जळगाव : अमावस्येच्या दिवशी किंवा एक-दोन दिवसात पिकांवर फवारणी करा, असे जर कोणी आपणास सांगितले तर डोक्यात भलतेच विचार आल्याशिवाय राहणार नाही. परंतु, अमावस्येपासून पुढील एक ते दोन दिवसात पिकांवर फवारणी करणे, शेतकर्यांसाठी मोठे फायदेशीर आहे, हे जर तुम्हाला समजले तर… हा उपाय तुम्ही नक्कीच केल्या शिवाय राहणार नाही… नेमका उपाय काय करावा? त्यामुळे फायदा काय व त्या मागील शास्त्रीय कारण काय? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
निर्मल रायझामिका 👇
शेती करतांना शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात सर्वात मोठी समस्या असते ती, पिकांवर पडणारी कीड किंवा अळींचा प्रादुर्भाव. कापसावर प्रामुख्याने ठिपक्यांची बोंडअळी, हिरवी / अमेरिकन बोंडअळी आणि शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असतो. या अळींमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून उत्पादनात घट होते. अळींच्या नियंत्रणासाठी शेतकर्यांकडून फवारणी देखील करण्यात येते. परंतु, ही फवारणी योग्यवेळी होणे अत्यंत गरजेचे आहे.
80 ते 90 टक्के नियंत्रण
शेतकर्यांना पिकांवर होणारा अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमावस्येच्या एक दिवस आगोदर निंबोळी अर्काची फवारणी केली पाहीजे. निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे पिकांची पाने कडू बनतात आणि अशी पाने अळी किंवा किटक खाणे टाळतात. परिणामी किडीची उपासमार झाल्यामुळे त्या मरतात. अमावस्यानंतर एक-दोन दिवसात देखील शेतकर्यांनी निंबोळी अर्क, किटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी गरजेचे आहे. अमावस्येच्या दुसर्या दिवशी फवारणी केल्याने अळीच्या पतंगाने घातलेले अंडी नष्ट होवून अळींचा होणारा प्रादुर्भाव रोखता येतो. 80 ते 90 टक्के त्यावर नियंत्रण मिळविता येते.
खजुराच्या शेतीतून लाखोंची कमाई 👇
हे आहे शास्त्रीय कारण?
कीड किंवा अळींचा पिकावर विशेषत: कापसावर होणारा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर अमावस्येच्या एक-दोन दिवसात पिकावर फवारणी अत्यंत गरजेचे आहे. कोणताही किटक दिवसा सुप्तावस्थेत असतो आणि रात्री तो सक्रिय होत असतो. अमावस्येची अंधारी रात्र हा कीड किंवा अळ्यांच्या प्रजननासाठी उत्तम काळ असतो. अमावस्येच्या एक-दोन दिवस आधी आणि नंतर एक-दोन दिवस नंतरच्या अधांर्या रात्री अळीचे पतंग हे पिकाच्या लुसलुशीत पानावर, फुलावर तसेच देठावर अंडी घालतात. पतंग हा एकावेळी 100 ते 150 अंडी घालतो. ही अंडी 48 ते 72 तासात पिकतात व त्यातून एक छोटीसी डोळ्यानेही न दिसणारी अळी बाहेर पडते.