Tractor Subsidy… शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्हीही ट्रॅक्टर (Tractor Subsidy) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवली जाणारी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना सन 2022-23 या योजनेमधील ट्रॅक्टर अनुदान योजनेची माहिती जाणून घेऊ या..
नियम व अटी
सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती / जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या 50% किंवा रु. 1.25 लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या 40% किंवा रु.1 लाख यापैकी कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात येते.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
अनुदान
या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल
१) ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
४) बैल चलित यंत्र/अवजारे
५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
६) प्रक्रिया संच
७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) स्वयं चलित यंत्रे

पात्रता
शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8 अ असावा.
शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक.
फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.
कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल. परंतु, ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही. परंतु, इतर औजारासाठी अर्ज करता येईल.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
7/12 उतारा
8 अ दाखला
खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
जातीचा दाखला (अनु. जाती व अनु. जमाती साठी)
स्वयं घोषणापत्र
पूर्वसंमती पत्र

अर्ज कसा करावा
या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टल येथे आपला अर्ज करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करायचा असल्यामुळे सीएससी केंद्र माहिती किंवा घरातील व्यक्ती ज्याला कॉम्प्युटर चालवता येते, अशा व्यक्तींची मदत घेऊन आपण तो अर्ज करू शकता.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇