्ट रोजी राज्यातील कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस (हेव्ही रेनफॉल) पडण्याची अधिक शक्यता आहे. याशिवाय ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा, तर मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील भागातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

* 16 ऑगस्ट अखेरपर्यंत देशभरातील जिल्हावार पावसाच्या आकडेवारीवरून असे दिसते की,मोठ्या क्षेत्रावर पावसाची कमतरता (तूट) आहे. पावसाचे वितरणही अनियमित असून,काही भागांत पावसाचे प्रमाण अतिरिक्त किंवा खूपच जास्त आहे.हे 'एल निनो'मुळे घडले असू शकेल का, यावर पर्यावरण आणि हवामान शास्त्रज्ञांनी संशोधन अभ्यास सुरू केला आहे.
16 ऑगस्ट अखेरपर्यंत देशभरातील जिल्हावार पावसाच्या आकडेवारीवरून असे दिसते की,मोठ्या क्षेत्रावर पावसाची कमतरता (तूट) आहे. पावसाचे वितरणही अनियमित                                                                         असून,काही भागांत पावसाचे प्रमाण अतिरिक्त किंवा खूपच जास्त आहे.
                                 हे ‘एल निनो’मुळे घडले असू शकेल का, यावर पर्यावरण आणि हवामान शास्त्रज्ञांनी संशोधन अभ्यास सुरू केला आहे.

विदर्भासाठी कोणताही इशारा नाही!

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत आज पावसाची तीव्रता कमी ते मध्यम स्वरूपाची राहील. मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

उत्तर महाराष्ट्रासाठी आजचा जिल्हानिहाय अंदाज

  • जळगाव: जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.
  • धुळे: जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
  • नंदुरबार: जिल्ह्यात केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
  • नाशिक: नाशिकच्या सपाट/मैदानी भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, तर नाशिकच्या घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसांचा (18, 19 आणि 20 ऑगस्ट) अंदाज

  • 18 ऑगस्ट: जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चारही जिल्ह्यांत केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर मात्र मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
  • 19 ऑगस्ट: या दिवशी पावसाचा जोर किंचित वाढण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस, तर जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात मात्र केवळ हलका पाऊस राहील.
  • 20 ऑगस्ट: या दिवशी पुन्हा पावसाची तीव्रता कमी होऊन जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चारही जिल्ह्यांत केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine + 12 =